पौष वद्य ६

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


भरतपूरचा अजिंक्य किल्ला !

शके १७२६ च्या पौष व. ६ रोजीं होळकर आणि जाट यांनीं भरतपूर येथें इंग्रजांचा प्रचंड पराभव केला. बाजीराव, शिंदे, होळकर यांची सत्ता संपुष्टांत आणण्याचे अनेक प्रयत्न इंग्रजांनीं या वेळीं चालू केले होते. दीगच्या लढाईनंतर यशवंतराव होळकर भरतपूरच्या आश्रयास ससैन्य येऊन राहिले होते. सुरजमल जाटाचा नातु रणजितसिंग हा या वेळीं भरतपूरच्या गादीवर होता. यशवंतराव होळकरास इंग्रजावर विजय मिळतात हें पाहून रणजितसिंगासहि अवसान चढलें. यशवंतराव व जाट एक झालेसें पाहून रणजितसिंगासहि अवसान चढलें. यशवंतराव व जाट एक झालेसें पाहून इंग्रजांनीं आपला मोर्चा भरतपुरावर वळविला. २ जानेवारी १८०५ रोजीं भरतपूरच्या किल्ल्यसमोर इंग्रजांचा तळ पडला. भरतपूरचा किल्ला उंच डोंगरावर असून त्याच्याभोंवतीं पाण्याचे विस्तीर्ण खंदक होते. जाट आणि मराठे यांच्यासारखे खंदे वीर हातीं शस्त्र घेऊन इंग्रजांविरुद्ध उठले. पहिल्यानें इंग्रजांचा पराभव झाला. नंतर पौष व. ६ रोजीं त्यांनीं दुसरा हल्ला चढविला. खंदकांच्या लांबी-रुंदीचीं मापें घेऊन इंग्रजांनीं जोराची तयारी चालविली होती. खंदकाच्या एका काठांवरुन पलीकडच्या काठांपर्यंत पोचतील अशा शिड्या तयार झाल्या. सर्व सिद्धता झाल्यानंतर ले. कर्नल मॅकराय, कॅ. लिंडसे या इंग्रज अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखालीं सैन्य खंदकांतूण पार होऊं लागलें. होळकरांचे घोडेस्वार तटाच्या बाहे असून पायदळ मात्र आंत गेलें होतें. किल्ल्यांत येण्याबद्दल भरतपूरच्या राजाकडून आग्रह झाल्यावर यशवंतराव बोलले, "माझी गादी माझ्या घोड्याच्या पाठीवर आहे." इंग्रज सैन्य पार होत असतांना होळकरांच्या घोडेस्वारांनें त्यांना अगदीं बेजार करुन सोडलें. इंग्रजांची अगदीं दुर्दशा उडाली. हिदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासांत भरतपूरचें नांव अजरामर आहे. या किल्ल्यानें इंग्रजांचा चार वेळां पराभव केला. सर्व किल्ले भराभर इंग्रजांच्या हवालीं झाले. पण भरतपूरचा किल्ला मात्र भोंवतालच्या पाण्यांत आपली मुर्दुकीचीं प्रतिबिंबें दाखवीत अभिमानानें त्या वेळीं उभा होता.

- २१ जानेवारी १८०५

N/A

References : N/A
Last Updated : October 04, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP