मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ४६ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ४६ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘तत्रैव’’ तिरस्‍कृतो यदाविप्रेहियमाणो मृतो यदि। निर्गुणः सहसा क्रोधाद्गहक्षेत्रादिकारणात्‌।
त्रैवार्षिकं व्रतं कुर्यात्‍प्रतिलोमां सरस्‍वतीं। गच्छेद्वापि विशुध्यर्थं तत्‍पापस्‍येति निश्चित्तं। ‘‘तत्रैव’’ अत्‍यर्थं निर्गुणोविप्रोह्यत्‍यर्थं निर्गुणोपरि।
क्रोधाद्वै म्रियते यस्‍तु निर्निमित्तं तु भर्त्सितः। वत्‍सरत्रितयं कुर्यान्नरः कृच्छ्रं विशुद्धय इति।
‘‘एतस्‍मिन्नेव विषये निमित्तिनो निर्गुणत्‍वे तत्रैव’’ केशश्मश्रुनखादीनां कृत्‍वा तु वपनं वने। ब्रह्मचर्य चरन्विप्रो वर्षेणैकेन शुध्यतीति।
‘‘षट्‌त्रिंशन्मते’’ षंढं वा ब्राह्मणं हत्‍वा शूद्रहत्‍याव्रतं चरेत्‌। चांद्रायणं वा कुर्वीत पराकद्वयमेव वेति।
‘‘पतितविप्रवधे व्यासः’’ ब्रह्महाद्बत्रयं विप्रो गायत्रीमभ्‍यसे त्‍सदा। प्राणायामशतं कुर्यात्‍प्रत्‍यहं नियतः शुचिः।
भिक्षाशी निवसेन्नित्‍यमरण्ये संयतेंद्रियः। षोडश ब्राह्मणान्‌ विप्रो भोजयित्‍वा समाहितः।
प्रयच्छेद्वस्त्रयुग्‍मानि हिरण्यं चापि शक्तित इति एतानि च प्रायश्चित्तान्यनुपेतब्राह्मणवधे विज्ञेयानि ब्राह्मण्याविशेषात्‌।
तत्तु षडद्वं निर्गुणविप्रवधे षडद्बस्‍य वक्ष्यमाणत्‍वात्‌ एतस्‍याप्युपनयनाभावेन निर्गुणत्‍वात्‌.

मूर्ख ब्राह्मणाचें मरण झालें असतां, षंड व पतित ब्राह्मणाचा वध केला असतां प्रायश्चित्त.

‘‘त्‍यांतच’’ ‘‘एखाद्या गुणरहित (मूर्ख) ब्राह्मणाचा घर, शेत इत्‍यादिकांच्या हेतूनें अपमान केला असतां त्‍यामुळें त्‍याला लाज उत्‍पन्न होऊन एकाएकी क्रोधानें जर तो मरण पावेल, तर ज्‍याच्याकडून हा दोष घडला असेल त्‍यानें त्‍या पापाची शुद्धि होण्याकरितां तीन वर्षांचें (त्र्यद्ब) प्रायश्चित्त करावें, किंवा सरस्‍वती नदीच्या मुखपासून पावेंतों उलट जावें. ‘‘त्‍यांतच’’ जर एखाद्या अतिनिर्गुण (मूर्ख) ब्राह्मणानें एखाद्या अतिनिर्गुण (मूर्ख) ब्राह्मणाची कारणावाचून निंदा केली असतां त्‍यामुळें त्‍याला राग उत्‍पन्न होऊन जर तो मरेल तर त्‍यानें शुद्धि होण्याकरितां तीन वर्षे पर्यंत कृच्छ्र करावे. ‘‘याच विषयी जर निमित्ती निर्गुण असेल तर त्‍या विषयी त्‍यांतच’’ ब्राह्मणानें केस, दाढी, मिशा व नखें ही काढवून वनांत ब्रह्मचर्यानें एक वर्ष पर्यंत रहावें म्‍हणजे तो शुद्ध होईल.
‘‘षट्‌त्रिंशन्मतांत’’ जो मनुष्‍य नपुंसक ब्राह्मणास ठार मारील त्‍यानें शूद्राच्या हत्‍येंचें व्रत करावें. किंवा चंद्रायणव्रत अथवा दोन पराक करावे. ‘‘पतित ब्राह्मणाच्या वधाबद्दल व्यास ’’---ब्रह्महत्‍या करणार्‍या ब्राह्मणानें नित्‍य भिक्षा मागून तिचेवर आपला निर्वाह करावा. आपली इंद्रियें स्‍वाधीन ठेऊन रानांत वास करावा, पवित्र होत्‍साता नित्‍य गायत्रीमंत्राचा जप करावा, व शंभर प्राणायाम करावे, सोळा ब्राह्मणांस भोजन घालावें, आपल्‍या शक्तीप्रमाणें दोन वस्त्रे द्यावीं व सोनेंही द्यावे.’’ ही प्रायश्चित्तें उपनयन न झालेल्‍या ब्राह्मणाच्या वधा विषयी जाणावी. कारण, त्‍यांचे उपनयन न झाल्‍यामुळें त्‍यांचे ठिकाणीं विशेष ब्राह्मण्य नसते. ते षडद्ब प्रायश्चित्त निर्गुण ब्राह्मणाच्या वधाविषयीं जाणावे. कारण पुढें षडद्ब सांगण्यांत येणार आहे, यालाही उपनयन न झाल्‍यामुळें निर्गुणत्‍व आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP