रक्तवहस्त्रोतस् - इंद्रलुप्त
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
रोमाकूपानुगं पित्तं वातेन सह मूर्च्छितम् ।
प्रच्यावयति रोमाणि तत: श्लेष्मा सशोणित: ।
रुणद्धि रोमकूपांस्तु ततोऽन्येषामसंभव: ।
तदिन्द्रलुप्तं खालित्यं रुह्येति च विभाव्यते ॥
इन्द्रलुप्तस्य लक्षणमाह - रोमकूपेत्यादि । एतत्
त्रिभिर्दोषै: सशोणितै: स्वभावान्नियतकालव्यापारैर्भवति ।
एतच्च स्त्रीणां न भवतीति विदेहवचनाद्व्याख्यान यन्ति ।
यदुक्तं -- `अत्यन्तं सुकुमाराड्यो रजो दुष्टं स्त्रवन्ति च ।
अव्यायामरता यस्मात्तस्मान्न खलिति: स्त्रियां'' इति ।
अव्यायामाद्वातपित्तयोरकोपेन नाति रोमच्युति:, रज:स्त्रावेण
च स्त्रोतोऽवरोधाभावाच्च्युतामपि रोम्णां पुनर्विरोह:; किंतु
स्त्रीष्वपि खलितिदर्शनात् प्रायिकं विदेहवचनम् । खालित्यं
रुह्येति च तस्य पर्यायकथनम् । तथा च भोज:,
तदिन्द्रलुप्तमित्याहु: खल्वीं रुह्यां च केचन'' इति ।
कार्तिकस्त्वा ``इन्द्रलुप्तं श्मश्रुणि भवति; खालित्यं शिरस्येव,
रुह्या च सर्व देहे'' इति । आगमस्त्वत्र नास्ति ॥२४॥
मा. नि. क्षुद्ररोग २८, २९ पान ६६८ म. टीकेसह
पित्त वायूसह संमूर्छित होऊन रोमकूपामध्ये आश्रय करतें. त्याचा परिणाम म्हणून केस गळून पडतात. कफदुष्ट रक्तानें याच वेळीं स्त्रोतोरोध झाल्यास त्या त्याठिकाणीं नवीन केसही येत नाहींत. या व्याधीस इंद्रलुप्त, खालित्य, रुह्य अशीं नांवें आहेत. हा व्याधी स्त्रियांना होत नाहीं असें कांहींचें मत आहे. स्त्रिया ह्या सुकुमार शरीराच्या असल्यामुळें, रज:प्रवृत्तीसह, त्यांच्या शरीरांतील दोषांचें शोधन झाल्यामुळें आणि फार श्रमाची कामें त्यांना करावीं लागत नसल्यानें त्यांचे ठिकाणीं पुरुषाप्रमाणें वातपित्ताचा विशेष प्रकोप होत नाहीं व म्हणून ह्या व्याधीही त्यांना होत नाहीं, हें विधान मर्यादित अर्थानें खरें आहे. निरपवाद नाहीं. तुरळकपणें स्त्रियांच्यामध्येंही हा व्याधी आढळतो. इंद्रलुप्त (चाई), खालित्य (टक्कल पडणें) रुह्य (सर्व शरीरावरील क्रेंस गळणें) हे विकार पर्याय म्हणून न मानतां निरनिराळे मानले पाहिजेत. तसेंच टीकाकारानें उल्लेखलेल्या इंद्रलुप्त हा दाढी मिशांच्या ठिकाणीं होतो, खालित्य हा डोक्यावरील केसांच्या पुरता मर्यादित असतो व रुह्य याचा परिणाम सर्व शरीरावर होतो, असा केवळ स्थानभेदच मानूं नये. खालित्य आणि रुह्य या रोगांच्या बाबतींत सांगितलेला स्थानभेद योग्य असला तरी इंद्रलुप्त हा विकार दाढी, मिशा व डोक्यावरील केस या ठिकाणींही होऊं शकतो. इंद्रलुप्त विकारामुळें केस कसर लागल्याप्रमाणें दिसतात. ते तुरळक होतात. त्यांची लांबी कमी होते व इंद्रलुप्ताचें क्षेत्र मंदलाकृतींनीं वाढत जातें. कांहीं काळानें तेथील त्वचा केशरहित, रुक्ष व खरखरीत होते. कंडू व दाह हीं लक्षणेंही त्या ठिकाणी क्वचित् संभवतात. हे सर्व विकार कष्टसाध्य व असाध्य आहेत. इंद्रलुप्त नवीन व अल्पप्रमाणांत असेल तर दीर्घ काळाच्या उपचारानंतर बरें होऊं शकते.
चिकित्सा
हस्तिदंतमशी, माक्यानें सिद्ध केलेलें तैल. आमलकी, ब्राम्हीसिद्ध तैलसिद्धघृते आरोग्यवर्धिनी.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP