रक्तवहस्त्रोतस् - तिलकालक
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
कृष्णानि तिलमात्राणि निरुजानि समानि च ।
वातपित्तकफोच्छोषात्तन्विद्यात्तिलकालकान् ॥३७॥
तिलकालकलक्षणमाह - कृष्णानीत्यादि । `वातपित्त-
कफोच्छोषात्' इति पाठे वातपित्ताभ्यां हेतुभ्यां कफ-
स्योच्छोष: शोषणं तस्मात् । अन्ये चरकं दृष्ट्वा वात-
पित्तासृगुच्छोषात्' इति पठन्ति । तथा च चरक:
``यस्य पित्तं प्रकुपितं शोणितं प्राप्य शुष्यति । तिलका
विप्लवा व्यड्गा । निलिका चास्य जायते'' (च. स. स्था.
अ. १८) इति; अस्मिन् वचने वातोऽप्यवगन्तव्य:,
तेनापि शोषरुप क्रियमाणत्वात् । अन्येऽपि तंत्रान्तरं --
मारुत: पित्तमादाय कफरक्तसमाश्रित: । चिनोति तिल-
मात्राणित्व चि ते तिलकालका:'' इति; किंत्वस्मिन्नपि तन्त्रे
कफरक्तसमाश्रित इत्यनेन कफरक्तयोराश्रितवातेन
पित्तसहितेनोच्छोषादेव तिलकालके कार्ष्णस्य संभावोऽ-
वगम्यते, ततश्च ``वातपित्तकफोच्छोषात्'' इति पाठो
युज्यते वातपित्तरसोद्रेकात् इति पाठांतरम् ॥३७॥
मा. नि. क्षुद्ररोग ३७ म. टीकेसह
रक्ताच्या आश्रयानें असलेले पित्तप्रधान तीनही दोष, शुष्क होऊन त्वचेवर वेदनारहित व रेखीव आकाराचे (समानि) डाग उत्पन्न करतात. त्यांस तिलकालक असें म्हणतात. मधुकोश टीकेंतील निरनिराळ्या पाठभेदांवरुन तिलकालकाच्या संप्राप्तीसंबधी असें वर्णन मिळतें-तिलकालकामध्यें कफरक्ताच्या आश्रयानें असलेला वायू पित्तासह त्वचेच्या ठिकाणीं संचित होतो व त्या ठिकाणीं काळे डाग उत्पन्न करतो. त्वचेमध्यें डाग उत्पन्न होण्याच्या दृष्टीनें रसाची विकृतीही आवश्यक असते. वातपित्तानें कफ, रक्त शुष्क होत असल्यामुळें, या डागांना काळा वर्ण येतो. हे डाग आकारानें तिळासारखे असल्यामुळें यांस `तिलकालक' असें म्हणतात. लौकिकामध्यें यालाच तीळ असें म्हणतात.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP