मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य| अध्याय सतरावा श्रीमद् आद्यशंकराचार्य श्री शंकराचार्य वंदना अनुक्रमणिका अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा श्री शंकराचार्य आरती श्री शंकराचार्य वंदना - अध्याय सतरावा निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र. Tags : marathipothishakaracharyaपोथीमराठीशंकराचार्य अध्याय सतरावा Translation - भाषांतर जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥हिमालयामाजी आचार्य । कैसे करिती भ्रमण । भाष्यरचना आणि जीर्णोद्धार । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥उत्तरकाशी भूमी पवित्र । मोहित झाले आचार्यांचे मन । क्षुधा तृष्णेचे नुरले भान । सदा राहती समाधिमग्न ॥३॥ध्यानांत प्रकटे जो गहन विचार । ‘ विज्ञान नौका ’ स्तोत्र साकार । मृत्यूहीन ज्योतिर्मय ओंकार । मीच ब्रह्म निराकार ॥४॥सोळा वर्षांचे कोवळे वय । परी अंतर्बाह्य झाले ज्ञानमय । शिष्यांच्या मनी उपजे भय । होणार नाही ना समाधिस्थ ॥५॥विचार करुन शिष्यगण । धरती आचार्यांचे चरण । सांगती जाऊन शरण । करावे भाष्याचे विश्लेषण ॥६॥आवडीचाच तो विषय । शिष्यास शिकविणे शारीरक भाष्य । आनंदे मानिती आचार्य । झाले सुरु ज्ञानसत्र ॥७॥एके दिवशी अकस्मात । येई वृद्ध तेजस्वी ब्राह्मण । विचारी सर्वासी करी कोण । भाष्य ब्रह्मसूत्रांवर ॥८॥शिष्य करिती वंदन । देती त्या आदरे आसन । सांगती खंडनपूर्वक विवेचन । करितात आचार्य शंकर ॥९॥ब्राह्मण पाही निरखून । म्हणे सांगा बरे समजावून । प्रथम सूत्राचे करावे विवरण । तृतेय अदेह्यायी प्रथम पद ॥१०॥नमुनि बोलती आचार्य । प्रश्नावरुन आले ध्यानी । सूत्रांचा मर्मार्थ जाणोनि । आरंभिला आपण संवाद ॥११॥जैसे जितुके मी जाणतो । आपणासमोर मांडितो । आपले समाधान होईतो । विचारावेत प्रश्न ॥१२॥प्रथम देह सोडुनि जीव । प्रवेश करिता अन्य देही । सूक्ष भूतांनी वेष्टित जाई । ऐसे मूळ सूत्र ॥१३॥आचार्य करिती विवेचन । छांदोग्यातील संदर्भ योग्य । उद्धृत करोनि करिता भाष्य । मान डोलवि ब्राह्मण ॥१४॥जरी तोषला मनी ब्राह्मण । आचार्यास करी प्रतिप्रश्न । विचेचन राहता अपूर्ण । म्हणे उद्यां येईन ॥१५॥ब्राह्मण करी प्रश्न । आचार्य देती उत्तर । चर्चा ऐसी ब्रह्मसूत्रांवर । चालली कांही दिवस ॥१६॥कोण असावेत हे ब्राह्मण । पदम्पाद विचारी आचार्यास । असतील कां वेदव्यास । शंका मनी येते रोज ॥१७॥आचार्य म्हणती पद्मपादास । मजही वाटते हे वेदव्यास । उद्या करु शंकेचा निरास । येईल ब्राह्मण तेव्हाच ॥१८॥दुसरे दिवशी येई ब्राह्मण । विचारी पुन्हा गहन प्रश्न । आचार्य करुनि सादर नमन । विनविती सांगा आपण कोण ॥१९॥वेदव्यास कृष्ण द्वैपायन । परीक्षा घेण्या आला आपण । ऐसे मानितो आम्ही सर्वजण । सत्यरुप प्रकट करावे ॥२०॥ब्राह्मण बोले हासून । खरेच आहे हे अनुमान । विवेचनाने पावलो समाधा । प्रकट होती महर्षि व्यास ॥२१॥मनी मावेना आनंद । आदि गुरुंचे धरुनि चरण । आचार्यासह शिष्यगण । गेले व्यास गुरुंना शरण ॥२२॥ऐसी आपली ओळख । देऊन स्विकारिती आसन । वदति शंकरा कल्याण । तुजकरवी साधणे जगात ॥२३॥प्रथम देतो आशीर्वचन । अल्पायुष तुझे वर्ष षोडश । वाढो आणखी सोळा वर्ष । कार्य जाण्या सिद्धीस ॥२४॥आवडे तुज समाधीयोग । परी अनुमति देईल कोण । जीवनकार्य पूर्ण केल्याविण । करण्या तुज आत्मसमर्पण ॥२५॥येथवरी संपादिलेस ज्ञान । आता करणे परिभ्रमण । पंथोपपंथांचे वादे खंडन । सुप्रतिष्ठित करणे वैदिक धर्म ॥२६॥त्याचसाठी देवाधिदेवे । वाढविले तुझे आयुष्यमान । या गोष्टीचे राखून भान । करावे पूर्ण कार्य महान ॥२७॥एकाग्र करुनि चित्त मन । आचार्य ऐकती व्यास वचन । म्हणती झाले धन्य जीवन । गुरु व्यासांनि दाविला मार्ग ॥२८॥सद्गुरुंची मान्यता लाभली । पूर्वतयारी पूर्ण झाली । आता पाहिजे संधी साधली । शास्त्रार्थ करण्या पंडितांसवे ॥२९॥उत्तरकाशी सोडून शंकर । निघाले शिष्यांसहीत भराभर । हिमालयचे सोडून पठार । गाठती क्षेत्र प्रयाग ॥३०॥करुनि बौद्धांचा पराभव । कुमारील भट्ट पंडीत । कर्मकांडासी प्रतिष्ठित । करिती अनन्य भक्तिनें ॥३१॥त्याच भट्टांच्या शोधात । आचार्य गाठति प्रयाग क्षेत्र । तीन नद्यांचे संगम तीर्थ । ज्ञान भक्ति वैराग्य ॥३२॥देहशुद्धीचे सोपे साधन । आचार्य करिता संगमी स्नान । तेजःपुंज काय अपाहून । जन म्हणति हा पुरुष कोण ॥३३॥कुमारील भट्ट येथेच जवळ । निघाले आम्हां सोडून । त्यांचेच करण्या कार्य पूर्ण । अवतरले कां हे विभूतिमत्व ॥३४॥आचार्यांच्या पडता कानी । कुमारील भट्ट घेती तुषाग्नि । त्वरित धावले त्या स्थानी । सोबतीस मोठा समुदाय ॥३५॥दृश्य मोठे करुणामय । अलौकिक सदाचरणी भट्टाचार्य । तुषाग्नित बैसले दृढनिश्चय । अग्नि लावलेला तळाशी ॥३६॥सामान्य जनांचा सुरु विलाप । का सोसावा सज्जनांनी ताप । ऐसे काय घडले पाप । त्यासाठी हे प्रायश्चित्त ॥३७॥कुमारील भट्टांचे शिष्य । सांगती हे धर्मपरायण । निर्णय करिती स्वये आपण । गुरुवधास्तव स्वशिक्षा ॥३८॥लोक करिती आश्चर्य । स्वतः स्वतःसि शिक्षा देणे । धर्मपरायणांचे हे जगणे । वेदनिष्ठा हे जीवन ॥३९॥शंकराचार्यांसि कुमारील भट्ट । नेत्रभावे करिती नमन । आचार्यहि करिती वंदन । शिष्यांसह त्या वेदरक्षका ॥४०॥भट्ट बोलती गद्गद स्वर । माझा आला जवळ शेवट । घडली आचार्य तुमची भेट । झालो मी कृतार्थ ॥४१॥बौद्ध गुरुसी केले पराभूत । जीवननाश त्यांचा घडला नकळत । त्याचेच घेण्या प्रायश्चित । केला तुषाग्नि प्रवेश ॥४२॥घडला आणखी एक प्रमाद । मीमांसेचा एकान्तिक पुरस्कार । ईश्वराचे अस्तित्वास नकार । नको होते हे घडावया ॥४३॥असो आलात कां आपण । कोणता हेतू मनांत धरुन । सांगावे निःशंक होऊन । काय अपेक्षा आपली ॥४४॥आचार्य जणूं झाले मूक । काय बोलावे कळेना क्षणैक । चित्त म्हणे विझवून टाक । जलसिंचने हा तुषाग्नि ॥४५॥भावना वेग आवरुनि घट्ट । म्हणति विनवतो तुम्हां भट्ट । जीवित संपविण्याचा हट्ट । सोडून द्यावा आम्हास्तव ॥४६॥लिहिले अद्वैत सिद्धीसाठी । प्रस्थानत्रयीवर मी भाष्य । आपण लिहावे त्यावर वार्तिक । विनवितो मनापासून ॥४७॥भट्टपाद सांगती समजावून । फिरते कालाचे सदा चाक । वेदोक्त धर्माचा सहज परिपाक । अटळ आता तुषानल प्रवेश ॥४८॥तुझ्या भाष्यावर वार्तिक लिहिणे । तसेच कांही अन्य लिहीणे । हे तर माझे भाग्य फळणे । परी आलास उशीरा ॥४९॥परंतु तुझे साधावे कार्य । ऐसा कांही सांगतो उपाय । मंडनमिश्रा जिंकिणे अनिवार्य । हेच मान तुझे ध्येय ॥५०॥मंडनमिश्र तर माझा शिष्य । हरला तर तुझा शिष्य । लिहील वार्तिक जाणुनि भाष्य । त्यास मागावी वाद भिक्षा ॥५१॥स्वतः मंडन खराच पंडीत । त्याची पत्नीहि जाणते शास्त्रार्थ । तिलाच करावे मध्यस्थ । निःपक्ष जी उभयभारती ॥५२॥बोलता बोलता भट्टपाद । तुषाग्नित झाले तेजोमय । आदरे वदति आचार्य । “ आपला आदेश शिरोधर्य ” ॥५३॥भट्टांचे मुख उजळले । सर्वास आशीर्वाद दिधले । बघता बघता अग्निने वेढिले । कुमारील भट्ट झाले अग्नीमय ॥५४॥अग्नी जाळित होता देह । तरीहि दावोनि मार्ग सुयोग्य । जीवनात झाले कृतकृत्य । कुमारील भट्ट अद्वितीय ॥५५॥आठवीत तयांचे जीवन । आचार्यांचे सुरु भ्रमण । अचंबित झालेला शिष्यगण । चाले त्यांच्या मागोमाग ॥५६॥कळली तितिक्षेची अपूर्वता । भट्टपादांची धर्मपरायणता । तुषाग्निप्रवेशाचा प्रसंग पाहतां । ठसली प्रत्येकाच्या मनांत ॥५७॥कैसा झाला शास्त्रार्थ । मंडनमिश्र आणि आचार्यात । त्या घटनेचा वृत्तांत । जाणावा पुढील अध्यायी ॥५८॥इति श्री आदि शंकर लीलामृत । सतरावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥५९॥शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु । N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP