मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|यशवंतराय महाकाव्य| सर्ग एकोणिसावा यशवंतराय महाकाव्य अनुक्रमणिका सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पाचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग एकोणिसावा सर्ग विसावा सर्ग एकविसावा सर्ग बाविसावा सर्ग तेविसावा सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग एकोणिसावा श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले. Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय सर्ग एकोणिसावा Translation - भाषांतर कमलाबाईचा पिता आनंदराव डफळे याची व मल्हारराव होळकराची गांठ व संभाषण - आनंदराव आपली हकीकत सांगतो - पराभवानें झालेली दुर्दशा- परोपकाराचें कृत्य - त्याचें फळ चौदा वर्षेपर्यंत तुरुंगांत राहणें - तेथून सुटका - वैराग्य.श्लोकमल्हार तैसें यशवंतराजया । बोलून सांगे दुरि न्यावया तया ॥झालें विनाकारण खिन्न मानस । वाटे जगीं जीवन त्या जसे विष ॥१॥भृत्यांस राहूं जवळी न दे स्थित । बैसे उगा तो सुसकार टाकित ॥खायास प्याया नच घेत आवडी । चिंता कशाची कळवी न एवढी ॥२॥तों सेवकें येउन आंत वंदिलें । नम्र स्वरें होळकरा कथीयलें ॥“ गोंसावि दारीं तुज भेटुं इच्छितो । आज्ञा कशी यास्तव वाट पाहतों ” ॥३॥ठेवावया उत्तर देशिं भूपती । धाकांत मल्हार झटे महामती ॥प्रत्येक होते दरबारि हिंडत । तद्दोत नानाविध - वेष - संयुत ॥४॥“ गोसावि जो राहि उभाच बाहिर । माझा न तो हरे असेल कीं तर ॥पाहीन त्यातें दवडून न क्षण ” । बोले असें चिंतुन शौर्य - लक्षण ॥५॥“ बाहेर जाऊन तयास घेउन । ये आंत होवो मजलागिं दर्शन ” ॥आज्ञेप्रमाणें मग जाय चाकर । गोंसावि तो घेउन येइ सत्वर ॥६॥“ द्वारीं उभा जाउन राहिं बाहेरी । येऊं नको देउं कुणास अंतरीं ” ॥भृत्या असें सांगुन वाक्य बोलला । योगीस तो होळकर प्रधी भला ॥७॥पाळें जशीं दूरवरी जमीनिंत । जाऊन वृक्षासबळत्व आणित ॥सर्वत्र तैसें मम दूत हिंडती । मंत्रें अरी यास्तव जिंकितों किती ॥८॥आहेस तूं दूतच एक जाणतों । केला तुला काय हुकूम नेणतों ॥सांगितलें काय कुणा करावया । ध्यानांत नाहींच रहात माझिया ॥९॥हें योगिनाथें परिसून सत्वर । केलें तदा होळकरास उत्तर ॥“ जैसा तुम्हां मी सिसतों असें तसा । मी हेर नाहीं मज कां करीतसां ? ” ॥१०॥मल्हार बोले “ मग काय कारणें । आलास येथें मज शीघ्र सांगणें ॥माझी तुझी भेट कधीं न जाहली । कां आज इच्छा मज पाहुं धांवली ? ” ॥११॥गोंसावि तों बोलत काय भाषण । “ केलें अहा ! निर्दय कीं तुवां मन ॥होता असा काळ जयांत दास हा । पावे तुझी सुप्रिय मित्रता पहा ॥१२॥एका स्थळीं बैसुन गोष्टि बोललों । एका स्थळीं दावुन शौर्य वाढलों ॥सव्वीस वर्षे जरि यास लोटलीं । माझी तुला विस्मृति काय जाहली ? ॥१३॥शौर्ये स्वकीयें समरीं महाबळी । जो शत्रु - कीर्ती हरिता स्थळीं स्थळीं ॥आनंद मी हा डफळे कुळांतला । आहें पहा ओळखिसी न तूं मला ? ” ॥१४॥आनंद होऊन विरक्त हिंडतां । पाहे कसा तो कमलेचिया सुता ॥कन्या - सुता जाणुन त्या रडे बळी । ही गोष्ट मीं मागिल सर्गिं आणिली ॥१५॥आनंद तो रक्षण नातवा करूं । सन्मित्र दृष्टी पडतां सुखा वरूं ॥गोटांत तो त्या समयास पातला । आला त्वरें होळकरास भेटला ॥१६॥खाणाखुणा पूर्ण पटून पोंचल्या । चित्तीं सुखाच्या लहरीच ऊठल्या ॥स्वानंद भारी जरि दाखवी निका । मल्हार कांहीं दिसला गमे फिका ॥१७॥तो बोलला “ बा सदया ! सुहृत्तमा ! । आनंदराया ! सुगुणा ! मनोरमा ॥नेलीं कशीं हीं इतुकीं तुवां दिनें ? । कां धन्य केलें न मला स्वदर्शनें ? ॥१८॥जाटांसवें तुंबळ युद्ध जाहलें । तेथें मराठे अपकीर्ति पावले ॥पासून तेव्हां घडलें कसें कसे । आनंद तो होळकरा कवीतसे ॥१९॥“ सैन्यें मराठी पळतां चहूंकडे । वाटे मला तें अतिथोर सांकडें ॥कीं लागला डाग यशश्शशीस हा । मानी जना दुस्सह होय तो पहा ॥२०॥विख्यात माझ्या पथकांतले भट । एकेक गेले फुटुनी भयावृत ॥मीं एकटा वैभव - हीन चाललों । जावें कुठे निश्चय हा न पावलों ॥२१॥पायीं स्ववेषांतर मी करूनियां । देशामधें हिंडत चाललो तया ॥गांवांत एके दिनिं एक पोंचलों । जें वृत्त झालें तुज तेथ तें कळो ॥२२॥विस्तीर्ण देऊळ सुरम्य पाहिलें । विश्रांति घेऊं क्षण चित्त धांवलें ॥तो पाहिले त्या स्थळिं राज - पुरूष । होते तिथे हिंडत जे अहर्निश ॥२३॥सुरालयीं सावध ज्यास कोंडुन । करूं पहारा खपतात हे जन ॥असे असा कोण पुरूष बंदिंत । कळावया हें मन होय उत्सुक ॥२४॥विघ्नाविणें सत्वर आंत जाउन । मीं पाहिला तो गुणवंत सज्जन ॥जो कृष्णदासाख्य धनाढ्य वत्सल । कोटा - पुरींचा रहिवासि सत्कुल ॥२५॥यात्रार्थ तो हिंडत हिंडत स्वयें । घेऊन कांहीं परिवार तेथ ये ॥कांहीं शिपाई तंव येति त्या स्थळीं । त्या कृष्णदासाप्रत वेढिती बळी ॥२६॥या सावकारा छळण्यास दुर्मती । धाडी शिपाई अजमीर - भूपती ॥पूर्वीच होतें मनिं वैर सांठलें । तें आज घ्यावें उगवून वाटलें ॥२७॥औदार्य कर्णासम थोर ज्या असे । संपत्ति दासीसम यद्गृहीं वसे ॥शुद्धस्वभावें व्यसनार्त तो जन । पाहून माझें द्रवलें तदा मन ॥२८॥जाऊनियां धैर्य दिलें तयास मीं । झालों श्रमी पाहुन त्याजला श्रमी ।संगें तयाच्या दिन कांहीं राहिलों । तत्स्नेह विश्वास विशेष पावलों ॥२९॥स्वप्राण पाशीं स्वयमेव गुंतवीं । आयुष्य खर्चूनि ही यास सोडवीं ॥आला असा हेतु मनांत माझिया । मी सज्जलों त्यावरी करूं दया ॥३०॥रक्षूं स्वदेहा परजीव खर्चुनी । तो ही महात्मा नच आयके गुणी ॥येतात जे सज्जन संकटामधें । शोभा तयांची कृति त्यांस फार दे ॥३१॥‘ गजेंद्र - लक्ष्मी तुज ईश्वरें दिली । व्ययें तिच्या कीर्ति मिळे तुला भली ॥परोपकारीं तव हेतु आगळे । तुझी जगातें उपयुक्तता कळे ॥३२॥प्राणांस भीती तव संकटांत या । यत्नें तयां पाहिन वांचवावया ॥घे साधुनी संधि अशी कशी मिळे । हानी तुझी चिंतुनि चित्त हें जळे ॥३३॥तूं वांच बा शंभर आणि वत्सर । होई अनायांस सदा दयाकर ॥दे निर्ग्रुहाला गृह दुर्गता धन । साधीं सख्या दीन - जनावलंबन ॥३४॥देऊळ लक्षावधि राहुं दे उभें । येवोत विद्वान् शतशा तुझ्या सभे ॥जे यज्ञ - कुंडांतुन धूर चालती । होवो तुला तीच सुलोक - पद्धती ॥३५॥आयुष्य सद्धर्म - पयेंचि घालवी । कीर्ती दिगंता अतिपुण्य पाठवी ॥बा कृष्णदासा ! पळ येथुनी भला । कामीं तुझ्या खर्चिन जीव आपुला ’ ॥३६॥ऐशा प्रकारें करूनी सुबोधन । वेगें पळाया वळवून तन्मन ॥मी लागलों संधि पहावया जपूं । त्या सोडवाया दिनरात्रही खपूं ॥३७॥मीं वेष माझाच मराठि त्या दिला । त्यातें, तयाचा निज देहिं घेतला ॥एक्या पहांटेस शिपाइ निद्रित । पाहून केलें झणि त्या पलायित ॥३८॥जागे शिपाई करितात ओरड । झाला घसा ओरडुनीच कोरडा ॥धांवूनियां धुडिति सर्व ही स्थळें । कैदी कुठे जाय न तें तया कळे ॥३९॥रागें मला येउन ताडिती बळें । पोटांत संताप तयांचिया जळे ॥‘ वाणी कुठे जाय लपून तो बसे । सांगें तरी जीव तुझा रहातसे ’ ॥४०॥बोलोनियां यापरि ताडिती मला । कांहीं नफा त्यांस परी न जाइला ॥जो मीं अबोला धरिलाच एकदा । नाहींच तो सोडियला पुन्हा कदा ॥४१॥जो हादवैरी नृपतीस भासला । कैदी असा सांपडुनी गमावला ॥पोटांत भीती म्हणुनी उठे महा । झाली तयां लाज विशेष तैं पहा ॥४२॥घेऊन मातें मग राजसंनिध । गेले तदा जाट शिपाइ दुर्मद ॥मी राहिलों त्या नृपतीपुढें उभा । ज्याच्या मुखीं शोभतसे जयप्रभा ॥४३॥त्यानें मला ओळखिलें ह्मणे ‘ अरे ! । हा दुष्ट यायास पुढें कसा सर ? ॥हा मत्त नाईक मराठि जाणतो । जो आपणा शौर्य - बलाढ्य मानितो ॥४४॥कां रे तुवां खालति मान घातली ? । कीं आज जिव्हा तव बद्ध जाहली ॥सैन्यें मराठी जमवून तेधवां । विध्वस्त केला मम देश कां तुवां ? ॥४५॥षण्मास रात्रंदिन घोडियांवरी । बैसून मंत्री जपले बहूं परी ॥नाहींच निद्रा मज लागली क्षण । तेव्हांच झालें मम देश - रक्षण ॥४६॥तो मी तुला सोडिन आज काय रे ? । त्वां ओढिला मृत्यु धरूनियां करें ! ॥बंदींत आधीं दिन कांहिं घालवीं । आशा - लता घेउ तुझी न पालवी ’ ॥४७॥कारागृहीं वाक्य वदून यापरी । न्यायास दूर स्वसभेंतूनी करी ॥मी घालुनी खालति मान चाललों । त्या संकटीं क्लेश न लेश पावलों ॥४८॥जेव्हां करीं शूर हि शत्रु सांपडे । तेव्हा दया दाखविणें तया पडे ॥सन्मान देती जित शत्रुला गुणी । ही गोष्ट भालीच कधीं न तन्मनीं ॥४९॥एकेक वर्षासम भासले दिन । चौदा असे वत्सर होय बंधन ॥ज्या ज्या व्यथा संभवती मनाप्रत । त्या लागल्या होउं मलाहि सांप्रत ॥५०॥आला किती वेळ नभामधें रवी । शोभाभरें भूमि - तळास तोषवी ॥माते तयाचा उपयोग कासया । मीं एकदां पाहियला न तो कसा ! ॥५१॥नाना चमत्कार - युता सवैभवा । सृष्टी मला काय असून तेधवां ? ॥खोलीच माझें जग त्यांत मी धनी । स्वातंत्र्य स्वप्नामधिं मात्र ये मनीं ॥५२॥हातीं विडी पायिं बिडी सदा असे । खायास ही पोटभरी कधीं नसे ॥ऐशा स्थळीं राहुन देह वांचला । याचा चमत्कार गमे अतां मला ॥५३॥कारागृहीं मात्र कुडी वसे मन । देशांतरा दूर करीत लंघन ॥एका स्थळीं राहि कधीं न तें स्थिर । चिंता नव्या भोगित मात्र दुर्धर ॥५४॥वेळीं अवेळीं कमला - स्मृती घडे । तों जीव चिंता - जलधीमधें पडे ॥स्वप्नांत पाहून सुतेस हर्षलों । कित्येक वेळां दचकून ऊठलों ॥५५॥जो मी मराठा सरदार केसरी । अत्यंत शोभेस पुण्यामधें धरीं ॥उत्कर्ष - कालीं रडवूनियां अरी । दुर्भाग्य गेलों निजशत्रुच्या करीं ॥५६॥कारागृहीं मी हतभाग्य सांपडें । वाटे जगीं निज्फळ जन्म हा घडे ॥ जों मान जें सौख्य किज्यास वारूळीं । त्याचा मिळे लेश मला न त्या स्थळीं ॥५७॥त्या कोठडीच्या खिडकींतुनी वरी । पाहे तदा धार दिसे नभोंऽतरीं ॥स्वच्छंद पंखां पसरून चालली । माझ्या मनीं मत्सर - बुद्धि जाहली ॥५८॥पशूंस पक्ष्यांसहि जी स्वतंत्रता । मिळे वनीं वा गगनांत हिंडतां ॥तियेस भोगूं प्रतिबंध माणसा । मनुष्य ठेवी सुविचार हा कसा ? ॥५९॥संज्ञापलों एक दिनीं सकाळीं । तोडूनियां बंधन गर्दि केली ॥आला शिपाई धरिलें तयाला । एका क्षणीं तो हत - वीर्य केला ॥६०॥खङ्गास त्याच्या हिसकून धांवें । तों स्वार तेथें झणि एक पावे ॥मीं घातली त्यास उडी धराया । तो कोसळे खालिं तयाच ठायां ॥६१॥घोड्यावरी बैसुन धांव घेतली । मागून गर्दी मग फार जाहली ॥दैवें दिला हात म्हणून वांचलों । स्वातंत्र्य माझें प्रिय पूर्ण पावलों ॥६२॥रानोमाळीं हिंडुन दमलों मम कन्या ॥शोधायाला सांपडली ती नच धन्या ॥संसाराचा वीट मला ही मग आला ॥वैतागानें वेष असा मीं मग केला ॥६३॥हृदय विटलें माझें तेव्हां जगांतिल वस्तुंला ॥हरि - हर - पदीं तें लावोनी हितार्थच साधिला ॥मम तनु झिजो अन्यासाठीं निरिच्छपणें सदा ॥म्हणुन झटलों कामक्रोधां करूं जित दुःखदां ॥६४॥गेलों गंगोत्रिला मी हिमनग चढुनी श्रीहरिद्वार पारी ॥काशी - रामेश्वरीं श्री रघुपति नगरीं श्री जगन्नथ दारीं ॥लीला श्रीकृष्ण जेथें घडवित मथुरा - द्वारका - गोकुळांत ॥जावोनी क्षेत्र - तीर्थें सकळ बघितलीं जाहलें चित्त शांत ॥६५॥भोगुन दुःख सुखादि जगांतिल मी श्रमलों ।हेतु उरे मम एकचि तो तुजलागिं कळो ॥आणुन मैत्रि मनीं अपुली बहुतां दिवसें ।घालुन आण सुजाण सख्या विनवीत असें ” ॥६६॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP