मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
रत्‍नाचे मचकीं पहुडे चक्र...

संत जनाबाई - रत्‍नाचे मचकीं पहुडे चक्र...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


रत्‍नाचे मचकीं पहुडे चक्रपाणी । चोळीत रुक्मिणी चरणांबुज ॥१॥

कानीं पडियले द्रौपदीचे बोल । उठे घननीळ तांतडीनें ॥२॥

रुक्मिणी म्हणे ऐक एक गोष्‍ट । पडिलें संकटीं तान्हें माझें ॥३॥

टाकिला गरुड अनवाणी पाय । जनी म्हणे माय धांविन्नली ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP