मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|यशवंतराय महाकाव्य| सर्ग तेविसावा यशवंतराय महाकाव्य अनुक्रमणिका सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पाचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग एकोणिसावा सर्ग विसावा सर्ग एकविसावा सर्ग बाविसावा सर्ग तेविसावा सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग तेविसावा श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले. Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय सर्ग तेविसावा Translation - भाषांतर कमलाबाई सावध होते - तिची व नवर्याची ओळख पटते - ‘ जगदवराव पवार ’ असें आपलें खोटें नांव सांगून कमलाबाईस फसविल्याबद्दल मल्हारराव तिची क्षमा मागतो - सर्वांस आनंद होतो - आनंदराव व यशवंतराव यांची व कमलाबाईची भेट - परस्पर आपापल्या हकीकती सांगतात - आनंदरावाचें बोधपर भाषण.श्लोक घडिभरि कमलेला यावयालागिं शुद्धी ।करिति सदुपचारां पावली आत्मबुद्धी ॥अवचित घडतां हा भेटीचा लाभ हर्ष ।उसळुन मनिं आली मूर्च्छना ती तियेस ॥१॥नयन उघडि झाली पूर्ण ती सावधान ।फिरविच परि दृष्टी भोंवताली कदा न ॥भय धरि - नयनांहीं पाहिलें त्या प्रियास ।न बघति जरि आतां होति भारी निराश ॥२॥बहु सुख तिस झालें त्यांत डोळे मिटीत ।स्मरून पतिस गालीं थर्र रोमांच येत ॥वदत हळु “ जरी हें स्वप्न देवा ! असेल ।सुख - कर तरि आतां हेंच राहो खुशाल ! ” ॥३॥मधुर मधुर मंद - स्यंद कीं दुग्ध - धारा ।दयित तिजसिं वाणी बोलला अत्युदारा ॥“ सुदिन च विधि दावी कीं अशी धन्य दारा ।पुनरपि मज भेटे देइ सौख्या अपारा ॥४॥बहुत दिवस झाले भेटलों आज भार्ये ! ।सुखविसि मज शब्दें कां न तूं एक आर्ये ! ॥बळव मजकडे ती प्रीतिनें मुग्ध दृष्टी ।मनिं धरि तव भर्ता जी सुधेचीच वृष्टी ” ॥५॥परिसुन सुख पावे शब्द ऐसे पतीचे ।भ्रम - निरसन झालें त्या क्षणीं सर्व तीचें ॥दचकुन उठताहे स्वस्थळीं स्तब्ध राहे ।सभय निरखुनीयां भोंवती पाहताहे ॥६॥कमल - सदृश नेत्रीं आणुनी अश्रु - वारी ।विनवित सुत - शोक - व्याकुला दिव्य नारी ॥“ सदय दयित माझा भेटसी आज काय ।व्यसन मम न ठावें कीं तुला ? हाय हाय ! ॥७॥तरुण सुगुण पार - त्राण हें ज्यास काम ।करिल तनुज लोका तो उद्यां रामराम ॥म्हणुनिच जगदेवा ! धांव नाथा ! अनाथा ।झडकर यशवंता रक्षणें त्वांच आतां ॥८॥अदय म्हणति लोकीं वीर मल्हारराव ।बुडविल मम वाटे शोक - सिंधूंत नांव ॥म्हणुनिच जगदेवा ! जा तुझा पुत्र आण ।क्षण न दवडिं आतां ! धांव ! माझीच आण ! ” ॥९॥हंसुन मग म्हणाला वीर मल्हार काय ।“ न कर विसर दुःखा सुंदरी ‘ हाय हाय ’ ॥तव सुत यशवंत स्वस्थ आहे खुशाल ।न भय लव हि दावूं त्याजला शक्त काळ ॥१०॥विसर तवहि साध्वी पूर्विं अन्याय केला ।धरुन चरण आतां मागतों या भिकेला ॥म्हणवित जगदेव ख्यात मल्हार मीच ।त्यजुन तुजसिं गेलों निर्जनीं मीच नीच ॥११॥मुलखिं फिरत होतों जाट राजाचिया मी ।लपवुन निज नामा वागलों याच नामीं ॥बघुन तुजसिं तेव्हां गुंतलों मोह - पाशीं ।झटुन झणि विवाहें केलि मी आपुलीशी ॥१२॥सुगुण अतुल रूप श्रेष्ठ जाती कुलीन ।बघुन तुजसिं व्हावा मोह कोणास तो न ? ॥विरह घडुन वर्षे जाहलीं पंचवीस ।फिरुन परि सुखाच्या आज घेतों चवीस ॥१३॥कपट निकट केलें जाचलें हें मनातें ।प्रकट परि न व्हाया धैर्य ही होय मातें ॥मम धनि मज सांगे शत्रुला शोक द्याया ।त्यजुन तुजसिं गेलों त्या क्षणीं मी लढाया ॥१४॥परवशपण मातें दास मी पेशव्यांचा ।प्रभु - चरणिं समर्पी आपुली देह - वाचा ॥प्रबळ रिपु कराया सिद्ध झाला लढाई ।म्हणुन करून गेलों संगरा फार घाई ॥१५॥स्मरुं तरि गत गोष्टी त्या स्थळींच्या किमर्थ ।शुभ समयिं अशा ज्या खेद चित्तास देत ॥पुनरपि तुज पाहूं देव ठेवी जिवंत ।म्हणुन समजतो मी आपणा भाग्यवंत ! ” ॥१६॥सुवचन वदतां हें कंठ आला भरून ।पडत हळुच गालीं नेत्रिंचें वारि जाण ॥स्तिमित सकळ गात्रें खुंटली तेथ वाणी ।द्रवलि कमल - नेत्री ती हि लावण्यखाणी ॥१७॥कर करून पुढारा धांवली रम्य मूर्ती ।बळकट मिठि मारी स्वप्रिया स्फुंदतां ती ॥धरून तिस तयाला चुंबितां तृप्ति नाहीं ।द्रवति जन हि तेव्हां भोंवताले शिपाई ॥१८॥मग सुत यशवंत प्रीतिनें हात जोडी ।चरण - नमनिं माता त्यास आधींच ओढी ॥उरिं धरुन वदे कीं “ बाळका ! लाडक्या ! हें ।शुभ्र मुख तव धन्या मी पुन्हा आज पाहें ” ॥१९॥थरथरवित होता पूर्वि ज्याचा प्रभाव ।रिपुसच, निजधर्मोत्तेजनीं ज्यास हांव ॥षडरिंस परि आतां मात्र जो दे न ठाव ।निरखुन कमलेला पाहि आनंदराव ॥२०॥तपत तप सहोनी जो सदा ऊन ताप ।प्रभु - वर - भजनानें नित्य जाळी स्वपाप ॥वदन - सदनिं राहे श्रीश - नाम - प्रलाप ।निरखित कमला तो बाप दिव्य - प्रता ॥२१॥स्थिति तरि तुमचीही जाहली काय ताता ! ।श्रम सहुन अनंत श्रांत हिंडून तीर्था ॥मजसिं न बघवे हें कांपते चित्त बाई ! ।उठति विषम कैशा यातना या अगाई ! ॥२२॥स्व - जनक - चरणांतें घालि लोटांगणाला ।रडत रडत पोटीं हर्ष ही फार झाला ॥“ प्रियकर मम ताता ! वंदित्ये कन्यका ही ।विण न तव कृपेच्या मागत्ये अन्य कांहीं ” ॥२३॥“ जनक तव सभाग्ये ! वृद्ध मी एकदांच ।तुजसिं बघुन व्हावें इच्छितों तृप्त साच ॥परि मज बघवेना अश्रु येतात भारी ।फिरुन फिरून आतां कोण त्यांतें निवारी ? ” ॥२४॥पुर - पति यशवंत ख्यात मल्हार तात ।पति - रत कमला ती आणि आनंद शांत ॥बसुन निज चरित्रें सांगती एकमेकां ।श्रवणिं अनुभवीती ते पुन्हा हर्ष शोकां ॥२५॥ विविध मिळति जैसे रंग एक ठिकाणी ।पसरिति निजकांती एकमेकांवरोनी ॥परि न उणिव येते तत्प्रभेला तयानें ।सकळ खुलति एका ठायिं तें कोण वाने ! ॥२६॥विरह बहु दिनांचा होय दुर्दैव - योगें ।स्वचरित्र जन जो तो जाहलें त्यांत सांगे ॥अनुपम कृति होती सर्व ही त्या जनांची ।व्यसनिं उदयिं वा जी श्लाघ्य सन्मान्य साची ॥२७॥दवडिलिं कमलेनें संकटीं फार वर्षें ।त्यजित पति दिसेना बाप होणार कैसें ॥कठिण समयिं तीनें सोडिला नाहिं धीर ।प्रभुवर परदेशीं ठेविला पूर्ण भार ॥२८॥हृदयिं उठुन आशा लोपल्या जेंवि लाटा ।विषम सतत बोंचि काळजी जेंवि कांटा ॥परि नच ढळ पावे लेश ही शील तीचें ।म्हणुन नवल वाटे त्या सतीच्या स्थितीचें ॥२९॥कपट - वध कराया बादलें दिल्लिरानें ।झटुन लगट केली त्यांस नाशास हा ने ॥म्हणवुनि यशवंता वानिलें तत्प्रियानें ।सुरस चरित त्याचें ऐकुनी स्तुत्य कानें ॥३०॥स्व - जन - हित कराया युक्ति ज्या पौर - नाय ।करि, बघुन च त्यांतें खिन्न मल्हार होत ॥परि परिसुनि आतां त्याच नानाप्रकारें ।स्तविति बहुत होती विस्मय, स्तब्ध सारे ॥३१॥विरह विषम झाला काळजी काळ फार ।सहन करि तयां तें दुःख झालें अपार ॥कथन हित - करें तें पेशव्याच्या करीतां ।विसरलि कमला स्व - त्याग - रोषास आतां ॥३२॥सरळ सुरस साधी साधुची पोक्त वाणी ।अमृत - मधुर आणी शांत सद्भाव - खाणी ॥परिसलि डफळ्याची तन्मय स्वांत होय ।विमल - चरित बोले योगि आनंदराय ॥३३॥“ जल - निधिवर वारा क्षोभवी थोर लाट ।फुटुन चहुंकडे ती बिंदु घेतात वाट ॥व्यसनिं पडुन आम्हीं तीन ही एक काळीं ।जरि दुरवर गेलों आजि हे भेट झाली ॥३४॥जगिं उपजुन कोणा सौख्य नाहीं मिळालें ।व्यसन - शत मनुष्यें पाहिजे भोगियेलें ॥पडुन सुख - विलासी होति उन्मत्त जीव ।व्यसनिं म्हणति ‘ देवा ! लौकरी धांव धांव ’ ॥३५॥हंसुनि दुडदुडां जें धांअतें मूल भारी ।रमावे निज मनाला वस्तुंनीं सौख्यकारी ॥जंव भयकर कांहीं पाहतां भीति वाटे ।रडुन रडुन बोले ‘ आइगे ! शीघ्र भेटें ’ ॥३६॥किति जरि जगिं दुःखें येउनी वर्षतात ।प्रभु जपत मनुष्या द्यावया हर्ष तात ॥परि सहज न होतो ईश्वराचा प्रसाद ।स्मरण मनिं तयाचें पाहिजे नित्य गाढ ॥३७॥प्रभु - कर निजभक्तां रक्षण्याला समर्थ ।अनय सहन त्यांतें लेश नाहींच होत ॥सतत भय निवारी संकटीं वाट दावी ।किति तरि करूणा त्या ईश्वराची वदावी ! ॥३८॥सुकृत करून घ्यावें याच जन्मीं फळाला ।विसरत हरि नाहीं तो कदा सज्जनाला ॥अपकृति हि करावी या जगीं जी नरानें ।विषम विषच तैसें भोगिजे दुःख त्यानें ॥३९॥स्मरुन धरिति जे जे सत्पयालागिं देवा ।अवचित च सुखाचा सांपडे त्यांस ठेवा ॥निशिदिन दुसर्याचे चिंतिते घातपात ।मरति जणु अकस्मात् सोसुनी वज्रपात ॥४०॥तृषित फिरति जेव्हां लोक सन्मार्गवर्ती ।सुख - जल - नद वाहे त्यास हर्षें पहाती ॥परि खळ निज कर्मे थांबवीती न लेश ।न कळत पडताहे तों गळीं काळ पाश ॥४१॥ममकर हित - कारी त्या स्थळीं सावकारा ।सुजन किसनदासा जाहला दान - शूरा ॥परि मम कमलेच्या रक्षणीं पूर्ण दक्ष ।कुठुन मजसिं ठावें होय हा कल्पवृक्ष ॥४२॥अकरुण तरूणानें बादलें भिल्ल - नाथें ।धरून तिजसिं नेलें दुर्बला स्त्री जनातें ॥म्हणुनिच जणु तीच्या पुत्र - हस्तें मराया ।खल बल - निधि आला धीट मल्हारराया ! ” ॥४३॥अशा गोष्टी तेथें स्मरून करिती मागिल कथा ।निशा गेली सारी हळुहळु कथा त्या न सरतां ॥उजाडाया झालें अरूण उगवे कांति पसरे ।सुटे वारा पक्षी किलबिल करीती सुखभरें ॥४४॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP