मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
अपूर्व कोणे एके काळीं । द...

संत जनाबाई - अपूर्व कोणे एके काळीं । द...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


अपूर्व कोणे एके काळीं । देव सभेच्या मंडळी ॥१॥

करी त्रैलोक्य भ्रमणा । करीं वाहे ब्रम्हवीणा ॥२॥

देती सर्वही सन्मान । सिद्ध साधू योगी जन ॥३॥

सांगे अपूर्व काहाणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP