मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ३८ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ३८ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ चांद्रायणं.

‘‘यमः’’ वर्धयेत्‍पिंडमेकैकं शुक्‍ले कृष्‍णे च र्‍हासयेत्‌। एत च्चांद्रायणं नाम यवमध्यं प्रकीर्तितं।
एकैकं र्‍हासयेत्‍पिंड कृष्‍णे शुक्‍ले च वर्धयेत्‌। एतत्‍पिपीलिकामध्यं चांद्रायणमुदाहृतं। त्रींस्त्रीन्‌ पिंडान्समश्र्नीयतात्‍मा दृढव्रतः।
त्हविष्‍यान्नस्‍य वै मासमृषिचांद्रायणं स्‍मृतम्‌। चतुरः प्रातरश्र्नीयाच्चतुरः सायमेव च। पिंडानेतद्धि बालानां शिशुचांद्रायणं स्‍मृतम्‌।
पिंडानष्‍टौ समश्र्नीयान्मासं मध्यंदिने रवौ। यतिचांद्रायणं ह्येतत्‍सर्व कल्‍मषनाशनं।
यतिचांद्रायणमिति संज्ञामात्रं तेन न यतिमात्र स्‍यैवात्राधिकारः किं तु सर्वेषां। एवं शिशुचांद्रायणेऽपि।
यवपिपीलिकामध्ययोस्‍तिथिर्‍हासे वृद्धौ वा ग्रासानामपि र्‍हासवृद्धी।
‘‘तथा च विष्‍णुः’’ ग्रासानास्‍याविकारमश्र्नीयात्तांश्र्चंद्रकलाभिवृद्धौ क्रमेण वर्धयेद्धानौ च र्‍हासयेदमावास्‍यायां च नाश्र्नीयादिति।
एतेन यत्‍कल्‍पतरुकृच्छूलपाणी आहतुः कृष्‍णप्रतिपदि पंचदशग्रासाः।
तत एकैकहानावमावास्‍यास्‍या मेकोग्रासः। शुक्‍लप्रतिपदादिषु व्द्यदिवृद्धिरिति तदपास्‍तं।
अमावास्‍यां न भुंजीत एष चांद्रायणो विधिरिति ‘‘पराशरोक्तेश्र्च’’ सामान्य चांद्रायणे विधिरिति ‘‘पराशरोक्तेश्र्च’’ सामान्य चांद्रायणमाह ‘‘स एव’’ कथंचित्‍पिंडानां तिस्त्रोऽशीतिरश्र्नीयात्‍स सामान्यचांद्रायण इति प्रतिदिनं संख्यानियमानादरेण मासेन चत्‍वारिंशदुत्तरं शतद्वयं ग्रासानश्र्नीयादित्‍यर्थः। पिपीलिकायवमध्यभिन्नचांद्रायणेषु दिनांतरेप्यारंभोन प्रतिपद्येव।
ग्रासपरिमाणमाह ‘‘याज्ञवल्‍क्‍यः’’ तिथिवृध्द्या चरेत्‍पिंडान्‌ शुक्‍ले। शिख्यंडसंमितान्‌। शिखीमयूरः।
चांद्रायणप्रकरणे ‘‘पराशरस्‍तु’’ कुक्‍कुटांडप्रमाणं तु ग्रासं वै परिकल्‍पयेत्‌ ‘‘शंखस्‍तु’’ आर्द्रामलकमात्रास्‍तु ग्रासा इंदुव्रते स्‍मृता इति एतेषां च परिमाणानां शक्त्या विकल्‍पः। एकादश्यादौ नित्‍यप्राप्त उपवासस्‍तावच्चांद्रायणविधिना बाध्यते।
एतस्‍य धर्मार्थं यश्र्चरेदेतच्चंद्रस्‍यैति सलोकतामिति काम्‍यत्‍वाल्‍लशुनभक्षणा दिनिमित्ते विहितत्‍वेन नैमित्तिकत्‍वाच्च। काम्‍यस्‍त्‍वेकादश्याद्युपवासोऽन्यद्वारा कारणीयः प्रतिनिधिना कृतेऽपि फलप्राप्तेः कात्‍यायनादिभिरुक्तत्‍वात्‌। वचनानि त्‍वस्‍मत्‍कृते समयमयूखे द्रष्‍टव्यानि। अयं चैकादृश्याद्युपवासबाधः सामान्य चांद्रायणभिन्नेष्‍वेव। तत्र प्रतिदिनं ग्रासग्रहणं नियमाभावात्‌।

‘‘गौतमः’’ अथातश्र्चांद्रायणं तस्‍योक्तो विधिः कृच्छ्रे वपनं व्रतं चरे च्छ्वोभूतां पौर्णमासीमुपवसेदाप्यायस्‍व, संतेपयांसि, नवोनवो इति चैताभिस्‍तर्पणमाज्‍यहोमो हविषश्र्चानुमंत्रणमुपस्‍थानं चंद्रमसो यद्देवा देव हेडनमिति चतसृभिराज्‍यं जुहुयद्देवकृतस्‍येति वांते समिद्भिस्त्रिभिः ॐ भूः। भुवः स्‍वः महः जनः तपः सत्‍यं यशः श्रीः उरक्‌ इट्‌ ओजः  तेजः पुरुषः धर्मः शिवः इत्‍येतै र्ग्रासानुमंत्रणं प्रतिमंत्रं मनसानमः स्‍वाहेति वा सर्वग्रासभक्षणं द्वितीयपक्षेप्येवं प्रमाणमास्‍याविकारेण चरुभैक्षक्तुकणयावकशाकपयोदधिघृतफलोदकान्युत्तरोत्तरं प्रशस्‍तानि पौर्णमास्‍यां पंचदश ग्रासान्भुक्‍त्‍वा एकैकापचयेनापरपक्षमश्र्नीयात्‌। अमावास्‍यायामुपोष्‍यैकैकोपचयेन पूर्वपक्षमिति विपरीतमेकेषां एष चांद्रायणो मासः।

‘‘बौधायनः’’---अथातश्र्चांद्रायणकल्‍पं व्याख्यास्‍यामः। शुक्‍लचतुर्दशीमुपवसेत्‌ कृष्‍णचतुर्दशीं वा केशश्मश्रुलोमनखानि वापयित्‍वा श्मश्रूण्येववेत्‍यादि। ‘यमः’ आयसं तैजसं पात्रं चक्रोत्‍पन्नं घटशरावादि। ‘स एव’ अंगुल्‍यग्रस्‍थितं ग्रासंसावित्र्याचाभिमंत्रयेत्‌।
अत्र ग्रासैरेव प्राणाग्रिहोत्रमाह ‘‘बौधायनः’’ अश्र्नीया त्‍प्राणायेति प्रथमं। अपानायेति द्वितीयं। व्यानायेति तृतीयं।
उदानायेतिचतुर्थं समानायेति पंचमं। चत्‍वारस्‍तदा द्वाभ्‍यां पूर्व, यदा त्रयस्‍तदा द्वाभ्‍यां द्वाभ्‍यां पूर्वौ।
यदा द्वौ तदा द्वाभ्‍यामेवोत्तरमेकं सर्वैरिति। ग्रासद्वयपक्षे प्रथममाद्यैस्त्रिभिरंत्‍यं द्वाभ्‍यामेकपक्षे सर्वैरेकमित्‍यर्थंः

चांद्रायण.

यवमध्यचांद्रायण, पिपीलिकामध्यचांद्रायण, ॠषिचांद्रायण, शिशुचांद्रायण व यतिचांद्रायण यांचीं लक्षणें.

‘‘यम’’---शुक्‍लपक्षांत एक एक घास वाढवावा व कृष्‍णपक्षांत एक एक कमी करावा याला ‘यवमध्यचांद्रायण’ म्‍हटलें आहे. कृष्‍णपक्षांत एकेक घास कमी करावा, व शुक्‍लपक्षांत वाढवावा हें ‘‘ पिपीलिकामध्यचांद्रायण’’ सांगितलें. दृढ ज्‍याचे नियम आहेत व ज्‍यानें आपलें चित्त स्‍वाधीन ठेवले आहे अशा पुरुषानें हविष्‍यान्नाचे एक मास पावेतों तीन तीन घास खावे हें ‘‘ॠषींचांद्रायण’’ सांगितले. सकाळी चार घास व संध्याकाळी चार घास घ्‍यावे. हे मुलांच्या उद्देशानें ‘‘शिशुचांद्रायण’’ सांगितले. सूर्य मध्यावर आला (मध्यान्ह झाला) असतां एक मास पावेंतों रोज आठ आठ घास खावे. हें ‘‘यतिचांद्रायण’’ सर्व पातकांचा नाश करणारें आहे. ‘‘यतिचांद्रायण’’ ही केवळ संज्ञा आहे, त्‍यावरून केवळ संन्याशासच याविषयी अधिकार आहे असें नाही तर हें करण्यास सर्वांस अधिकार आहे. याप्रमाणें शिशुचांद्रायणा विषयीही समजावे. यवमध्य व पिलीलिकामध्य या दोहांत तिथीचा र्‍हास किंवा वृद्धि असतां घासांचीही र्‍हास व वृद्धि करावी. तसेंच ‘‘विष्‍णु’’---‘सुखानें तोंडांत घेतां येतील असे घास खावे. ते घास तिथीची वृद्धि असतां क्रमानें वाढवावे व र्‍हास असतां कमी करावे. अमावास्‍येच्या दिवशी भोजन करूं नये.’ यावरून जें ‘‘कल्‍पतरुकार व शूलपाणि’’ कृष्‍णपक्षाच्या प्रतिपदेस पंधरा घास नंतर एकेक कमी करतां अमावस्‍येच्या दिवशी एक घास होतो. शुक्‍लपक्षाच्या प्रतिपदा वगैरे तिथींत दोन वगैरेंची वृद्धि समजावी असें म्‍हणतात ते रद्द होते. कारण, ‘‘अमावस्‍येच्या दिवशी जेऊं नये हा ‘‘चांद्रायणविधि’’ हाये’’ असें ‘‘पराशराचें’’ म्‍हणणें आहे त्‍यावरून आणि ‘‘साधारण चांद्रायणाविषयी विधि’’ असें ‘‘पराशराचें’’ वचन आहे त्‍यावरून. ‘‘सामान्य चांद्रायण’’ ‘‘तोच’’ सांगतो---दररोज अमुकच घास खावे असें नसल्‍याने एक महिन्यांत कसेंही करून दोनशे चाळीस घास खावे हा ‘‘सामान्य चांद्रायण’’ होय. ‘‘पिपीलिकामध्य’’ व ‘‘यवमध्य’’ यां वाचून इतर चांद्रायणांत इतर दिवशीही आरंभ करावा, प्रतिपदेसच करावा असें नाही.

घास केवढा घ्‍यावा त्‍याचें प्रमाण. चांद्रायणांत एकादशी वगैरेंचा उपास आला असतां निर्णय.

घासांचें प्रमाण ‘‘याज्ञवल्‍क्‍य’’ सांगतो---शुक्‍लपक्षांत तिथींच्या वृद्धीप्रमाणें मोराच्या अंड्या एवढे घास करावे. ‘‘चांद्रायणप्रकरणांत’’ ‘‘पराशर तर’’---कोंबड्याच्या अंड्या एवढा घास करावा. ‘‘शंख’’ तर---चांद्रायणांत ओल्‍या आवळ्या एवढे घास सांगितले’’ याप्रमाणें सांगतो. या सांगितलेल्‍या घासांच्या प्रमाणांचा शक्तीप्रमाणें विकल्‍प समजावा. एकादशी वगैरे दिवशी नित्‍य प्राप्त होणार्‍या उपासाला चांद्रायणविधीनें बाध येतो. कारण, याला (चांद्रायणाला) ‘‘जो धर्मासाठी हें चांद्रायण करील तो चंद्राच्या लोकास जाईल’’  असें काम्‍यत्‍व आहे आणि लसुण वगैरे पदार्थांच्या भक्षणाचे निमित्त घडलें असतां त्‍याविषयी याचा विधि असल्‍यानें याला नैमित्तिकत्‍व आहे. काम्‍य असा एकादशी वगैरेंचा उपास दुसर्‍याकडून करवावा. कारण, ‘‘कात्‍यायनादिकांनी’’ ‘‘(एखादें कर्म) प्रतिनिधीकडून केलें असतां फळाची प्राप्ति होते’’ असें सांगितलें. (याबद्दलची) वचनें म्‍यां केलेल्‍या ‘‘समयमयूखांत’’ पहावी. हा एकादशी वगैरेच्या उपासाचा प्रतिबिंध सामान्य चांद्रायणावाचून इतर चांद्रायणांतच होतो. कारण, त्‍यांत (सामान्य चांद्रायणांत) दररोज अमुकच घास घ्‍यावे असा नियम नाही.

चांद्रायणाचा विधि.

‘‘गौतम’’ आतां यानंतर चांद्रायण सांगतो. त्‍याचा विधि कृच्छ्रांत सांगितला आहे. पौर्णिमेच्या आदले दिवशीं व्रताचा संकल्‍प करून क्षौर करावें त्‍या दिवशी उपास करावा. दुसरे दिवशी ‘‘आप्यायस्‍व’’ ‘‘संते पयांसि’’ व ‘‘नवो नवो’’ या तीन मंत्रांनी तर्पण, तुपाचा होम, हविष्‍यान्नाचें अभिमंत्रण व चंद्राचें उपस्‍थान (प्रार्थना) करून ‘‘यद्देवा देव हेडनं’’ या चार ॠचांनीं तुपाचा होम करून शेवटी ‘‘देवकृतस्‍य’’ या तीन मंत्रांनीं तीन समिधांचा होम करून ‘‘ॐ भूः, भुवः, स्‍वः, महः, जनः, तपः, सत्‍यं, यशः, श्रीः, इट्‌, ओजः, तेजः, पुरुषः, धर्मः, शिवः’’ या मंत्रांनीं घासांचें अभिमंत्रण करून ‘‘मनसानमः स्‍वाहा’’ असें म्‍हणून सर्व घासांचें भक्षण करावे. याप्रमाणें दुसर्‍या पंधरवड्यात समजावे. सुखानें तोंडात घेतां येईल असें घासाचे प्रमाण असावे. चरु, भैक्ष, सक्तुकण, यांवक, शाके, दुध, दहि, तूप, फळ व पाणी हीं उत्तरोत्तर प्रशस्‍त होत. पौर्णिमेच्या दिवशी पंधरा घास खाऊन कृष्‍णपक्षांत एक एक कमी करून खावे. अमावस्‍येच्या दिवशी उपास करून शुक्‍लपक्षांत प्रतिपदेपासून क्रमानें एक एक घास वाढवून खावे. कित्‍येकांचे मत याच्या उलट आहे. हा चांद्रायणमास होय.

चांद्रायणाचा विधि.

‘‘बौधायन’’---आतां या नंतर (आम्‍ही) चांद्रायणाचा कल्‍प सांगू---शुक्‍लपक्षांतील किंवा कृष्‍णपक्षांतील चतुर्दशीस उपास करून केश, दाढी मिशांचे केस, शरीरावरील केस व नखें काढवून किंवा दाढी मिशांचे केस इ० ‘‘यम’’---लोखंडाचें पितळ वगैरेंचे व चाकावर केलेलें (घडा, पणती वगैरे मातीचें) भांडें वर्ज्य करावे. तें राक्षसांचें पात्र होय. जें चाकावर उत्‍पन्न झालें नसेल तें देवाचें पात्र होत. ‘‘तोच’८---बोटांच्या अग्रांवर घास घेऊन गायत्री मंत्रानें अभिमंत्रण करावे. यांत घासांच्या योगानें प्राणाहुति ‘‘बौधायन’’ सांगतो---पहिला घास ‘‘प्राणाय’’ असें म्‍हणून घ्‍यावा. दुसरा ‘‘अपनाय’’ म्‍हणून घ्‍यावा. तिसरा ‘‘व्यानाय’ म्‍हणून चवथा ‘‘उदानाय’’ म्‍हणून व पांचवा ‘‘समानाय’’ म्‍हणून घ्‍यावा. जेव्हां चारच घास घ्‍यावयाचे असतील तेव्हां ‘‘प्राण’’ व ‘‘अपान’’ यांच्या योगानें पहिला घास घेऊन बाकीचे तीन व्यानादि तिघांनी घ्‍यावें. जेव्हां तीन घास घ्‍यावयाचे असतील तेव्हां दोन ‘‘प्राण व अपान’’ व ‘‘व्यान’’ व ‘‘उदान’’ या दोघा दोघांनी व तिसरा ‘‘समान’’ यानें घ्‍यावा. दोन घास घ्‍यावयाचे असतां पहिला घास पहिल्‍या तिघांनी (प्राण, अपान व व्यान यांनी) व दुसरा पुढल्‍या दोहोंनी घ्‍यावा. एक घास घ्‍यावयाचा असतां सर्वांनी एक घ्‍यावा.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP