मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य| अध्याय एकोणिसावा श्रीमद् आद्यशंकराचार्य श्री शंकराचार्य वंदना अनुक्रमणिका अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा श्री शंकराचार्य आरती श्री शंकराचार्य वंदना - अध्याय एकोणिसावा निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र. Tags : marathipothishakaracharyaपोथीमराठीशंकराचार्य अध्याय एकोणिसावा Translation - भाषांतर जगद्गुरु श्री आदिशंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥कैसा झाला शास्त्रार्थ । मंडनमिश्र झाले पराभूत । पत्नी उभी करण्या वाद । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥शंकराचर्य बसुनि एकांती । केंद्रित करिती आपुली मती । लाविण्यास तत्वांची सुसंगति । उपनिषदांचे पाठ करिती ॥३॥विसरले कांही काळापुरते । ध्येय जे साधायचे होते । नसते विघ्न अडवी मार्गाते । त्याचे निवारण आधी करणे ॥४॥कैसी झाली सृष्टीरचना । प्रश्नोपनिषदातील वर्णना । वाचता येई स्पष्ट ध्याना । प्राण रयीचे मैथुन ॥५॥बृहदारण्यकोपनिषदांतील । सुस्पष्ट करिती संदर्भ । ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रम । कैसे घडते साहचर्य ॥६॥हळूंहळूं उकले कोडे । उमाभारतीने कां घेतले साकडे । प्रश्न नव्हते तिचे वाकडे । उत्तरी, वेदान्ताचे मर्म ॥७॥इथून पुढे घालता वाद । शारदेचेच धरावे पाद । नकळत उठतील अनंत नाद । मार्ग पुढील दाविण्या ॥८॥ही नव्हे उभयभारती । साक्षात् प्रकटेल सरस्वती । कुंठित होईल माझी मति । तिच्याशी वाद घालता ॥९॥लोकव्यवहार जपण्यास । लज्जित करावे शारदेस । हेहि संकट टाळण्यास । उपाय उरला एकमात्र ॥१०॥ग्रंथ लिहून काढावा । उभयभारतीस अर्पावा । जाणोनिया मनीच्या भावा । स्वीकारेल ती योग्य मार्गा ॥११॥आचार्य गढले लेखनांत । किती काळ गेला, नाही ध्यानांत । शिष्य धास्तावले मनांत । कालावधी संपत आला ॥१२॥अखेर एकांत मोडुनि । शंकराचार्यांसमोर जाऊनि । दिलेली छाटी पुढे करोनि । म्हणति चलावे महीष्मतीस ॥१३॥अमरक राजाच्या राज्यांतील । एकान्त होता संपणार । ‘ अमरुशतक ’ ग्रंथ कामशास्त्रावर । लिहून झाला संपूर्ण ॥१४॥शिष्यांसहित शंकराचार्य । पोचले महिष्मती नगरांत । मंडनमिश्र करिती स्वागत । उभयभारती देई आसन ॥१५॥सांगती उभयतांस आचार्य । ‘ अमरुशतक ’ ग्रंथ करील निर्णय । मिळतील उत्तरे यथायोग्य । कामशास्त्रीय प्रश्नांची ॥१६॥उभयभारतीनें ग्रंथ पाहिला । विवेकपूर्ण निर्णय दिधला । ‘ आचार्य आपण जिंकला । मंडनमिश्रांनी घ्यावा संन्यास ॥१७॥आता मंडनमिश्र शिष्य आपुले । मजसीहि आपण हरविले । माझे कार्य जणूं संपले । जाईन मीहि स्वस्थानी ’ ॥१८॥उभयभारतीचे धरुनि पाय । आचार्य म्हणती “ सरस्वती माय । तूं जाता विद्यांचा लय । होईल या अवनीवर ॥१९॥शृंगेरीस स्थापेन मठ । बनावे ते विद्येचे पीठ । राहावी वेदान्ताची मान ताठ । आई तुझ्या वास्तव्ये ” ॥२०॥उभयभारती हीच सरस्वती । मनी झाली प्रसन्न अति । सांगे प्रेमे शंकराप्रती । समजावुनि परिस्थिती ॥२१॥म्हणे “ आता देहत्याग । करणे आहे अनिवार्य । परी सांगते एक पर्याय । त्याचे करावे पालन ॥२२॥बांधावा शृंगेरीस मठ । स्थापावे तेथे श्रीयंत्र । तेथेच मी राहीन दिवसरात्र । धारण करुनि दिव्य तेज ” ॥२३॥अवतार संपला शारदेचा । मार्ग ठरला मंडनमिश्रांचा । शिष्य झाला आचार्यांचा । नांव ठेविले सुरेश्वर ॥२४॥वार्ता पसरली दूरवर । मंडनमिश्र झाले पराभूत । लोक म्हणती आता निश्चित । जगद्गुरु अवतरेल ॥२५॥भक्त शिष्यांसह शंकराचार्य । दक्षिण दिशेची वाट धरुन । निघाले महिष्मती सोडून । अनेकांना वादात जिंकीत ॥२६॥पोचले पंचवटी क्षेत्रांत । जेथे राहिले श्री सीताराम । त्या क्षेत्री करुनि मुक्काम । जीर्णोद्धारिले राममंदीर ॥२७॥होते करणे कार्य महान । वेदान्ताचे तत्वज्ञान । सर्वत्र रहावे भरुन । म्हणून अव्याहत प्रवास ॥२८॥गाठले क्षेत्र पंढरपूर । परब्रह्म लिंग जेथे विटेवर । कर ठेवुनि कटीवर । राहिले उभे भक्तास्तव ॥२९॥आचार्य न्यहाळति नीट । चंद्रभागेचा तो तट । म्हणति हे तर योगपीठ । स्फुरले स्तोत्र ‘ पांडुरंगाष्टक ’ ॥३०॥भक्तिभाव तो आचार्यांचा । ठाव घेई अंतःकरणाचा । स्वभाव सामान्य जनांचा । वळला वैदिक धर्माकडे ॥३१॥श्रद्धेने भेटती लोक । म्हणती करावा उपदेश । सर्वास आचार्यांचा आदेश । स्वधर्मनिष्ठा राखावी ॥३२॥पंढरपुराहून श्री शैल । ज्योतिर्लिंगातील एक तीर्थ । कापालिकांचे जेथे प्रस्थ । तेथे पोचले आचार्य ॥३३॥आचार्यांसी करणे शास्त्रार्थ । आपले प्रयत्न ठरतील व्यर्थ । क्रकच करी साधण्या स्वार्थ । दुष्ट हीन योजना ॥३४॥आपल्या शिष्य उग्रभैरवास । सांगे, खोट्या नम्रभावे । आचार्यांस सेवेस लागावे । संधी साधून त्या मारावे ॥३५॥कापालिकांत श्रेष्ठ उग्रभैरव । येऊनि आचार्यांपाशी साव । म्हणे धरुनि शरणभाव । आलो आपुल्या पायाशी ॥३६॥सेवेचे नाटक वठवून । सर्वांची मने आकर्षून । एके दिवशी संधी साधून । रडू लागला आचार्यांपाशी ॥३७॥म्हणे ‘ तपश्चर्या उग्र केली । त्याची पूर्तता नाही झाली । जरी आपली कृपा लाभली । तरीच होईल कार्य माझे ” ॥३८॥आचार्य तर करुणालय । म्हणती, “ स्पष्ट सांग मनोदय । सांग बरे मी करुं काय । तुझ्या तपःपूर्तीस्तव ॥३९॥अरे नाही कोणी आसपास । निःसंकोच होऊनि सांग बरे । काय आहे मनांत खरे । माझ्यापाशी मागणे ” ॥४०॥कैसे सांगू म्हणे उग्रभैरव । “ मजला आदेशी साक्षात् भगवान । रुद्रहोमात हवी आहुति महान । सर्वज्ञ महात्म्याचे मस्तकाची ॥४१॥जरी करावे मी हवन । योग्य सहाय्य कर्ते केवळ आपण । विनवितो धरुनि चरण रुद्रहोमार्थ अर्पावे जीवन ” ॥४२॥आचार्य जाणती मनोमन । परी म्हणती हासून । “ जरी होआण्र तुझे कल्याण । अर्पिन मी माझे जीवन ॥४३॥परी आहे मोठी अडचण । इतर शिष्य हे न मानतील । तुझ्या हेतूच्या आड येतील । गुपचुप आपण जाऊ दूर ” ॥४४॥उग्रभैरव झाला हर्षित । म्हणे “ बोलणे आपले योग्य । अमावस्येचा साधुनि योग । नेईन तुम्हास गुपचुप ” ॥४५॥काय घडले त्यानंतर । उग्रभैरवासह गेले कां शंकर । कथा मनासी लावी घोर । जाणावी पुढील अध्यायी ॥४६॥इति श्री आदि शंकर लीलामृत । एकोणीसावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥४७॥शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु । N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP