मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|यशवंतराय महाकाव्य| सर्ग दुसरा यशवंतराय महाकाव्य अनुक्रमणिका सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पाचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग एकोणिसावा सर्ग विसावा सर्ग एकविसावा सर्ग बाविसावा सर्ग तेविसावा सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग दुसरा श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले. Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय सर्ग दुसरा Translation - भाषांतर सूर्यास्त - सायंकाळच्या शोभेचें वर्णन - यशवंतराय - त्याची पूर्वीची हकीकत - शहरांतील लोकांचें पत्र - यशवंतरायाचे विचार - माता आणि पुत्र - कमळाबाई यशवंतरायास धीर देते - कमळाबाई वियुक्त पतीचें स्मरण करून दुःख करिते - यशवंतराय तिचें समाधान करतो.श्लोक[ वसंततिलका ] साम्राज्य भू - जलनिधींवर चालवून ।अंधार हाच रिपु या दुर घालवून ॥चंडप्रताप भगवान् दिनराज चाले ।अस्ता, सवें किरण सेवक ही निघाले ॥१॥अस्तास जाय निजनायक हेंबघून ।भू - मंडळावरुन वृक्षशिरीं तिथून ॥हे उंच डोंगरिं गिरींवर राहताती ।तेथून सूर्यकिरण क्षणिं नष्ट होती ॥२॥अर्घ्य - प्रदान दिधलें नियमें द्विजांनीं ।संध्येंत भक्ति - रस - पूरित - मानसांनीं ॥पाथेय तें क्षितिज - मंडल - वासि घेतो ।लोकातरास मग सिद्ध रवी निघे तो ॥३॥होता नभीं तपत जोंवरि सूर्यकांत ।दिव्य प्रभा धरून शोभत वस्तुजात ॥काल - क्रमें बघुन अस्त - गता तयास ।शोकें जणो विकल स्रुष्टि दिसे उदास ॥४॥अस्ता प्रताप - निधि भास्कर जात आहे ।हें विस्मयें जग चराचर पाहताहे ॥येतां समीप तम भीति - भरें समस्त ।झाडें नद्या गिरि - शिरें दिसती तटस्थ ! ॥५॥आकाश हें विमल नील छतासमान ।त्या झालरीसम कडेवरि पिंगवर्ण ॥कांहीं स्थळीं मलिन त्यावरि मेघ दाटे ।नक्षत्र - दीप - शत कज्जल - पुंज वाटे ॥६॥सूर्यांशुंनीं निबिड दुर्गम काननांत ।होता दिला हटवुनी गिरि - गव्हरांत ॥तो अंधकार निज सोडुन आश्रयातें ।धैर्यें पुढें सरून आक्रमितो जगातें ॥७॥गेल्या सकाळिंच वनांत चरावयास ।त्या धेनु धांवति गृहाप्रत यावयास ॥सप्रेम वत्स हृदयांमधिं आठवीती ।पान्हा फुटे स्वपय भूमिस ओपिताती ॥८॥चारा धरून वदनांत विहंग - जाती ।अत्यंत उत्सुक जवें घरट्यांस जाती ॥“ चीं चीं ” पिलें करिति पाहुन एकदांची ।माया पिलांवर किती तरि पांखरांची ! ॥९॥नेणोनि ऊन अणि भूइक तहान यांतें ।काबाडकष्ट करितात धन्यासवें ते ॥शांत स्वभाव हितकारि नरास मोठे ।या वेळिं बैल जवळी करितात गोठे ॥१०॥घोड्यांवरी किति पदीं किति गाडियांत ।चालोनि लांबवर मार्ग निज क्रमीत ॥विश्रांति अन्नउदका मिळवावयाला ।पांयस्त शोधिति उताविळ धर्मशाळा ॥११॥भाजी फुलें फळफळावळ जे पदार्थ ।होते अनेक बसले दिवसा विकीत ॥झाली कशी विकरि होय नफा कशानें ।जाती घरा पुसत लावुनियां दुकानें ॥१२॥काश्मीर, दिल्लि, मथुरा आणि नागपूर ।अन्यस्थळांहुनहि येति लमाण फार ॥तो माल सांठवुन शोभति त्या वखारी ।दाटी जमे गजबजाट नभा विदारी ॥१३॥गंभीर शब्द करूनी करि लोक जागे ।व्हाया तयां स्वहित - तत्पर नित्य सांगे ॥तो चौघडा झडतसे सुर - मंदिरांत ।जो लांब दूरवर ही श्रवणांत येत ॥१४॥आनंद शोक - भय - दुःख - सुखीं वसेना ।कोण्या स्थितींत हि मनुष्य जगीं असेना ॥हृद्भाव - हारि करुणा - रस मिश्र फार ।ऐकेल तो सनइचे अति गोड सूर ॥१५॥होता तया नगरिं राजपथीं अफाट ।वाडा प्रचंड मजबूत जसें कपाट ॥सोई सुखास्तव विराजति जेथ नाना ।होता तिथे बहुत भव्य दिवाणखाना ॥१६॥तेथें असें पुरुष एक बळी विशाळ ।लोडास टेंकुन, गमे नव्हता खुशाल ॥गंभीर सुंदर दयाळु दिसे स्वभावें ।आकृष्ट पाहुनच तन्मुख चित्त व्हावें ॥१७॥रम्याकृती नयन सुंदर थोर काळे ।ज्यांतून तेज भंवते बघतां झळाळे ॥बाहू बळी सरळ नाक कपाळ थोर ।छाती विशाळ विलसे तनु - वर्ण गौर ॥१८॥हा आपुला चरित - नायक सुस्वभाव ।संमानिला पुरजनीं यशवंतराव ॥हा कोण कोठिल असा इतिहास सारा ।मी सांगतो परि न फार करीं पसारा ॥१९॥कोट्यामधें किसनदास पवित्रचित्त ।होता महाजन सुखें वसती करीत ॥संपत्ति होय अनुकूल तयास भारी ।आयुष्य घालवि झिजून परोपकारी ॥२०॥एके दिनीं बघत तो अतिरूपवंत ।स्त्री एक दीन बहु राजपथांत जात ॥शोकें जिचें वदन विव्हळ काळजीनें ।केला प्रवास गमलें बहुकाळ जीनें ॥२१॥मागून डोलकर चार घरीति डोळी ।माथां, हळू हळु गती मधिं चालवीली ॥स्वच्छंद हांसत सुरम्य तयांत बाळ ।ज्या बापुड्या न कळला सुख - दुःख - काळ ॥२२॥मल्हार होळकर घेउन सैन्य चंड ।त्या देशिं येउन बळी बसवीत खंड ॥गांठून त्यास अजमीर पुरासमीप ।युद्धांमधें विजय पावति जाट भूप ॥२३॥झाली पळापळ तदा बहु लोक आले ।कोटापुरीं अभय तेथ तयां मिळाले ॥रस्त्यांत दीन बलहीन पडून मेले ।जाटीं कितीक लुटिले हि धरून नेले ॥२४॥होता असें समजुनी मनिं सावकार ।झालें कृपार्द्र मन पाहुन तीस फार ॥जीतें न ठाउक तिरीप कधीं उन्हाची ।स्त्री थोर संकटिं असे पडली कुणाची ॥२५॥बोलावुनी जवळ तो वदला तियेला ।“ वत्से प्रसंग बहु दुर्धर हा उदेला ! ” ॥निःशंक तूं वस गृहीं मम दुःख टाकीं ।बैसूं नको गहन - शोक - नदी - तटाकीं ॥२६॥कोणाचि ही अससि तूं लडिवाळ कन्या ।कोणाहि तूं वरियलें असशील धन्या ॥जन्में विराजित असो भलता हि देश ।संगोपनीं तव उणें न करीन लेश ॥२७॥युद्धांत या बहुत लोक विपत्ति पावे ।इच्छा अशी मजसिं सर्व सुखी असावे ॥एकास देउं तरि मी शकलों विसावा ।हा श्लाघ्य योग्य अभिमान मला असावा ॥२८॥नाहींच मूल घरिं यास्तव सर्व भासे ।माझ्या मना गृह उदास अरण्य जैसें ॥मातें सुलक्षण तुझा शिशु लाडका हो ।वाढून तो निजशिरीं मम भार वाहे ! ” ॥२९॥ऐसें वदोन तिजला मग जाय सांगे ।पत्नीस जी स्वपतिच्या वचनांत वागे ॥कन्या तुला सुखद नातु असा मिळाला ।ईश - प्रसादच अम्हांवर आज झाला ॥३०॥होता प्रसिद्ध सरदार मराठियांत ।आनंदराव डफळे सुगुणी सुजात ॥होऊं सहाय भट होळकरा निघाला ।तो नर्मदा तरून उत्तर देशि गेला ॥३१॥त्याची सुलक्षण सुता कमला हठानें ।गेली सवें समर - वीक्षण - कौतुकानें ॥तेचें कधीं न वच वत्सल तात मोडी ।माता नसे समजुनी पुरवीत कोडी ॥३२॥होतां पराजय पळे मग सैन्य सारें ।कंठी प्रवास कमलाहि सुदुःख - भारें ॥सोडोनि नूतन विवाहित कांत गेला ।झाली तुटातुट पिता हि दिसे न तीला ! ॥३३॥वीरात्मजा न ढळली लव संकटांत ।होते हि चाकर सवें क्रमणार पंथ ॥पुत्राचिया न चवथा महिना वयाला ।वाटेंत कष्ट तिस यास्तव फार झाला ॥३४॥त्रासून या समयिं सोडिति भृत्य - वर्ग ।गेले त्वरें धरून दक्षिण - देश - मार्ग ॥संपत्तिचें सकळ खेळ जगत्प्रचारीं ।क्लेशांत कोण हि कुणास न कीं विचारी ॥३५॥देशांत दिल्लिपतिच्या लपले मराठे ।कोटापुरीं म्हणून आश्रय साध्य वाटे ॥ती शेवटीं किसनदास - गृहास पावे ।बाळासवें तदुपकार - भरें सुखावे ॥३६॥पुत्रावरी किसन आवड फार दावी ।त्या नाम सुंदर असें यशवंत ठेवी ॥तो वाढ घे हळु हळू शशितें समान ।आशांस ही जननिच्या करि वर्धमान ॥३७॥त्या काळिं शिक्षण म्हणून अवश्य होतें ।पुत्रास थोर सरदार - कुळांत जें तें ॥पावे परंतु यशवंत विशेष दावी ।शस्त्रीं स्वभाव - रुचि वीर बलाढ्य भावी ॥३८॥व्यासंग फार करि बालक संस्कृतांत ।झाला प्रवीण बहु गायन - वादनांत ॥घोड्यावरी बसुन नेम निशाण मारी ।कुस्ती करी चपल दावित शक्ति भारी ॥३९॥शास्त्रें पुराण इतिहास - कथा समस्त ।या होति माहित जुन्या बखरी अनंत ॥चोथाटि तो फिरवि खेळत दांडपट्टा ।मारी निशाण न करूनहि यत्न मोठा ॥४०॥त्याच्या वयास जंव षोडश वर्ष लागे ।तो हा शिपाइ सरदार जनांत वागे ॥घे प्रीति तो सतत साहस संकटांत ।ये तेज तें सहज जन्म जया कुळांत ॥४१॥होती विलक्षण कुशाग्र - समान बुद्धी ।व्यासंग - योग तिस होउन होय वृद्धी ॥ज्या ज्या कलांत किसनें गुरू आणवीले ।त्या त्या कला स्व - वश हा करि अल्प - काळें ॥४२॥झाले सुपुष्ट बलशालि विशाल दंड ।विस्तार छातिसहि मान भरे उदंड ॥झालें तयार जणु चित्रच तें शरीर ।आस्था धरून करितां श्रम नित्य फार ॥४३॥लोकांमधें मजसिं मान कसा मिळेल ।लक्ष्मी तिची बहिण कीर्ति कशी वळेल ॥चिंतेस या उगम होय सवें जयाच्या ।तारूण्य लागत मुखीं उमलों तयाच्या ॥४४॥नाहीं ठिकाण जनका न पतीस कोठें ।जावें स्वदेशिं न असें कमलेस वाटे ॥कीर्ती वरील गमलें यशवंत हातें ।आशा धरी विधि असो अनुकूळ यातें ॥४५॥जाती सुखी असुखि सर्व़च लोक जेथ ।स्वीकारि तो किसन सज्जन मृत्यु - पंथ ॥ओपोनि सर्व हि धनें यशवंत - हस्तीं ।त्यांची प्रिया सहगती करी पुण्य - मूर्ती ॥४६॥आयुःपथीं किसनदास करी प्रचार ।ज्या रीतिनें धरि तिला यशवंत धीर ॥या कारणास्तव न कोणि तयास निंदी ।गायास तद्गुण - गणां जन होति बंदी ॥४७॥तो हा पहा गढुन जाय महा विचारीं ।सत्पत्र एक दिसतें पडलें पुढारीं ॥तें घे करें मधुन वाचुन ठाकि खालीं ।सोडी सुदीर्घ सुसकार फिरे महालीं ॥४८॥बोले मधेंच कमला - सुत आपणाशीं ।थांबे बघे निरखुनी मग आसपाशीं ॥पत्रांत काय मजकूर असे लिहीला ! ।ज्यानें गढूळ यशवंत - समुद्र केला ॥४९॥“ श्रीमंत सद्गुण - निधी यशवंत राया ।विज्ञापिती तुजसिं लोक पुरांतलें या ॥तें जाणण्यास्तव तुवां निजचित्त द्यावें ।वाटेल जें विहित तें मग आचरावें ॥५०॥साहूं शको छळ न मोंगल दुर्जनांचा ।विश्वास जीवित - धनीं न धरों पळाचा ॥त्रासें म्हणों म्हणुन बंड उभें करावें ।जावें मरून परतंत्र कधीं नसावें ॥५१॥जी आज भूषण - गती अमुची उद्यां ती ।झाले अनावर न मोंगल सौख्य देती ॥सर्वस्व जाउन सुखा मुकली प्रजा ही ।गेला स्वदेश परकीय - करांत पाहीं ॥५२॥दे साह्य, ये म्हणुनि आमुचिया कटांत ।आम्हीं जिवावर असों उठले समस्त ॥तूं शूर साहसि कृतज्ञ महानुभाव ।वाखाणिती नवरवासि तुझा स्वभाव ॥५३॥हें पत्र यास्तव लिहू शकलों उदारा ! ।तूतें, तुझा भरंवसाचि अम्हांस सारा ॥दे सूचना जरि न हें तुजला रुचेल ।वागूं तसे मग उपाय जसा सुचेल ॥५४॥जाऊं समस्त जन रोहनसिंग - गेहीं ।ये मध्यरात्रिस करूं मग चिंतना ही ॥सर्वस्व नाशुन हि देश करीन मुक्त ।ऐशी जरी तुजसिं हिंमत येइं तेथ ” ॥।५५॥होताच भूषण - वधें खवळून गेला ।हें पत्र पाहुन मनांत असे म्हणाला - ॥“ मी आजपासुन करीन अनेक यत्न ।आणीन सोडवुन सुप्रिय देश - यत्न ॥५६॥झाले न काय विजयी समरीं मराठे ? ।जाईन मी तरून जाउन त्याच वाटे ॥जिंकी न काय यवनां भट बाजिराय ? ।मी यत्न ही जरि करीन अशक्य काय ? ॥५७॥गेली प्रजा पिळुन देश धुळी मिळाला ! ।हा दुर्मती मुसलमान छळी अम्हांला ॥पाहोनि हेंमन कसें करपून जातें ! ।घ्यावा यथेच्छ तरि सूड मनांत येतें ॥५८॥हा भूषणा ! प्रियसख्या ! किति तूं उदार ! ।कोट्यास भूषण च तूं अतिरम्य शूर ॥घेईन सूड जरि मी न तुझ्या वधाचा ।माझा जगीं जगुनिया पुरुषार्थ कैंचा ? ॥५९॥हा हा ! परंतु फिरली जरि दैव - सत्ता ।होईल केंवि तरि नेणतसें अवस्था ॥प्राआण मुकेन धन होइल राज - दाय ।भीतों न यास - परि माय करील काय ? ॥६०॥पाहे विहंग गगन - स्थित लांब देश ।तैसा विचार धरि धांव न शांति लेश ॥आवेश आस भय हर्ष असे विकार ।होती मनीं वदनिं बिंबित दीसणार ॥६१॥माता प्रवेश इतक्यांत करी महालीं ।साध्याच शुभ्र परि जी वसनास व्याली ॥गोरा सुवर्ण न सुवर्णन होय ज्याचें ।आकार उंच मुख वर्तुळ रम्य तीचें ॥६२॥होतें जरी तिजसिं वर्ष न चाळिसावें ।दुःखें उतार वय जीस परी दिसावें ॥साध्वी सुशील कमला यशवंत - माता ।प्रेमें वदे बहु सचिंत सुता पहातां ॥६३॥“ बाळा ! असा करिसि तो कसला विचार ? ।चिंता कशास्तव ? उदासपणा हि फार ॥ये सांग बैस जवळी यशवंतराया ।सांगेन युक्ति कुशली तुजला कराया ॥६४॥बाळा असेल जरि जीव तुझा खुशाल ।अत्यंत सौख्य मज होइल सर्वकाल ॥भोगीन हाल विसरेन हि दुःख - जाळ ।राहीन ठेविल जसें प्रभु तो दयाळ ” ॥६५॥तो बोलला, - “ हुसकुनी यवनां यमांतें ।द्याया करीति कट बाहति लोक मातें ॥मी वीर - पुत्र असल्या बिकट प्रसंगीं ।राहूं सुखे घरिं बसून कसा पलंगीं ? ॥६६॥तूंबोलसी मम पिता अति शूर होता ।संग्रामसिंह निजशत्रुस भीति देता ॥मागें सरेल तरि हा सुत कां तयाचा ? ।या वेळिं कां न अभिलाष धरी यशाचा ? ॥६७॥धिक्कारूनी सकळ ऐहिक जाण सौख्य । माते ! रणीं मरण जें गणितात मुख्य ॥तें प्रप्त या जरि तुझ्याच सुतास झालें ।व्हावें कसें मग तुझें ? मनिं हेंच आलें ” ॥६८॥ दावी तदा जननिला यशवंत पत्र ।की पौर ज्यांत करुं इच्छिति शत्रु - सत्र ॥बोले तदा मधुर ती कमला स्वरानें ।आनंदजा पुसुनि अश्रु जला करानें ॥६९॥“ मी वीर- दार म्हणवीं आणि वीर - कन्या ।झालें तुझ्यासम सुता प्रसवून धन्या ॥निश्चिंत जा कर सुखी तव देश - बंधू ।मी वारिलें म्हणुन लोक मला न निंदू ! ॥७०॥जन्मास जे भुवनि वीर - कुळांत ये ती ।त्यां स्वस्यता घरिंबसून कुठून ये ती ? ॥कर्तव्य साधु - जन - संमत तें तयांचें ।लोकोपचार - सुख - रक्षण पाहण्याचें ॥७१॥माझी किमर्थ करितोस बसून चिंता ।संतान तूं मम असें निज - शत्रु - हंता ॥आम्हीं मुली न डफळे - कुळिंच्या अजाण ।या संकटा सुविषमास मनांत आण ॥७२॥जाईल कीर्ति करुनी जरि बाळ माझा ।लावून नश्वर शरीर अशाच काजा ॥नेलें न जोंवरि अचिंत्य सुखांत काळें ।तत्कीर्ति - देह बघुनी निववीन डोळे ॥७३॥येतां वयांत धरिता कुल - पद्धती तें ।तूं पुत्र भूषण विराजसि सत्कुलातें ।नाहीं पिता जवळ हें तव पाहण्यास ।आयास फार घडती म्हणुनी निवास " ॥७४॥हें बोलतां वचन सद्गद कंठ झाला ।अश्रु - प्रवाह नयनांतुन थोर आला ॥तेव्हां रडे सुत हि बोलतसे तियेला ।“ तूं व्यर्थ शोक - गहनीं बुडसी कशाला ? ॥७५॥येईल तो सुदिन भेट यदा पित्याची ।होईळ हीच मम धांव असे मनाची ॥जे वायु - वेग - वश मेघ दिगंतरास ।गेले न काय मिळतात परस्परांस ? ॥७६॥मी काल रात्रिं निजलों असतां प्रभातीं ।स्वप्नीं पिताबघितला मम दिव्य - कांति ॥आलिंगुनी मजसि आश्वासनास देई ।तूंतें हि पाहुन सद्भाद - कंठ होई ॥७७॥बोले ‘ असें घडविलें हत - दैव - योगें ।व्हावा अम्हां विरह काय उपाय सांगें ? ॥राहेल जीव मम जोंवरि या शरीरीं ।दोघां तुम्हां त्यजुन जाइन मी न दूरी ’ ॥७८॥आशांकुरोद्भवन जें हृदयांत झालें ।येईल काय तरि सत्फळ त्यास काळें ॥कां तें न येइल ? जरी परमेश्वराची ।इच्छा असेल तसली करुणाकराची ॥७९॥दुःखें न काय मम मानस याच पोळे ।दैवापुढें परि न कांहि उपाय चाले ॥दीर्घ - स्वरें तुज न दुःख असो म्हणून ।एकांति बैसुन किती रडलों असेन ? ॥८०॥तूं देसि धीर मम केवळ धीट आई ।तेणेंचि निश्चय जयीं मम चित्त होई ।माझा परंतु असता जरि बाप येथ ।तो दाविता सरळ एकचि नीट पंथ ॥८१॥कर्त्यव - कर्म - करणीं उपदेश - कर्ता ।येतां महव्यसन तारून पार नेता ॥तो एक देउं शकणार असाध्य अर्थ ।तस्मात् पिता न जरि सर्व असून व्यर्थ ! ” ॥८२॥सुमहित कमला ती निर्मलानर्घ्य - शील ।सदय - हृदय तीचा श्लाघ्य विख्यात बाळ ॥करिति विविध गोष्टी या प्रकारें विचित्र ।स्मरुन रात - कथा तो जाहली मध्य - रात्र ॥८३॥नर खग मृग घेती शांत निद्रा सुखाची ।किरकिर सुरु झाली रात्रि - कीट - स्वरांची ॥दुमदुमत नगारा जाहला थोर कर्णा ।ध्वनि हळुहळु येतां तोषवी प्राणि - कर्णा ॥८४॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP