रक्तवहस्त्रोतस् - कामला

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या :-

अत्र कामलेति कामशब्दोऽयं साधारणशब्दविशेषात्स्वल्पे
भक्ताद्यभिलाषे प्रवर्तते, तं लातीति कामला ।
सु. उ. ४४-६ तळटीप पान ७२९

कामान् लाति इति कामला । काम म्हणजे निरनिराळ्या स्वरुपाच्या इच्छा अभिलाषा (विशेषत- आहार-विहार संभोगविषयक) त्या ज्या रोगामुळें तटतात, नाहींशा होतात त्या रोगास कामला असें म्हणतात,

स्वरुप

दारुण

मार्ग

बाह्य, अभ्यंतर,

प्रकार

दोन

अल्पपित्ता व बहुपित्ता
शाखाश्रिता व कोष्ठशाखाश्रिता

रुद्धपथकामला व बहुपित्ता कामला अशा निरनिराळ्या नावानें कामलेचें वर्णन केलें असलें तरी तें सर्व दोन प्रकारांतच मोडतें, कांहींनीं कामला व कुंभकामला असें दोन प्रकार मानले आहेत, आमच्या मतें कुंभकामला हा कामलेचा प्रकार नसुन त्या व्याधींस कामलेचें अवस्थान्तर वा स्वतंत्र व्याधी मानलें पाहिजे,

निदान संप्राप्ति

निदान व संप्राप्ति प्रकार भेदानें निरनिराळी आहे,

अल्पपित्तां, रद्धपथ, शाखाश्रितकामला

तिलपिष्टनिभं यस्तु वर्च: सृजति कामली
श्लेष्मणा रुद्धमार्गं तत् पित्तं कफहरैर्जयेत् ।
रुक्षशीतगुरुस्वादु व्यायामैर्वेगनिर्गहै: ।
कफसंमूर्च्छितो वायु: स्थानात् पित्तं क्षिपेद्वली ।
हारिद्रनेत्र मूत्रत्वक् श्वेतवर्चास्तदा नर:
भवेत् साटोपविष्टंम्भो गुरुणा हृदयेन च ।
द्रौर्बल्याल्पाग्निपार्श्वार्तिहिक्काश्वासारुचिज्वरै: ।
क्रमेणाल्पेऽनुसज्येत पित्ते शाखासमाश्रिते ।
च. चि. १६-१२४ ते १२७

तिलपिष्टनिभ इत्यादिना शाखाश्रयकामलाचिकित्सितं
लक्षणपूर्वकमाह । श्लेष्मणा रुद्धमार्गमिति कोष्ठस्थेन
श्लेष्मणा रुद्धमार्गमिति कोष्ठस्थेन श्लेष्मणा शाखाश्रयि
पित्तं कामलाजनकं रुद्धमार्गं कोष्ठगमनार्थं निषिद्धमा-
र्गमिति यावत् । एतदेव रुक्षेत्यादिना विस्तरेणाह श्वेत-
वर्चा इति कोष्ठस्थपित्तस्य मलरंजकस्य बहिरनिर्गमा-
द्धृद्धेन श्लेष्मणा श्वेतवर्चा भवति । क्रमेणेति ज्वरान्तै
रनुषज्जते । अल्पे पित्ते शाखाश्रिते इति संबंध: ।
टीका १२४ - १२७ पा. १२३१

निदान

रुक्ष, शीत, गुरु, मधुर अशा द्रव्यांचें सेवन करणें अति व्यायाम करणें व वेगनिग्रह या कारणांनीं वात कफ प्रकुपित होतात,

संप्राप्ति

वाय़ू हा कफानें संमूर्च्छित होतों, कफानें पित्ताच्या मार्गात अवरोध उत्पन्न होतो, पित्ताशयांतून पाचक पित्ताच्या एका अंशाला अन्नवह स्त्रोतसामध्यें घेऊन येणारी जी एक पित्तवाहिनी (पित्तवहसिरा) तिच्यामध्यें वायूनें व ग्रंथित झालेला कफ अडथळा उत्पन्न करतो, कफाच्या रोधामुळें पित्ताचा स्त्राव अन्नवह स्त्रोतसांत होत नाहीं, पित्त पित्ताशयांत संचित होतें, आणि या संचित पित्तास वायू पित्ताच्या स्थानांतून बाहेर फेकतों, ते पित्त रसवाहिन्यांत जाऊन रक्तास दुष्ट करुन कामला हा व्याधी उत्पन्न करतें, याचा उद्‍भव पित्ताशयांत, अधिष्ठान रक्तधातूंत व संचार शाखेमध्यें असतो,

पूर्वरुपें

पोटांत गुडगुडणें, वातपूरीष यांचा अवरोध, अग्नि मंद होणें हृदयामध्यें जडपणा वाटणें हीं लक्षणें पूर्वरुपांत होतात,

रुपें

पित्त महास्त्रोतसांत येत नसल्यामुळें पूरीषाचा रंग तिळाच्या कल्काप्रमाणें पांढरा, करडा असा असतो. डोळे मूत्र आणि त्वचा पिवळी होते. दौर्बल्य पार्श्वशूल, ज्वर, अरुचि, हिक्का, श्वास हीं लक्षणें व पूर्वरुपांत उल्लेखिलेलीं लक्षणें होतात अवरुद्ध होऊन विमार्गग झालेलें पित्त जसजसें शाखाश्रित होत जाईल, तसतशीं लक्षणे क्रमानें वाढत जातात. शरीरभर पसरलेले पित्त आंत्रात येऊन पूरीष पीत वर्ण होते. मार्गावरोधामुळें पित्ताशयाच्या आसमंतभागीं शूल व स्पर्शासह्त्व हीं लक्षणें विशेषेकरुन आढळतात. या व्याधीमध्यें पित्त प्रत्यक्षांत प्रकृतिस्थ प्रमाणापेक्षां वाढलेलें नसतें. म्हणूनच अल्पपित्ताकामला म्हणतात. पण अवरोधामुळें विमार्गग होऊन रसरक्ताच्या आश्रयानें पित्त, वृद्धीचीं लक्षणें करतें `रक्तामध्यें पित्त प्रमाणापेक्षां अधिक झाल्यानें रक्त दग्ध होऊन कामलेचीं लक्षणें अधिकाधिक वाढतात. मूत्रोत्पत्ती पक्वाशयांत होते. महास्त्रोतसामध्यें पित्त येत नाहीं. तरी मूत्र प्रवृत्ती पिवळी कां या शंकेचे उत्तर असें कीं, शरीरांत संचार करणारें पित्त सर्व शरीरभर धातु उत्पत्तीचे वेळीं निर्माण होणार्‍या क्लेदासही पिवळेपणा आणते. हा पित्तानें पिवळा झालेला क्लेद मूत्रांतून वाहिला जात असल्यानें क्लेदाच्या संसर्गामुळें मूत्रासहीं पिवळेपणा येतो.

बहुपित्ता कोष्ठशाखाश्रिताकामला

पाण्डुरोगी तु योऽत्यर्थं पित्तलानि निषेवते ।
तस्य पित्तमसृग्मांसं दग्ध्वा रोगाय कल्पते ॥३४॥
हारिद्रनेत्र: स भृशं हारिद्रत्वड्नखानन: ।
रक्तपीतशकृन्मूत्रो भेकवर्णो हतेन्द्रिय: ॥३५॥
दाहाविपाकदौर्बल्यसदनारुचिकर्षित: ।
कामला बहुपित्तैषा कोष्ठशाखाश्रया मता ॥३६॥
च. चि. १६-२४ ते ३६ पान १२१-२०२

पाण्डुरोगीत्यादिना कामलामाह । पाण्डुरोगीति वचनात्
पाण्डुरोगस्यैव हेतुविशेषण कामलादिरुपाऽवस्था उत्पद्यते;
अत एव च हारीते कामलादीनामपि पाण्डुरोगत्वमेवोक्तम् ।
वचनं हि - वातेन पित्तेन कफेन चैव त्रिदोषमृद्भक्षण संभवे च ।
द्वे कामले चैव हलीमकश्च स्मृतोऽष्टधैवं खलु पाण्डुरोग: ``इति;
अन्या तु सुश्रुतोक्ता कामला भिन्ना भवति, ``यो ह्यामयान्ते
सहसाऽम्लमन्नमद्यादपथ्यान्यपि तस्य पित्तम् ।
करोति पाण्डुं वदनं विशेषात् पूर्वेरितौ तन्द्रिबलक्षयौ च''
इत्यादिना पृथक्कामलाहेतुरुक्त:, वाग्भटेऽपि ``भवेत्
पित्तोल्बणस्यासौ पाण्डुरोगादृतेऽपि च'' इति इह तु पाण्डुरोगेऽपि
भवेत् पाण्डुरोगांद्विनाऽपि भवेत्, यथा प्रमेहाश्रिता: पिडिका: प्रमेहेषु
भवन्ति विना प्रमेहमपि भवन्ति; तथा पाण्डुरोगिणोऽप्युक्ता कामला
पृथगपि भवति, कोष्ठशाखाश्रया बहुपित्ता पाण्डुरोग-
पूर्विका भवति, या तु केवलं शाखाश्रया अल्पपित्ता च
वक्तव्या सा स्वतन्त्राऽपिभवतीति केचित् अत एव
तस्या रुक्षशीतेत्यादिना पृथगेव हेतुं लिड्गं चाध्यायशेषे
वक्ष्यति । बहुपित्तेत्यनेन केवलं शाखाश्रयाया अल्पपित्तत्वं
सूचयति; अम्लकटुतीक्ष्णोपयोगं शाखाश्रयिपित्तस्य कोष्ठा-
नयनार्थं वक्ष्यति: ।
च.चि.१६-३६ च.पा. टीका पान १२२१

(३) भवेत्पित्तोल्बण्स्यासौ पाण्डुरोगाद्दतेऽपि:च ॥१७॥
पाण्डुरोगमन्तरेणापि पित्ताधिकस्य नरस्य पित्तलान्या-
सेवमानस्यासौ कोष्ठशाखाश्रया कामला स्यात् ,न केवलं
पाण्डुरोगिण: ।
वा.नि, १३-१७ सटीक पान: ५१९

निदान

पित्तकर आहार-विहार केल्यानें पित्त प्रकुपित होऊन कामला रोग उत्पन्न होतो. टीकाकारानें बहुपित्ता उपद्रवात्मक व अल्पपित्ता स्वतंत्र व्याधि म्हणून असते असे सुचविले असले तरी ही कामला स्वतंत्रपणें वा पंडुरोगाचा उपद्रव म्हणून होऊ शकते.

संप्राप्ति

तीक्ष्णोष्णादि कारणांनी प्रकुपित झालेले पित्त रक्ताचा व मांसाचा विदाह करुन व्याधी उत्पन्न करतें. याचा उद्‍भव महास्त्रोतसांत व रसवहस्त्रोतसांत होतो. अधिष्ठान रक्तमांसामध्यें असतें व संचार सर्व बाह्याभ्यंतर मार्गांमध्यें होतो.

पूर्वरूप

ज्वर, दाह, अन्नाचा विदाह होणे, अरति हीं लक्षणें पूर्वरुपांत असतात.

रूपें

नख, नेत्र, त्वचा, मूत्र, पूरीष यांना पीतवर्ण येतो. पुढें पुढें हा वर्ण हळदीसारखा गडद होऊं लागतो. त्वचा बेडकीच्या त्वचेप्रमाणें निस्तेज होते. इंद्रियें कार्यक्षम राहात नाहींत. दाह, अविपाक, दौर्बल्य, अंगसाद, अरुचि, ज्वर अरति हीं लक्षणें होतात. रक्ताचा नाश होत जातो.

चिकित्सासंदर्भानें लक्षणें

शौथ, प्रमेह, ह्र्द्‍रोग, ग्रहणी, श्वास, कास, रक्तपित्त, व्रण, गुल्म, आमवात कुष्ठ (वंगसेन कामला पान २०२)

उपद्रव

कुंभकामला, शोथ, हलीमक, ज्वर, मूर्च्छा, श्वास.

उदर्क
अन्नाचा विदाह व दाह.

साध्यासाध्य विवेक
रुद्धपथकामला ही बहुधा साध्य असून बहुपित्ताकामला ही कष्टसाध्य वा असाध्य असते.
 
सरक्ताक्षिमुखच्छर्दिविण्मूत्रो यश्च ताम्यति ।
दाहारुचितृषानाह्तन्द्रामोहसमन्वित: ॥३८॥
नष्टाग्निसंज्ञ: क्षिप्रं हि कामलावान् विपद्यते।
च.चि. १६-३८ पा. १२२१

डोंळे व मुख रक्ताळणें, पूरीष व मूत्र यांना हळदीसारखा व रक्तवर्ण येणें, दाह, अरुचि, तृष्णा, आनाह, तंद्रा, मोह, तम:प्रवेश, मूर्च्छा, अग्निनाश (मुळींच भूक नसणें,अन्न न पचणें व शरीर गार पडणें.) या लक्षणांनीं युक्त असा कामलेचा रोगी असाध्य होतो. तसेंच त्वचेचा वर्ण हळदीसारखा होणें आणि वस्त्रावर घामाचे व मूत्राचे हळदीसारखे डाग पडणें, पांढर्‍या रंगाच्या वस्तू रुग्णास पिवळ्या दिसणें, ज्वर, श्वास, दाह, शोथ हीं लक्षणें विशेष प्रमाणांत असणें हे कामलेच्या असाध्यतेचें द्योतक आहे.

चिकात्सासूत्रें

कटुतीक्ष्णोष्णलवणैर्भृशोम्लैश्चाप्युपक्रम:॥१३०॥
आपित्तरागाच्छ्कृतो वायोश्चाप्रशमाद्भवेत् ।
स्वस्थानमागते पित्ते पुरीषे पित्तरंजिते॥१३१॥
निवृत्तोपद्रवस्य स्यात्  पूर्व: कामलिको विधि: ।
च.चा. १६-१३०, ३१ पान १२३१

रुद्धपथ कामलेमध्यें कटु, तीक्ष्ण, उष्ण, अम्ल व लवण अशा द्रव्यांनी प्रथम कफ़ाचा व वायूचा नाश करुन पित्त स्वस्थांनी आणावें. मार्गावरोध दूर होऊन पित्तामुळें पूरीषाचा वर्ण नेहमीसारखा पीतवर्ण होऊं लागला म्हणजे ही वातकफ़शामक चिकित्सा थांबवून पुढें सांगितलेली बहुपित्ता कामलेची चिकित्सा करावी.

रेचनं कामलार्तस्य स्निग्धस्यादौ प्रयोजयेत् ।
तत: प्रशमनीकार्य्या क्रिया वैद्यैन जानता ॥६७॥
वंगसेन कामला पान २०१

विरेचन ही पित्तावरची महत्वाची चिकित्सा बहुर्पित्ता कामलेंतही विशेष उपयोगी पडते. ही विरेचन द्रव्यें शक्यतों शीतवीर्य असावींत.

द्रव्यें
त्रिकटु, त्रिफ़ळा, निशोत्तर कुटकी, आम्लवेतस्, एरंडपत्रस्वरस, द्राक्षा, आमलकी, वासा, आरग्वध, इंद्रवारुणी, गुळवेल, काडेचिरायित, कोरफ़ड, गोमूत्र, पित्तपापडा.
चंद्रकलारस, सूतशेखर, मौत्तिक, प्रवाळ, कामदुधा, आरोग्यवर्धिनी चंद्रप्रभा कुमारीआसव, उशीराआसव, सारिवाद्यासव,

आहार
रुद्धपथ कामलेंत स्निग्ध, गुरु पदार्थ वर्ज्य करावेत. सामान्यत: सर्व प्रकारच्या कामला रोगामध्यें गोदुग्ध वा फ़लरस एवढाच आहार द्यावा. उसाचे कर्वे करुन खावे

विहार
आतपानल सेवा, वर्ज्य, श्रम करु नयेत.

अपथ्य
तीक्ष्ण, उष्ण अशी आहारद्रव्यें वर्ज्य करावीं.

कुंभकामला
कालन्तरात् खरीभूता कृच्छ्रा स्यात्  कुम्भकामला ।
कृष्णपीतशकृन्मूत्रो भृशं शूनश्च मानव: ॥३७॥
च. चि. १६-३७ पान १२२१

खरीभूतेति कठोरतामुपगता । कुम्भ कामलेति अवस्था-
भेदेन कोष्ठगतकामलाया: संज्ञा; कुम्भ: कोष्ठ:, तदाश्रया
कामला कुम्भकामला । अस्यां च शोथोऽपि लक्षणं
भवति । उक्तं हि सुश्रुते--" भेदस्तु तस्या: खलु कुम्भ-
साह्व शोथो महांस्तत्र च पर्वभेद: "
च. चि. १६-३७ टीका पान १२२१

कामला व्याधी ज्या वेळीं कोष्ठाश्रित अधिक गंभीर आणि स्थिर लक्षणात्म होतो त्या वेळीं त्यास कुंभकामला असें म्हणतात. हा विकार कामलेच्या अवस्थांतरासारखा आहे. या व्याधींतं पुरीष, मूत्र गडद पिवळें व काळसर वर्णाचें असतें. नेत्रांनाही कृष्णपीतवर्ण येतो. अंगावर पुष्कळ शोथ येतो. सांधे ठणकतात. व्याधीचा हा प्रकार कृच्छ्रसाध्य सांगितला आहे.

चिकित्सा
याची चिकित्सा बहुपत्ताकामलेप्रमाणें करावी.

पानकी सन्तापो भिन्नवर्चश्र्व बहिरंतश्र्व पीतता । पाण्डुता नेत्रयोर्यस्य पानकीलक्षण वदेत् ॥९०॥
वंगसेन पान २०४ पाण्डु

सर्व शरीर अंतर्बाह्य पिवळें होते. डोळे पांडुर दिसतात. शरीर संतप्त असतें. आणि पूरिषप्रवृत्ती फुटीर द्रव अशी असते. या व्याधीस पानकी किंवा सुश्रुताप्रमाणे अपानकी असे नांव आहे.

चिकित्सा

बहुपित्ता कामलेप्रमाणे चिकित्सा करावी.

N/A

References : N/A
Last Updated : July 27, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP