रक्तवहस्त्रोतस् - वृषणकच्छू
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
स्नानोत्सादनहीनस्य मलो वृषणसंस्थित: ।
यदा प्रक्लिद्यते स्वेदात् कण्डूं जनयते तदा ॥
कण्डूयनात्तत: क्षिप्रं स्फोट: स्त्रावश्च जायते ।
प्राहुर्वृषणकच्छूं तां श्लेष्मरक्तप्रकोपजाम् ॥५२--५३
मा. नि. क्षुद्र रोग ५२-५३ पान ३७६.
स्नान व अवयवाची स्वच्छता यांच्या अभावामुळें वृषणावरील सुरुकुतलेल्या त्वचेमध्ये मलसंचिती होते. घामामुळें त्याला अधिक क्लिन्नता येते व त्या ठिकाणीं खाज सुटते. खाजविण्यामुळें स्त्रावयुक्त स्फोट त्या ठिकाणीं उत्पन्न होतात. त्यामध्यें कफाची व रक्ताची दुष्टी असते. याला वृषणकच्छू असें म्हणतात. मधुकोशटीकाकारानें विशिष्ट प्रकारची चिकित्सा करावी लागत असल्यामुळें कुष्ठप्रकरणांतील कच्छूपेक्षां हा व्याधी वेगळा सांगितला आहे असें म्हटलें असलें तरी कुष्ठांतील कच्छूच केवळ स्थानभेदानें वर्णिला आहे असें म्हटलें असलें तरी कुष्ठांतील कच्छूच केवळ स्थानभेदानें वर्णिला आहे आणि स्थानभेदामुळें व्याधींचें वेगळेपण मानण्याच्या पद्धतीस अनुसरुन हा व्याधी निराळ्या प्रकरणांत उल्लेखला आहे असें म्हणणेंच अधिक योग्य आहे. व्याधी साध्य स्वरुपांत असतो. उपेक्षेनें मात्र पाक, दाह, कंडू, सर्वांगव्याप्ती असे उपद्रव होतात व व्याधी चिरकारी पीडाकर होतो.
चिकित्सा
स्वच्छता राखावी, उद्धूलन करावें. हरताळमिश्रण, करंजेल, निंबतेल, गंधकरसायन, मंजिष्टादि काढा वापरावा.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP