रक्तवहस्त्रोतस् - पाददारी
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
परिक्रमणशीलस्य वायुरत्यर्थरुक्षयो: ।
पादयो: कुरुते दारीं पाददारीं तमादिशेत् ॥
पाददारीमाह - परिक्रमणशीलस्येत्यादि ।
परिक्रमणं पादविहरणं, दारि दारणमात्रं; ।
विपादिका कुष्ठं तु पिडका सविदारणेति भेद:।
मा. नि. क्षुद्ररोग २५ पान ३६७-म. टीकेसह-
फ़ार चालण्याच्या श्रमामुळे वायू प्रकुपित होऊन रस रक्तास व तळपायांस रुक्षता आणून त्या ठिकाणीं भेगा उत्पन्न करतो. या विकारास पाददारी असें म्हणतात. यामध्यें पिडका किंवा उत्सेध नसून पायांस भेगा पडतात. त्या ठिकाणीं स्पर्शासहत्व व दाह हीं लक्षणें असतात. धुळीमुळें या भेगा दुष्ट होऊन त्या ठिकाणी शूलादि लक्षणें उत्पन्न होतात. यालाच 'जळवात' असें म्हटलें जाते. हा व्याधी कष्टसाध्य आहे.
चिकित्सा
अवगाह स्वेद, स्नेहन, सिंदूर मलम व इतर वातघ्न उपचार करावेत.
पथ्यापथ्य
-विदाही, लवणपदार्थ वर्ज्य, चालणे वर्ज्य करावें, धुळीपासून रक्षण करावे.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP