प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १४२ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘शातातपः’’ अथ भोजनकाले चेदशुचिर्भवति द्विजः। भूमौ निक्षिप्य तं ग्रासं स्नात्वा विशुध्यति।
भक्षयित्वा तु तं ग्रासमहारात्रेण शुध्यति। अशित्वा सर्वमन्नं तु त्रिरात्रेण विशुध्यतीति।
‘‘तैलाभ्यंगादिस्नाननिमित्ते अकृतस्नानस्य संवर्तः’’ समुत्पन्ने द्विजः स्नाने भुंजीताथ पिबेत्तथा।
गायत्र्यष्टसहस्रं तु जपेत्स्नात्वा समाहितः। अष्टसहस्रमष्टाधिकसहस्रं। एतच्च सकृदभ्यासे।
‘‘शंखः’’ नीलं वस्त्रं परिधाय भुक्त्वा स्नानार्हको भवेत्। त्रिरात्रं तु व्रतं कुर्याच्छित्वा गुल्मलतां तथेति।
‘‘ॠतुः’’ आसनारूढपादो वा वस्त्रार्धप्रावृत्तोऽपि वा।
मुखेन धमितं भुक्त्वा कृच्छ्रं सांतपनं चरेदिति एवमेव स्थितप्रव्हगच्छच्छयानैरन्नभोजने एकाहत्र्यहादीन्यभक्ष्यभक्षणप्रायश्चित्तानि योजनीयानि ‘‘पराशरः’’ भुंजानश्र्चैव यो विप्रःपादं हस्तेन संस्पृशेत्। स्वमुच्छिष्टमसौ भुंक्ते योभुंक्ते भुक्तभोजने।
पादुकास्थो न भुंजीत पर्यंकस्थः स्थितोऽपि वा। श्र्वानचांडालदृक् चैव भोजनं परिवर्जयेदिति
इति कृर्तृदुष्आशने प्रायश्चित्तम्.
जेवतांना अशुचित्व झालें तर त्याविषयीं. निळें वस्त्र नेसून भोजन केलें तर, तसेंच आसनावर पाय ठेवून अर्धे वस्त्र नेसून, तोंडानें फुंकून, उभ्यानें इ० रीतानें खाल्लें तर प्रायश्चित्त.
‘‘शातातप’’---जर भोजनाच्या वेळीं द्विज अपवित्र होईल, तर त्यानें तो घास जमिनीवर ठेवून स्नान करावें म्हणजे तो शुद्ध होईल. जर तो घास खाईल, तर त्यानें एक दिवस उपास करावा म्हणजे शुद्धि होईल. जर सर्व अन्न खाल्लें तर तीन दिवस उपास केल्यानें शुद्धि होईल. तैलाभ्यंग इत्यादिकाच्या योगानें स्नानाचें निमित्त असतां जर स्नान केलें नाही तर त्यास ‘‘संवर्त’’---जर ब्राह्मण नैमित्तिक स्नान उत्पन्न झालें असूनही जेवील किंवा पिईल तर त्यानें स्नान करून एकाग्र मनानें गायत्रीमंत्राचा एक हजार आठ जप करावा. हें एक वेळां अभ्यास असतां त्याविषयीं जाणावें. ‘शंख’---नीळें वस्त्र नेसून भोजन केलें तर स्नानास योग्य होईल. गुल्मलतेचें छेदन केलें तर तीन दिवस व्रत करावें. ‘‘क्रतु’’---आसनावर पाय ठेवून किंवा नेसूचें वस्त्र अर्धें पांघरून, किंवा तोंडानें (अन्न) फुंकून भोजन केलें तर सांतपन कृच्छ्र करावें. याचप्रमाणें उभ्यानें, ओणव्यानें, चालतांना व निजून भोजन केलें तर एक दिवस, तीन दिवस इत्यादि अभक्ष्य भक्षणाचीं प्रायश्चित्तें योजावी. ‘‘पराशर’’---जो ब्राह्मण जेवतांना आपले पायास स्पर्श करील, तो आपलें उष्टें खाईल. तसेंच जो जेवलेल्या भांड्यांत जेवतो तोही आपलें उष्टें खाईल. पायांत पादुका (खडाव) घालून जेऊं नये. पलंगावर बसून जेऊं नये. कुत्रें वा चांडाळ यांनी पाहिलेले भोजन वर्ज्य करावे.
याप्रमाणें कर्तृदुष्ट अशाच्या भक्षणा विषयीं प्रायश्चित्त सांगितलें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP