मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
मध्यरात्रीं ऋषिसहित । वना...

संत जनाबाई - मध्यरात्रीं ऋषिसहित । वना...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


मध्यरात्रीं ऋषिसहित । वना आले अकस्मात्‌ ॥१॥

पंडुसुत जागे झाले । ऋषि समस्त वंदिले ॥२॥

धर्म भीमाकडे पाहे । सत्त्वहानि होत आहे ॥३॥

द्रौपदीनें धांवा केला । देव जेवितां उठिला ॥४॥

ऋषि तृप्त केले वनीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP