वात: प्लीहानमुद्धूय कुपितो यस्य तिष्ठति ।
शनै:परितुदन् पार्श्व प्लीहा तस्याभिवर्धते ॥
च.सू. १८/३५ पा. २२७
पञ्च गुल्मा इति वातपित्तकफसान्निपातशोणितजा:, पञ्च
प्लीहदोषा इति गुल्मैर्व्याख्याता:,
च.सू. १९/८ पा. २३२
रक्तवहस्त्रोतसांचें मूलस्थान असलेला प्लीहा हा अवयव डाव्या बाजूला कुक्षीमध्यें असतो. विषमज्वर, जीर्णज्वर, मेदक्षय व इतर वातप्रकोपक व रक्तदुष्टीकर कारणांनीं वाताचा प्रकोप होतो व रक्तामध्येंही वैगुण्य उत्पन्न होतें. या प्रकुपित वातानें रक्त दुष्ट होऊन प्लीहा रोग उत्पन्न होतो. या व्याधीमध्येम प्लीहेचा आकार वाढतो. व त्या ठिकाणीं शूल हें लक्षण उत्पन्न होतें.
प्रकार
वातज, पित्तज, कफज, रक्तज व सान्निपातिक असे या प्लीहारोगाचे पांच प्रकार होतात. वातज प्लीहेमध्ये अल्पवृद्धी, स्त्रंस शूल, अध्मान, उद्गारबाहुल्य, अवष्टंभ हीं लक्षणें असतात. प्लीहेचा स्पर्श कठीण असतो आणि आकार विषम असतो. पित्तज प्लीहेमध्यें वाढलेली प्लीहा स्पर्शाला मृदु असून स्पर्शासहत्वं असतें. दाह, ज्वर, तृष्णा, संताप, कामला, पांडू हीं लक्षणें असतात. कफज प्लीहावृद्धींत प्लीहेचा आकार फार मोठा, कठीण, क्वचित्, मृंदु असतो. वेदना अत्यल्प असतात. व्याधी चिरकारी असतो. हृल्लास, अनन्नाभिलाषा, प्रसेक, शोथ गौरव हीं लक्षणें असतात. रक्तजप्लीहेमध्यें - सर्व लक्षणें पित्ताप्रमाणें असून स्पर्शासहत्व व रक्तप्रवृत्ती हीं लक्षणें जास्त असतात. सान्निपातिक प्लीहा सर्व लक्षणांनीं युक्त, पीडाकंर आशुकारी असते.
उपद्रव
उदर, कामला, रक्तपित्त, अतिसार, छर्दी, दाह. ज्वर.
साध्यासाध्यविवेक
नुकतीच झालेली, वातज व कफज प्लीहावृद्धी कष्टसाध्य असते. व इतर सर्व प्रकार असाध्य आहेत.
चिकित्सा
रोहितक, कुमारी, सर्षप, कटुका, भल्लातक, ताम्र, शिलाजत्, आरोग्यवर्धिनी, रांहितकारिष्ट, कुमारी आसव, गोमूत्र, हरीतकी.
पथ्य
अविदाही, लघु असा आहार, दुग्धाहार श्रेष्ठ.