रक्तवहस्त्रोतस् - हलीमक

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


यदा तु पाण्डोर्वर्ण: स्याद्धरितश्यावपीतक: ॥१३२॥
बलोत्साहक्षयस्तन्द्रा मन्दाग्नित्वं मृदुज्वर: ।
स्त्रीष्वहर्षोऽड्गमर्दश्च श्वासस्तृष्णाऽरुचिर्भ्रम: ॥१३३॥
हलीमकं तदा तस्य विद्यादनिलपित्तत: ।
येदत्यादिना हलीमकमाह अयमेव तत्रान्तरे लाघवसंज्ञया
अलससंज्ञया चोच्यते । उक्तं हि सुश्रुते-``ज्वराड्गमर्द-
भ्रमदाहतन्द्राक्षयोन्वितो लाघवकोऽलसश्च । तं वात-
पित्ताद्धरिपीतनीलं हलीमकं केचिदुदाहरन्ति'' (सु. उ.
अ. ४४) इति । यच्चापि तत्र भिन्नवर्चस्त्वं सा चापि
कामलावस्थैव न पृथग्रोग: । उक्तं हि ग्रन्थान्तरे -
``संतापो भिन्नवर्चस्त्वं बहिरन्ते च पीतता ।
पाण्डुता नेत्ररोगश्च पानकीलक्षणं मतम् इति । १३२-१३३ ॥
च. चि, १६-१३२-३३ सटीक पान १२३१, ३२

हलीमक हा व्याधी पांडूरोग, विशेषत: कामला यांच्याच वर्गात मोडणारा असून त्यामध्यें ओजाची विकृति अधिक असते. व संप्राप्तीमध्यें वातपित्ताचें प्राबल्य असतें, असें त्यातील विशेष लक्षणावरुन दिसतें. या व्याधीमध्यें शरीराचा वर्ण पांडू पीत असा असून त्यांत हिरवट काळसर छटा मिसळलेल्या असतात. बल अत्यंत कमी होणें, उत्साह नसणें, तंद्रा, अग्निमांद्य मंदज्वर, अंगमर्द, श्वास, तृष्णा, अरुचि, भ्रम, मैथुनाची अनिच्छा, हीं लक्षणें असतात. ग्रंथामध्यें स्त्रीषु अहर्ष: असें लक्षण सांगितलें असले तरी हा व्याधी केवळ पुरुषांना होणारा आहे असें समजण्याचें कारण नाहीं. स्त्रियांच्यामध्येंही हा रोग आढळतो. म्हणून मैथुनाची अनिच्छा एवढाच सामान्य अर्थ येथें करावा. या व्याधीलाच सुश्रुतादि निराळ्या ग्रंथांत लाघरक, लाघव, लोढर, अलस, अशीं निरनिराळीं नांवें आहेत. कांहीं ठिकाणीं लघरक व अलस हे पर्याय शब्द मानून हलीमक निराळा सांगितला आहे (सु. उ. ४४/१२) वाग्भटानें मात्र वरील संज्ञा या हलीमकाचेचे पर्याय मानिल्या आहेत. (वा. नि. १३-१८/१९)

हलीमक हा व्याधी असाध्य आहे. चरकानें महाव्याधी म्हणून याचा उल्लेख केला आहे. (च. चि. १६-१३९)

चिकित्सा

गुडूची स्वरसक्षीरसाधितं माहिषं घृतम् ॥१३४॥
स पिबेत्त्रिवृतां स्निग्धो रसेनामलकस्य तु ।
विरिक्तो मधुरप्रायं भजेत् पित्तानिलापहम् ॥१३५॥
द्राक्षालेहं च पूर्वोक्तं सर्पाषि मधुराणि च ।
यापनान् क्षीरबस्तींश्च शीलयेत्सानुवासनान् ॥
मार्द्वीकारिष्टयोगांश्च पिबेद्युक्त्याऽग्निवृद्धये ।
कासिकं चाभयालेहं पिप्पलीं मधुकं बलाम् ॥१३७॥
पयसा च प्रयुंजीत यथादोषं यथाबलम् ।
च. चि. १६-१३४-३७ पान १२३२

गुडुचिसिद्ध माहिषघृतानें स्नेहन करुन विरेचनासाठीं निशोत्तर आमलक स्वरसाबरोबर द्यावे. त्यानंतर द्राक्षावलेह व मधुर द्रव्यांनीं सिद्ध असे तूप द्यावे. क्षीरबस्ती व यांपनबस्तीचा उपयोग करावा. अग्निदीपनासाठीं आसवारिष्टे वापरावी. अगस्तिहरीतकी हा कल्प औषध म्हणून वापरावा व इतर चिकित्सा पांडुरोग व कामलेप्रमाणें करावी.

N/A

References : N/A
Last Updated : July 27, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP