चैत्र व. १
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
मूर्तिमंत पराक्रम फांसावर !
शके १७८१ च्य चैत्र व. १ रोजीं १८५७ च्या स्वातंत्र्य - युध्दांतील मराठयांचे कुशल सेनापति रघुनाथ पांडुरंग उर्फ तात्या टोपे यांना फांशीं देण्यांत आलें.
तात्या टोपे मूळचे नाशिक जिल्ह्यातील येवलें येथील राहणारे. सत्तावनच्या युध्दांत जे सेनापति आपल्या अतुल शौयांनें लढलें त्यांमध्यें तात्याचें स्थान महत्त्वाचें आहे. सर्वत्र पराभव झाल्यावर नानासाहेबास मिळावयास जात असतां मानसिगाच्या विश्वासघातानें टोपे रिचर्ड मीडकडून पकडले गेले ! शिप्री येथें झालेल्या चौकशींत त्यांनीं सांगितलें - “मी इंग्रजी राज्यांत जन्माला आलों नाहीं. तसेंच त्यांचा प्रजाजनहि नव्हतों. मग राजद्रोहाचा आरोप मजवर कसा ? मीं हत्या केली असेन, पण खून, दरवडे, बायकामुलांची हत्या हे प्रकार मी केले नाहींत -” चौकशीचें काम संपल्यावर फांशीची शिक्षा सुनावण्यांत आली. तत्या यत्किचितहि न डगमगता वधस्तंभाकडे निघाले” त्यांनीं आपण होऊन आपली मान गळफांसांत अडकविली, फांस आवळला गेला. ठोकळा उडाला नि एका हिसक्यासरशीं - पेशव्यांचा राजनिष्ठ सेवक, वीर योध्दा, स्वदेशाचा हुतात्मा, धर्माचा त्राता, मानी, प्रेमळ नि उदार तात्या टोपे इंग्लिशांच्या फांसावर निष्प्राण स्थितींत लोंबकळत असलेला दिसला. त्याच्या भोंवतालचा रक्षकगण निघून गेल्यावर गर्दीतून इंग्रज स्त्री - पुरुष पुढें घुसले आणि या पराक्रमी वीराची स्मृति म्हणून तात्याच्या केंसांचे झुबके मिळविण्यासाठीं त्यांच्यांत स्पधा सुरु झाली.”
तात्या टोपे यांचा चेहरा मोठा रुबाबदार होता. - “पांच फूट उंची, धनुष्याकृति भुवया, काळेभोर डोळे, रेखीव नजर व दाढी, मिशा व कल्ले असलेल्या चेहर्यामुळें त्यांची चर्या भव्य दिसे. बुध्दिमत्तेची झांक व अंगांतील कर्तृत्वशक्ति त्यांच्या तोंडावर उघडपणें स्पष्ट दिसून येई.” तात्या टोपे यांचें घराणें देशस्थ ॠग्वेदी असून येवलेकर या नांवानें ते प्रसिध्द होते. एकदां निफाडकर डेंगळे यांच्या मध्यस्थीनें यांना दरबारांत पंच रत्नांची टोपी मिळाल्यानें यांना टोपे या नांवानें प्रसिध्दि मिळाली
- १८ एप्रिल १८५९
N/A
References : N/A
Last Updated : August 30, 2018
TOP