मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य| अध्याय पहिला श्रीमद् आद्यशंकराचार्य श्री शंकराचार्य वंदना अनुक्रमणिका अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा श्री शंकराचार्य आरती श्री शंकराचार्य वंदना - अध्याय पहिला निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र Tags : marathipothishakaracharyaपोथीमराठीशंकराचार्य अध्याय पहिला Translation - भाषांतर अथ प्रारंभः । श्रीगणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । श्री रामेश्वराय नमः । श्री मातापितृभ्यां नमः ॥ॐ नमो श्री गणराया । भावे वंदिते तुमचे पाया । अल्पमती मी यावे सहाय्या । प्रार्थिते मी पुनःपुन्हा ॥१॥कैसें वर्णू रुपा मोहक । हाती शोभतो ज्ञान मोदक । लाभता तुष्टती सर्व साधक । सहज पावती मुक्तीस ॥२॥अनाथांचे तुम्हीच नाथ । स्वभक्तांसी तारावयास । मारिले दुष्ट आसुरास । तुम्हीच देवा विनायका ॥३॥काळाचाही जो महाकाळ । शिवपार्वतीचा सुंदर बाळ । अर्पुनि त्यासी चिंतन माळ । प्रार्थिते द्या लेखनबळ ॥४॥आता वंदिते श्री शारदा । जिच्या कृपे लाभे संपदा । लयास जाई अज्ञान विपदा । होतसे चांडाळहि वक्ता ॥५॥आई मी तर हीन दीन । सांग तुझिया कृपेवीण । कोण हरील माझा शीण । कैसी सद्गती तुजवीण ॥६॥पूजार्चन मी काही न जाणी । ठेविते माथा भावे चरणी । सर्वस्वचि तूं आई भवानी । सिद्ध करी गे लेखणी ॥७॥जगद्गुरु श्री आदिशंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥८॥आपण साक्षात् ज्ञानावतार । मजसि नाही काही अधिकार । संकल्प उठे परी वारंवार । मनी लीलामृत रचण्याचा ॥९॥आपण रचिली स्तोत्रे अपार । शब्दसौंदर्याचे ते भांडार । मजलागी होऊनि कोठार । पुरवील सामग्री लेखनाची ॥१०॥चरित्र लिहीणे भावपूर्ण । आद्य श्री आपुले अर्थपूर्ण । म्हणूनी आले सर्वस्वी शरण । प्रार्थिते द्या आशीर्वच ॥११॥भाविक विद्वान श्रोतृगण । अधीरपणे करिता श्रवण । जरी लेखकु मी अजाण । घ्यावे लेकीस सांभाळून ॥१२॥सरस्वती माझी माता थोर । देई सर्वासि सदा शिकवण । स्वतः आचरुनि शुद्धाचरण । परमार्थाचा आधार ॥१३॥माझा पिता नामे गणेश । भाषा - इतिहासादि विषयाचे तज्ज्ञ । कोणतेही अपत्य न रहावे अज्ञ । यालागी सदा सावध ॥१४॥ऐसी मातापिता लाभली थोर । कन्या म्हणुनि न करिता अव्हेर । सर्वतोपरी देऊन आधार । घडविले माझे जीवन ॥१५॥जरी दोघे झाले देवासि प्रिय । घडी घडी करुनि त्यांचे स्मरण । मनोमनी वंदूनि त्यांचे चरण । प्रार्थिते द्या आशीर्वाद ॥१६॥सत्य संकल्पाचा जो दाता । आदि नारायण सर्व कर्ता । जोगकुलोत्पन्न दत्तात्रेया । माहिषीबुद्धिची मी तव शिष्या ॥१७॥आचार्यभक्ति तुमची थोर । शिष्येवरी अनंत उपकार । शिकविले तुम्ही वेदान्तसार । आणि भगवद्गीता सभाष्य ॥१८॥पदवी आपुली उपनिषद्तीर्थ । वेदान्ताचे निरुपण यथार्थ । तेणे जीवनी झाला कृतार्थ । स्मृतिवंदन हे आरंभाला ॥१९॥आद्य श्री शंकरांचे चरित्र । वर्णावया मी नाही पात्र । परी पंगुने लंघावा पर्वत । मिळो दैवाची साथ पूर्ण ॥२०॥मायबाप गुरु परमेश्वर । करिती माझे प्रेमे कवतुक । बाळे होऊ नको अगतिक । उचल लेखणि श्रद्धाभावे ॥२१॥श्रद्धेचे स्थान वैदिक धर्म । नरजन्माचे जो सांगे मर्म । त्याचे रक्षक शंकराचार्य । नेवोत पूर्णत्वा संकल्प ॥२२॥श्री विष्णूचे दशावतार । दुष्टांचे करण्या निर्दालन । साधुसज्जनांचे परिपालन । म्हणुनि म्हणति स्थितीकर्ता ॥२३॥द्वैताचे अंती बुद्धावतार । राजादि शिष्यांचा परिवार । करिती सरसहा संहार । वेदान्तधर्माचा अज्ञाने ॥२४॥जागविण्या तो वेदान्तधर्म । आदि गुरु श्री महेश्वर । व्यास शंकर नि ज्ञानेश्वर । रुपे प्रकटले अवनीवर ॥२५॥वैदिक धर्माच्या या भूमीवरी । पाखंडी मातोनि पृथ्वीवरी । वेदपुराणोक्त कर्मे सारी । नष्ट करण्या सरसावले ॥२६॥जैन मुनींचे मत आगळे । सर्वत्र जणूं पसरुं लागले । तेणे योगे वर्ण सगळे । झाले मूढमति किं कर्तव्य ॥२७॥त्या मतांचे करण्या खंडन । शंकर नामे अति सुंदर । धारण केला अवतार । साक्षात् शंभु महादेवे ॥२८॥सर्व भेदांचा करुनि लय । शास्त्राधारे साधुनि समन्वय । अद्वैत प्रतिष्ठापनेचे ध्येय । नेले श्रीशंकरे सिद्धीस ॥२९॥आदि शंकराची ऐकता कथा । जाणेल श्रोता अद्वैत तत्वा । अथवा जीवनमुक्ती सर्वथा ।अधिकारानुरुप पावेल ॥३०॥मनातील द्वैताचा करिता नाश । कळेल प्रत्येका स्वस्वरुप । सच्चिदानंद मी शिवरुप । आत्मविश्वास प्रगटेल ॥३१॥भेदबुद्धी म्हणजे अज्ञान । अद्वैतभाव हेचि ज्ञान । वेदान्ताचे तत्व महान । माणुसकीचा धर्म सुंदर ॥३२॥चारी वेदांची वाक्ये चार । सांगति गर्जुनि तत्व थ्रोर । उपाधीस विसरता पार । जीव - शीव ऐक्य उमजेल ॥३३॥शंकर रचनांचे करिता पठण । सहज कळते तत्वज्ञान । प्राप्त करण्या आत्मज्ञान । चित्तशुद्धि हे आद्यकर्म ॥३४॥चित्तशुद्धिचे सोपे साधन । सदा वंदावे संत सज्जन । गावे आदरे गुणगान । अथवा करावे चरित्र श्रवण ॥३५॥आदि शंकराचे लीलाचरित्र । देईल सुख इह परत्र । रोमहर्षित होतील गात्र । श्रवण करिता आदरे ॥३६॥खंडप्रायसा भारत देश । केरळ नामे प्रांत विशेष । कालडी ग्राम निवडे ईश । जन्मे होऊनि आदि शंकर ॥३७॥पूर्णा अथवा अलवाई । नदी वाहे घाई घाई । आंबे नारळ पोफळादि । फोफावले वृक्ष काठावरी ॥३८॥त्या गावी थोर द्विज चुडामण । शिवगुरु नामे नम्बुद्रि ब्राह्मण । पतीपत्नीचे शुद्धाचरण । सर्वासी करी आकृष्ट ॥३९॥पत्नी विशिष्टादेवीसहित । सदा राहती धर्मरत । परमेश्वराचे पूजन अविरत । करिती दोघेहि आनंदे ॥४०॥ब्राह्मण वर्णाचे विहित कर्म । अध्ययन आणि अध्यापन । अत्यादरे करिती पालन । मनी सदा संतुष्ट ॥४१॥हळूहळू वार्धक्य दिसूं लागे । परि पोटी अपत्य नुपजे । तेचि कारणे दुःख उपजे । विशिष्टादेवींच्या मनांत ॥४२॥पत्नीस ठेविता असंतुष्ट । गृहस्थाश्रमाचे मर्म नष्ट । शिवगुरु जाणुनि स्पष्ट । उपाय शोधू लागले ॥४३॥कैसें झाले दुःख दूर । तपाचरणाचा कोणता सूर । शिवगुरु छेडिती हृद्वीणेवर । जाणावे पुढील अध्यायी ॥४४॥इति श्री आदि शंकर लीलामृत । पहिला अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । करण्या ग्रंथ पूर्ण सार्थ ॥४५॥शुभं भवतुं । शुभं भवतुं । शुभं भवतुं । N/A References : N/A Last Updated : March 18, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP