मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|यशवंतराय महाकाव्य| सर्ग चौदावा यशवंतराय महाकाव्य अनुक्रमणिका सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पाचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग एकोणिसावा सर्ग विसावा सर्ग एकविसावा सर्ग बाविसावा सर्ग तेविसावा सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग चौदावा श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले. Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय सर्ग चौदावा Translation - भाषांतर कोटा - शहराभोंवतीं मराठ्यांचा गराडा - त्या शहरांत दुष्काळ पडतो - कोटा शहर मराठ्यांच्या स्वाधीन करण्याविषयीं नागरिक लोकांची यशवंतरायास विनंति - यशवंतराय ती मान्य करीत नाहीं - पुण्याच्या दरबारांत घडलेली हकीकत होळकरास कळते - शेवटची लढाई करण्याची मसलत व तयारी - मराठे कोटा शहराचा एक दरवाजा हस्तगत करून आंत प्रवेश करितात - लढाई - यशवंतराय युद्धास निघतो - माता व पुत्र - निकराची लढाई - यशवंतरायाचा पराक्रम - नागरिक लोकांचें आवेशानें व निराशेनें लढणें - मराठ्यांचा जय - यशवंतराय प्राण द्यावयस उद्युक्त होतो - मानसिंग वगैरे त्याचे मित्र त्यास समरांगणांतूनेकीकडे काढतात व त्याची समजूत घालितात - तो रजपूत राजांचें साहाय्य मिळवून मराठ्यांशीं पुन्हा लढण्याच्या हेतूनें जोधपुरास जातो - कोटा शहर मराठ्यांच्या स्वाधीन होतें. आर्या यशवंत शौर्यशाली सावध रक्षूं पुरा बळें पाहे ॥कोटा शहरांतिल जन त्याच्या आज्ञेंत सर्वदा राहे ॥१॥पडले शिथिल मराठे तोफांचा मार बंदही झाला ॥उत्साह धीर तों तों यशवंताच्या मनामधें आला ॥२॥आज उद्यां अरि जातिल भांडुन कंटाळतां स्वदेशाला ॥मोर्चे उठतां मुक्तच आपण होऊं असें गमे त्याला ॥३॥परि जागच्याच जागीं हे गोड विचार राहती सर्व ॥मल्हार तो न जाता घालविता होय त्या जरी शर्व ॥४॥अन्नाची सामग्री सरतां येतील पौर कौलाला ॥शस्त्रें ठेवुन होतिल शरणागत हे त्यजून डौलाला ॥५॥मल्हार हेंच चिंतुनि कोटा - शहरासभोंवती घाली ॥वेढा तेणें आशा यशवंताची प्रनष्ट ती झाली ॥६॥ज्या रजपूत नृपांनीं वचन दिलें साह्य द्यावया मागें ॥एक न त्यांतुन येऊन द्यायाला हात संकटीं लागे ॥७॥बाहेरून ते नृपती आंतुन नगरस्थ भांडते हो ते ॥तरि दक्षणी कदाचित् युद्धा सोडून चालते होते ॥८॥परि तें घडले नाहीं यशवंता न च सुचे तदा कांहीं ॥दिग्भाग शून्य दाही विप्राची वाट सर्वदा पाही ॥९॥जाउन अनंत येइल साधुनियां काम वाटलें नाहीं ॥होउन निराश यास्तव प्रति दिवशीं फार काळजी वाही ॥१०॥हाहाकार उडाला नगरीं दुष्काळ थोरसा पडला ॥भयदा दुःखांबुधिच्या सर्वहि जन भोंवर्यांत सांपडला ॥११॥रस्तोरस्तीं फिरती होउनियां दीन मारिती हांका ॥कळवळती तें पाहुन सज्जन म्हणतात ‘ नेत्र हो ! झांका ! ’ ॥१२॥एकैक मौल्यवान हि विकिती श्रीमंत वस्तु वांचाया ॥कोठून त्या प्रसंगीं सुचतें त्यां गावयास नाचाया ! ॥१३॥माता कितीक बैसति वरती चिंतेंत लावुनी डोळे ॥केविलवाणें रडती शिशु त्यांतें चित्त पाहुनी पोळे ! ॥१४॥काळाच्या तोडांतुन बाळाला सोडवूं धरी आशा ॥मातृ - स्नेहें माता शांतीनें आपुल्या वरी नाशा ॥१५॥व्यर्थ प्रयत्न झाले दिवसभरी मूठ धान्य मिळवाया ॥साश्रु घरीं पति येतो दुःखें भार्येस हेंच कळवाया ! ॥१६॥सरता धान्य नरांनीं पशुंवरती धाड घातलि पहा ! ती ॥घोडीं डुकरें कुतरीं उंदिर ही मांजरें हि जन खाती ! ॥१७॥दुष्काळाची उठली प्रेमळ भगिनी पुरीं महामारी ॥करूनी खटपट झटपट धरुनि जना कितिक नित्य ती मारी ॥१८॥काय करावें आतां ऐशा चिंतेंत यन्मनें जळती ॥कोट्यांतील महाजन यशवंताच्या गृहीं तदा मिळती ॥१९॥यशवंत त्यांस बोले “ सोडुं नका धैर्य लोकहो ! अजुनी ॥पूर्वज - जनाचरित जी रीती विसरून काय होय जुनी ॥२०॥वेशा उठवुन जाइल वाटे मल्हारराव होळकर ॥निज कार्य - साधनांतीं आतां तुमचा करो न घोळ कर ॥२१॥बघतात मराठ्यांच्या हातुन जे सोडवूं कुशल मान ॥जमतात उत्तरेच्या प्रांतांत बलाढ्य ते मुसलमान ॥२२॥रघुनाथराव येतो शूर पुण्याहून त्यांस दंडाया ॥सैन्य प्रचंड संगें घेउनियां शत्र - गर्व खंडाया ॥२३॥मल्हारराव कॊटा सोडुन त्याच्या पळेल साह्याला ॥आपोआपचि जातो काय बळी प्राण देतसां ह्याला ? ॥२४॥राहे जीवित देहीं तोंवरि लढतां रणीं खुशाल मरूं ॥यावच्चंद्र - दिवाकर झटुनी समयास या सुकीर्ति वरूं ॥२५॥जाऊन शरण आतां नाहीं कल्याण होळकर याला ॥केला प्रतिबंध तया नेइल तो सर्व नगर विलयाला ! ॥२६॥झाला असे तयाचा नाश अमित सूड कां न घेईल ? ॥जाळुन नाशुन लुटुनहि त्याच्या न मनास शांति होईल ! ॥२७॥यासाठीं या समयीं बैसुं नका धीर सोडुनी स्वस्थ ॥द्या टक्कर झटुन हठें होळकराशीं पुरांतुनि समस्त ” ॥२८॥हें यशवंत महात्मा बोलुन वच नागरां परत धाडी ॥उत्तेजनपर भाषण करून निराशा मनांतुनी काढी ॥२९॥बसला बसला वाटच मल्हार पहात नीट गोटांत ॥स्वाधीन नगर होइल ऐशी आशा धरून पोटांत ॥३०॥विप्र अनंत यशस्वी येइ पुण्याहून बातमी लागे ॥सत्वर जवळी बाहे सरदार तयांस काय मग सांगे ॥३१॥“ बसलों वेढा घालुन महिने मी तीन या पुरापाशीं ॥सर्व प्रयत्न झाले निष्फळ आतां कराल गत कैशी ? ॥३२॥स्वस्थ असे जरि बसलों होइल परिणाम काय हें कळतें ॥सोडुन कोटा जावें लागेल म्हणून फार मन जळतें ! ॥३३॥कांहीं उणें कराया राव सदाशिव घडि घडि पाहे ॥कानांत पेशव्याच्या सांगाया वेळ साधिल न कां हे ! ॥३४॥पस्तीस तीस वर्षें केल्या त्या ख्यात मीं बहु लढाया ॥परि कोणी हि न टिकला भगव्या झेंड्यापुढें अरि लढाया ! ॥३५॥येईल पेशव्यांची आज्ञा परतावयास त्या आधीं ॥करिं एकदाच हरिहर हल्ला करूनी मनोगता साधीं ॥३६॥इतुके प्रयत्न करूनी कां मी परतेन हात हालवित ॥घेइन कोटा झगडुन नेइन रजपूत दूर घालवित ! ” ॥३७॥ती युक्ती मानवली सर्वां सरदार शूर लोकांला ॥शेवटचा यत्न करूसर्वांचा बेत एकदा झाला ॥३८॥ठरला दिवस तयारी केली मोठी लढावया पूर्ण ॥तरवारी भाल्यांनीं रिपु - सैन्याचें करूं म्हणति चूर्ण ॥३९॥प्रातःकाळापासुन झाली सैन्यांत हालचाल सुरू ॥तों ते नागर सावध सिद्धच निज - रिपु - निवारणास करूं ॥४०॥होते वेढुन चवघे भवते सरदार शूर विख्यात ॥ज्यांचें समरीं कौशल इतिहास - प्रिय जनां असे ज्ञात ॥४१॥दिनरात्र युद्ध करणें आवडलें हेंच त्यांचिया चित्ता ॥जो बाजिराया घाली वळवील न बुद्धिमंत कां कित्ता ? ॥४२॥ती रात्र पौर्णिमेची होती नुकताच चंद्र वर आला ॥पूर्वेकडुन भयंकर भडिमार तटावरी सुरू झाला ॥४३॥पुरवासी ही ठेविति मार मराठ्यांवरी तदा उलटा ॥दोन्ही पक्षांकडल्या भांडति तोफा जयार्थ कीं कुलटा ॥४४॥तों जानराव चढला गुप्तपणें उंच ही तटावरती ॥धीट तयाच्या मागुन वीर मराठे हजार वर चढती ॥४५॥प्रतिबंध त्या तटावर नाहीं झालाच जानरावास ॥वेशीवरती जातां पडले नाहींत त्यास आयांस ॥४६॥‘ हरहर ’ करिति मराठे खरतर तरवारि चमकती फार ॥हल्ला रजपूतांवर करिति न ते जाहले जंव तयार ॥४७॥क्षणभर होय चकामक सांपडले शत्रु मारिले ठायां ॥हाता पायां घायां घेउन रजपूत जाहले जायां ॥४८॥घटकेंत तट मिळाला वेशीजवळील जानरावास ॥रण - मंदिरांत रूचला जन्मभरि श्रेष्ठ ज्या नरा वास ॥४९॥परि त्या वेशाखाली जमले होते अपार नागर ते ॥जिंकुन घेऊं पाहे वेश जळी संकटीं कसा परते ? ॥५०॥त्यानें खूण दिली ती ऐकुन बाहेर जाहले जागे ॥तोफांसहित मराठे त्या वेशीजवळ धांवले रागें ॥५१॥दरवाज्यावर झाली तोफ सुरू ती धुडूं धुडूं वाजे ॥गोळे येति धडाधड आपटती तो ध्वनी नभीं गाजे ॥५२॥होऊन छिन्न गेला दरवाजा उडुन दूरसा पडला ॥आंत घुसायास बळें वेळ मराठयांत योग्य सांपडला ॥५३॥तोफा ओढुन नेल्या मागें, मल्हार येउनी घुसला ॥फुरफुरतां कर गर्जे हर्षें आवेश तन्मनीं वसला ॥५४॥गडबड झाली ऐकुन उठला यशवंटराय खडबडुन ॥मातेच्या चरणाला प्रथम मिठी नम्र घालि कडकडुन ॥५५॥“ माते ! पुरीं मराठे येतात असें मला खचित कळतें ॥जातो पुर रक्षाया दावाया त्यांस केवि मम बळ तें ॥५६॥झालों विजयी जरि तरि येइन मी तुजसिं तोंड दावाया ॥दाविन कीं तव उदरीं जन्म न म्यां घेतला असे वायां ॥५७॥दे आशिर्वा तुझ्या पुत्राला तोच त्यास तारील ॥पुण्य - प्रताप तव कीं वाटे मम सर्व शत्रु मारील ” ॥५८॥कमला यशवंताला पाहुन समरोन्मुखास गहिंवरली ॥“ मी धन्य धन्य माता बाळा प्रसवून यास महिवरली ॥५९॥जा वत्सा यशवंता समरीं तुज लाडक्या विजय येवो ॥प्रभु तव कल्याण करो सांभाळुन तुजसिं संकटीं नेवो ” ॥६०॥दंगा होता तिकडे आला यशवंतराय धांवून ॥अत्युग्र दिसे क्रोधें नगरीं रिपु - सैनिकांस पाहून ॥६१॥आले स्फुरण मुसंडी मारिति डुकरासमान रजपूत ॥त्यांवरि उठति मराठे रागें कीं उठविलें जणो भूत ॥६२॥यशवंतानें केला थोर पराक्रम रणांत त्या काळीं ॥नेटें परि मल्हारी पाउल एकेक तो पुढें घाली ॥६३॥तों प्रळय - मेघ - गर्जन - सम पडला गडगडाट कानाला ॥थरथर हाले भूमी वाटे जाईल काय पाताळा ॥६४॥दक्षिण दिशेस मानी मानाजी स्वस्थ बैसला नाहीं ॥तट घ्यायास हळू हळु खटपट होता करीत तो कांहीं ॥६५॥त्यानें महाश्रमानें सुरूंग केले तयार पांच तदा ॥ते एकदम उडाले झाली त्यांचीच गर्जना भयदा ॥६६॥जों जों तट कोसळतो तों तों तो धडधडाट रव घडतो ॥दुःखा येति उमाळे कीं जाणो तट पुनः पुन्हा रडतो ॥६७॥हर्षें नाचे पाहुन मानाजी वाट जावयाजोगी ॥द्वादश वर्षे तपुनी स्वर्ग - पथा जेंवि पाहतां जोगी ॥६८॥तों द्वारीं बलशाली दोहन येऊनियां उभा राहे ॥रण - कुंडांत अमौल्य प्राणांची आहुती करूं पाहे ॥६९॥झुंझार झुंज तेजः-पुंज महा वीर ते मिळुन करिती ॥ब्रह्मांड - भांड भांडुन पंचानन - गर्जना - भरें भरिती ॥७०॥पडला हटास हटवी दोहन मानाजिला करून वार ॥खवळे अत्यंत तदा तो निज - रिपु - वंश कानन - कुठार ॥७१॥गंगथडींतिल त्यांच्या होते टोळींत लोक सतराशें ॥त्यांतें घेऊन संगें धांवे प्रत्यक्ष काळसा भासे ॥७२॥तेव्हां दोहन टिकला नाहीं मानाजिच्या पुढें फार ॥मूर्च्छा येउन पडला भूमिवरी दोन लागुनी वार ॥७३॥तो अरुणोदय झाला लढतां लढतां उजाडलें पुरतें ॥कल्पांतींच्या जलधी - सम राहे गजबजूनियां पुर तें ॥७४॥वार्ता मानाजीच्या दूत - मुखें कळुन येत विजयाची ॥होळकराला तेव्हां हिंमत लागे सिदूं मग तयाची ॥७५॥‘ हरहरहर ’ गर्जुनियां नेत स्वजनास होळकर पुढती ॥होऊन पुढें नागर यशवंत - प्रमुख एकसर लढती ॥७६॥सैन्यें मराठि सगळीं यशवंताच्या स्थळाकडे वळती ॥कल्पांत - समुद्राच्या लाटांसम नीट येति आदळती ! ॥७७॥कोठें नागर तेव्हां कोठें यशवंतराय हें न कळे ॥गर्जत हांसत धांवत वीर मराठे पुरामधें घुसले ॥७८॥त्या बाजुस मानाजी इकडुन मल्हार दावितो जोर ॥म्हणती टिकेल कैसा यशवंत अजाण कालचें पोर ? ॥७९॥नगराच्या मार्गांतुन सैन्य मराठी बळें फिरूं लागे ॥नागर सागरसिंग - प्रमुख बळी भिउन राहिले मागें ॥८०॥तो यशवंत समस्तां बोलावुन जवळ काय बोलतसे ॥साक्षाद्वाचस्पति ही इच्छिल ऐकावयास बोल तसे ॥८१॥“ वेशीबाहेर अरी घालविल्यावांचुनी बसे स्वस्थ ॥पुरुषार्थास तयाच्या धिक्कार असो ! उठा जन समस्त ” ॥८२॥शेवटचा मग हल्ला केला रजपूत पौर लोकांनीं ॥तो नाद गर्जनेचा बहुधा ब्रह्माचिया पडे कानीं ॥८३॥गच्च्या खिडक्या पांखीं भिंतीवरही निराश भट चढता ॥वेडे रागें होउनि नागर झुंजार झुंज ते लढती ॥८४॥जे एकदा मराठे शिरले शिरलेच नीट नगरांत ॥तैलंग विप्र येउन जाइल तो काय परतुन घरांत ॥८५॥रस्त्यांत राशि पडल्या प्रेतांच्या परि न शत्रु घालविले ॥जाऊन चंबळेच्या उदकीं रक्त - प्रवाह कालवले ! ॥८६॥गोळे धडाड पडती एकसरें तोफ देत दर वाजे ॥बहुधा यमें उघडिले नगरीचे आज सर्व दरवाजे ! ॥८७॥या प्रतिबंधा पाहुन चढला मल्हार फार तो कोपा ॥रस्तोरस्तीं आणुन नाक्यावरि नीट रोंखिल्या तोफा ॥८८॥मान - धनाढ्य महात्मा अरिच्या सैन्यापुढें उभा राहे ॥झाला निराश तेव्हां यशवंत प्राण द्यावया पाहे ॥८९॥तन्मित्र मान सागर विनविति येऊन हात जोडून ॥“ ऐकुन घे यशवंता ! द्यावा हा मृत्यु - हेतु सोडून ॥९०॥अससी जिवंत तूं तरि कधिं तरि आम्ही स्वतंत्रता मिळवूं ॥कळवून स्वपराक्रम हेहि मराथे पुरांतुनी पळवूं ॥९१॥जलधींत मकर तैसे गुप्तपणें या पुरामधें राहूं ॥जें जें घडेल तें तें कांहीं दिन शांत बैसुनी पाहूं ॥९२॥जोंधपुराला जाऊन तेथिल रजपूत तूं हि उठवावे ॥त्यांसह वेगें येउन मारावे सर्व शत्रु लुटवावे ॥९३॥येथें पुन्हा तयारी करितों लढण्यास दक्षणीसंगें ॥तो वीर खरा लोकीं गळतें ज्याचें न धैर्य कीं भंगें ॥९४॥आम्ही तुम्हीहि मिळुनी कोटा - नगरा स्वतंत्रता देऊं ॥ईशापाशीं प्रार्थन करितों तो सुदिन लौकरी येऊ ” ॥९५॥ऐसे बोलुन उचलुन घोड्यावर बसवितो तया शूर ॥वेशींतून सुरक्षित गुप्तपणें देति घालवुन दूर ॥९६॥मध्यान्हाचा आला वेळ अशा समयिं सर्वही नगर ॥झालें स्वाधीन मिठी देति मराठे जसे बळी मगर ॥९७॥श्लोक जेथें तेथें ‘ हरहर ’ असा गाजला शब्द भारी ।तेव्हां भाले बहु चमकले शत्रुला शोककारी ॥नाचे झेंडा समरिं भगवा पौर मेले न थोडे ।गाढें झालें यश महितळीं लोक गाती पवाडे ॥९८॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP