शौचमाचमनं स्नानं संध्योपासनमार्जवम् ।
तीर्थसेवा जपोऽस्पृश्याभक्ष्यासंभाष्यवर्जनम् ॥३४॥
शौच आचमन स्नान । संध्या तर्पण उपासना ।
जपादिक अनुष्ठान । तीर्थसेवन विश्वासें ॥५५॥
अधर्म-अकर्मांचा विटाळु । हों न द्यावा अळुमाळु ।
आलियाही संकटकाळु । अभक्षणशीळु नव्हे भावो ॥५६॥
ज्यासी असे व्रतधारण । तेणें रजस्वलादि निंद्य जन ।
त्यांसी न करावें संभाषण । धरावें मौन निंदस्तवनीं ॥५७॥
सर्वांही आश्रमांसी जाण । स्वधर्मनियमाचें लक्षण ।
सांगेन म्हणे श्रीकृष्ण । ऐक सावधान उद्धवा ॥५८॥