मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य| अध्याय दहावा श्रीमद् आद्यशंकराचार्य श्री शंकराचार्य वंदना अनुक्रमणिका अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा श्री शंकराचार्य आरती श्री शंकराचार्य वंदना - अध्याय दहावा निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र. Tags : marathipothishakaracharyaपोथीमराठीशंकराचार्य अध्याय दहावा Translation - भाषांतर जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥मार्ग चालता प्रौढत्व । शंकरास जगदानुभवे कळे तत्व । गुरु गोविंदयतींचे माहात्म्य । वर्णिले नवव्या अध्यायी ॥२॥गोविंदयति पुसति प्रश्न । बाळा सांग रे तू कोण । पटविण्या अंतरीची खूण । शंकर गाई आत्मषट्क ॥३॥अहंकार अथवा बुद्धि मन । मी नाही अंतःकरण । तसाच नाही पंचप्राण । रुप माजेह सत्चित्घन ॥४॥ज्ञानेन्द्रिय अथवा कर्मेन्द्रिय । वायू तेज जल वा भौम । मी नाही महाभूत । रुप माझे सच्चिदानंद ॥५॥लोभमोहादि मनोभाव । पापपुण्यासि नाही ठाव । पुरुषार्थाहि नसे वाव । रुप माझे म्हणजे शिव ॥६॥मार्गी जे स्फुरले स्तोत्र । शंकर गाई उस्फूर्त । मधुर स्वर भाव आर्त । सर्व झाले मंत्रमुग्ध ॥७॥संपता स्तोत्र सुंदर । नतमस्तक झाला शंकर । गोविंदयतींच्या पायावर । स्वतःस अर्पिले शिष्यभावे ॥८॥कळली अंतरीची खूण स्पष्ट । गोविंयति झाले संतुष्ट । संपले आता पाहणे वाट । समोर उभा पट्टशिष्य ॥९॥सांभाळित लोकव्यवहार । म्हणति प्रेमे सर्वांसमोर । वाट पाहिली आजवर । भेटलास बाळा शिष्यवर ॥१०॥तुझे मनोरथ पूर्ण करीन । संप्रदायाचे सर्व ज्ञान । तुझ्या हाती सोपवीन । वैदिकधर्मा प्रस्थापी ॥११॥दण्डग्रहणादि चिन्हांकित । संन्यास दिधला विधीपूर्वक । नाम दिधले नवीन । श्रीमत् शंकर भगवत् पादाचार्य ॥१२॥गुरुशिष्याची अपूर्व जोडी । वेदान्ताची समान गोडी । शास्त्रातील गूढ कोडी । गुरु सांगे उलगडोनि ॥१३॥प्रथम वर्षी शिकवला हठयोग । दुसरे वर्षी राजयोग । तिसरे वर्षी ज्ञानयोग । शंकर करी आत्मसात ॥१४॥अनुभूतीसह अध्यात्म । गुरुकडून होता प्राप्त । संशय होऊनि सारे समाप्त । अनुभवले जीव तोच शिव ॥१५॥गाईल्या स्तोत्राचे मर्म । शंकर मनी ठसले पूर्ण । आत्मज्ञाने भरे अंतःकरण । उमजे निर्वाणातील पूर्णत्व ॥१६॥शंकर जणू ज्ञानातीत । गोविंदयति समाधान पावत । नर्मदातीरी आपुल्या गुहेत । पुन्हा बैसले समाधिस्थ ॥१७॥संकल्प शंकराच्या कसोटीचा । क्षण कठोर परीक्षेचा । सिद्धी - शास्त्र - तत्त्व सर्वांचा । समन्वय साधेल हा कैसा ॥१८॥जरी कसोटीस पुरा उतरेल । नर्मदाकांठ सोडून जाईल । काशीक्षेत्री पुढे होईल । शंकराचे कार्य विस्तारित ॥१९॥वर्षाऋतुचा होता समय । नर्मदा वाहे दुथडी भरुन । सविकल्प समाधी लावून । गुहेत बैसले गोविंदयति ॥२०॥अचानक येई महापूर । पाणी गुहेपर्यंत घाटावर । चढत चालले भराभर । भयभीत झाले सर्वजण ॥२१॥शंकरास म्हणति सांग सांग । नर्मदेचा दिसतो वेगळा रंग । जरी ना केला समाधिभंग । यतिवर कैसे वाचतील ? ॥२२॥तुज घेणे निर्णय कांही । काय करु सांग लवलाही । कालक्षेप करणे योग्य नाहीं । पूर वाढतो क्षणोक्षणी ॥२३॥होऊ नका गलितगात्र । शंकर म्हणे आठवा शास्त्रा । माता कां गिलते कधी पुत्रा । आतुर ती चरणास्नाना ॥२४॥कमंडलु ठेविला गुहाद्वारी । तेथेच बैसला हात जोडुनि । प्रार्थी मधुर स्तोत्र गाऊनी । विनवी अनावर नर्मदेसी ॥२५॥कैसा शंकराचा विश्वास । पूर्वी वळविले पूर्णेस । आता अडविणे नर्मदेस । होईल कां तो यशस्वी ? ॥२६॥गुहेपर्यंत येई पाणी । कमंडलुत शिरता थबकुनि । संपूर्ण संतुष्ट होऊनि । परते मागे क्षणोक्षणी ॥२७॥गाऊनि नर्मदाष्टक आर्त स्वरे । शिष्योत्तम तो संकट निवारे । हळूंहळूं नर्मदा ओसरे । गुरु समाधि ना भंगली ॥२८॥निश्चये कैसा बैसला शंकर । चित्त विचलित ना क्षणभर । लोक करिती जयजयकार । वार्ता पसरे सभोवार ॥२९॥संकल्प समाधिचे उत्थान । गोविंदयति सोडून आसन । विचारती कां जमले जन । कशास्तव हा जयघोष ॥३०॥जन सगळे अचंबित । सांगति घडला वृत्तान्त । जल कैसे अडवले कमंडलुत । वर्णन पूर्ण रसभरित ॥३१॥शिष्याचा तो पराक्रम । गोविंदयतींसी सांगावा यथाक्रम । प्रत्येकास हवा अग्रक्रम । शंकर मात्र उभा मौन ॥३२॥ऐकुनि प्रसंग सविस्तर । म्हणति उतरला पुरेपूर । कसोटीस माझ्या शंकर । खरा भगवद् पादाचार्य ॥३३॥यतिवर्यांना पडला मोह । शंकराचा प्रेमळ संग । कां करावा आत्ताच भंग ? । आश्रमी रंगाचा बेरंग ॥३४॥लोकांचि मति झाली गुंग । स्मरति तो अघटित प्रसंग । शंकराचे गुण गाण्यात दंग । म्हणति खराच शिष्योत्तम ॥३५॥गोविंदयति विचारात गर्क । तर्हेतर्हेचे करुनि तर्क । शंकराद दाविणे काशी मार्ग । विलंब नको आता फार ॥३६॥बोलाविती शंकरास जवळ । जाणिले रे तुझे तपोबळ । व्यर्थ जाता नये काळ । प्रस्थान ठेविणे काशीचे ॥३७॥काशीत राहती श्रेष्ठ पंडीत । विद्वत् सभा चालती नित्य । आपले मत मांडणे यथातथ्य । तेथेच पूर्ण उमगेल ॥३८॥मजजवळी होते ते दिले । तूहि ते सर्वस्वी संपादिले । परंतु यश लौकिकातले । आवश्यक जीवन ध्येयास्तव ॥३९॥संपता हा वर्षाकाळ । नर्मदाकाठीचा संपवी खेळ । पाहुनि सुयोग्य वेळ । जावे बाळा काशीस ॥४०॥दूर राहिली पूर्णा मातेसह । सोडणे नर्मदाहि गुरुसह । गंगाकाळ गाठणे शिष्यांसह । शंकर कांहीसा खिन्न ॥४१॥मनी योजिले जे कार्य । त्यास्तव कष्ट अनिवार्य । आदेश देती जो यतिवर्य । सिद्धीस नेईल माझे ध्येय ॥४२॥समजावी मनास विवेके । भावभावनांचा कल्लोळ आवरे । गोविंदयतींना अत्यादरे । विनवी द्यावा उपदेश ॥४३॥नर्मदाकाठी गुरुगृही । गोविंदयति शंकराचार्यांस । देती कोणता उपदेश । जाणावा पुढील अध्यायी ॥४४॥इति श्री आदि शंकर लीलामृत । दहावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । करण्या ग्रंथ पूर्ण सार्थ ॥४५॥शुभं भवतुं । शुभं भवतुं । शुभं भवतुं । N/A References : N/A Last Updated : March 19, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP