पौष शुद्ध १३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
केशवस्वामींचे निधन !
शके १६०४ च्या पौष शु. १३ रोजीं समर्थपंचायतनांतील प्रसिद्ध सत्पुरुष भागानगरकार केशवस्वामी हे समाधिस्थ झाले ! महाराष्ट्रांतील संतात तीन पंचायतनें प्रसिद्ध आहेत. निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई व चांगदेव हे ज्ञानेश्वर - पंचायतन, एकाजनार्दन, रामजनार्दन, जनीजनार्दन, विठा रेणुकानंद व दासोपंत हे एकनाथ-पंचायतन व रामदास, जयरामस्वामी, रंगनाथस्वामी, केशवस्वामी व आनंदमूर्ति हें रामदास-पंचायतन, या शेवटच्या पंचायतनांतील केशवस्वामीखेरीज इतर सर्व संत सातारा प्रांतांत शेजारीशेजारीं राहत असत, त्यामुळें त्यांच्या वारंवार गांठी-भेटी होत असत’ परंतु केशवस्वामींचे वास्तव्य मात्र हैद्राबादेस असे. केशवस्वामी मूळचे कल्याणीचे. आत्मारामपंत कुलकर्णी व गंगाबाई या सच्छील दांपत्याच्या पोटीं केशवस्वामींचा जन्म झाला. असें सांगतात कीं, केशवस्वामी वयाच्या पांचव्या वर्षापर्यंत बोलतच नव्हते. परंतु पुढें श्रेमत् आचार्य यांच्या कृपेवरुन केशवस्वामी बोलूं लागले. संमर्थांप्रमाणें यांनाहि गाण्याची अत्यंत आवड होती. केशवस्वामी ‘स्वामी’ असले तरी प्रप्रंची होते. ते व त्यांची पत्नी नेहमीं भगवद्भक्तींत दंग असत. जनतेंत धर्मश्रद्धा निर्माण’ करण्यासाठी हे स्वत: कविता रचून कीर्तनें करीत असत. त्यांच्या पद्यांतून वरवर शृंगाराची छटा असे. गीतगोविंदकर्ते जयदेव कवि यांचेच अवतार म्हणूनहि लोक यांना समजत. यांच्या काव्याबद्दल राजाराम प्रासादी भक्तमंजरीमालेंत म्हणतात,
"जगत्रें जाली कीर्ति । धन्य कृपाळु केशवमूर्ति ॥
उद्धारावया यया जगतीं । जयदेव कवि अवतरला ॥
पूर्वी शृंगार देवाचा । वर्णिता लाचावली वाचा ।
तोचि अभ्यास पडता साचा । अनुकार कवनाचा तोचि पै ॥
अध्यात्मयुक्त शृंगारिक । भाषण जयाचें नेमक ।
जाहलें काव्य तेंचि चोख । प्रासादिक सकल जनां ।"
- १ जानेवारी १६८३
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP