रक्तवहस्त्रोतस् - नीलिका
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
कृष्णमेवंगुणं गात्रे मुखे वा नीलिकां विदु: ॥४०॥
नीलिकालक्षणमाह - कृष्णमेवंगुणमित्यादि । एवंगुण-
मिति नीरुजतनुकमण्डलधर्म; व्यड्गोक्त-दोषोऽत्रापि
बोद्धव्य:, संमूर्च्छनविशेषात्तु नीलित्वकारी । कृष्णन्य-
च्छादतिकृष्णत्वेन भिन्ना - नीलिका, व्यड्गनीलिकागव्यो-
स्तु व्यक्त एव भेद:-श्यावो व्यड्ग:, कृष्णा नीलिका;
भोजे तु नीलिका गात्र एवोक्ता । यदुक्तं, - ``मारुत:
क्रोधहर्षाभ्यामूर्ध्वगो मुखमाश्रित: । पित्तेन सह संयुक्त:
करोति वदनत्वचि । नीरुजं तनुकं श्यावं व्यड्गं तमिति
निर्दिशेत् । कृष्णमेवंगुणं गात्रे निलिकां तां विनिर्दिशेत्''
- इति ॥४०॥
मा. नि. क्षुद्ररोग १० पा. ३७३ म. टीकेसह.
व्यंगाप्रमाणेंच वेदनारहित, लहान व कृष्ण, नीलवर्णाचे जे डाग इतर शरीरावर वा क्वचित् मुखावर पडतात त्यांना नीलिका असें म्हणतात. भोजानें व्यंग व नीलिका यांची संप्राप्ति व लक्षणें सारखींच दिली असून मुखावर उत्पन्न होतात त्यास व्यंग व इतर शरीरावर उमटतात त्यांस नलिका म्हणावें असें सांगितलें आहे. माधवनिदानानेही दोषांची संप्राप्ती व लक्षणें एकच मानलीं आहेत असें त्याच्या `एवं गुण' या पदावरुन दिसतें. मात्र भोजाच्या संप्राप्तीत `आयासाच्या ऐवजी' हर्षाचा' उल्लेख आहे तो तितकासा योग्य वाटत नाहीं, कारण हर्षानें वात पित्त वा रक्त या व्यंग निलिकांच्या सामान्य संप्रातींतील दोषदूष्यांची विकृती होणें शक्य नाहीं. म्हणून क्रोध वा आयास हीं माधवनिदानोक्त कारणेंच योग्य आहेत. व्यंग हा श्याव वर्ण फिकट काळा असून नीलिका ही गडद काळी असते हें टीकाकारांचें वर्णन दोघांमधील भेदांच्या दृष्टीनें योग्य आहे. मुख व गात्र यांच्यामध्यें विभागणी करणें तितकेंसें योग्य वाटत नाहीं. प्राधान्य दाखवितां आलें तरी दोन्ही विकार दोन्ही ठिकाणीं उत्पन्न होतात. व्यंगाचे डाग निलिकांच्या डागांपेक्षां संख्येनें अधिक, आकारानें बारीक व एकमेकांच्या जवळजवळ असतात.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP