मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १४१ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १४१ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘प्रायश्चित्तविवेके सवर्तः’’ अपोशानमकृत्‍वा तु योभुंक्तेनापदि द्विजः। भुंजानस्‍तु यदा ब्रूयाद्गायत्र्यष्‍टशतं जपेत्‌।
अष्‍टशतमष्‍टोत्तरशतं ‘‘स एव’’ अनाचांतः पिबेद्यस्‍तु भक्षये द्वापि किंचन। गायत्र्यष्‍टसहस्रं तु जपं कृत्‍वा विशुध्यति।
‘‘लघुहारीतः’’ विना यज्ञोपवीतेन भुंक्तेच ब्राह्मणो यदि। स्‍नानं कृत्‍वा उपवासेन शुध्यति। ‘‘ब्रह्मपुराणे’’ रेतोमूत्रपुरीषाणामुत्‍सर्गश्र्चेत्‍प्रमादतः।
तदादौ तु प्रकर्तव्या तेन शुद्धि र्मृदंबुभिः। पश्र्चादाचम्‍य तु जले जप्तव्यमघमर्षणं। एतदनगीर्णग्रासे।
‘‘सकृन्निगीर्णग्रासे तु आपस्‍तंबः’’ भुंजानस्‍य तु विप्रस्‍य कदाचित्‍स्रवते गुंद। उच्छिष्‍टमशुचित्‍वं च प्रायश्चित्तं कथं भवेत्‌।
आदौ कृत्‍वा तु वै शौचं ततः पश्र्चादुपस्‍पृशेत्‌। अहोरात्रोषितो भूत्‍वा पंचगव्येन शुध्यति।
‘‘यत्तु शातातपः’’ मूत्रोच्चारसमुत्‍सर्गे मोहाद्भुंक्तेथवा पिबेत्‌। त्रिरात्रं तत्र कुर्वीत इतिशातातपोब्रवीदिति तद्भूयोग्रासाशने।
‘‘आपस्‍तंबः’’ मूत्रोच्चारं सकृत्‍कृत्‍वा अकृत्‍वा शौचमात्‍मनः। मोहाद्भुंक्‍त्‍वा त्रिरात्रं तु यवान्‌ पीत्‍वा विशुध्यतीति मूत्रपदं पुरीषादेरुपलक्षणं

कांहीं अडचण नसून आपोशन घेतल्‍यावांचून व यज्ञोपवितावाचून भोजन वगैरे केलें तर प्रायश्चित्त. जेवतांना गुदस्राव झाला असतां व मूत्रपूरीषोत्‍सर्ग करून त्‍याची शुद्धि न करतां भोजन केलें तर प्रायश्चित्त.

‘‘प्रायश्चित्तविवेकांत संवर्त’’---जो द्विज कांहीं आपत्ति नसून आपोशन घेतल्‍यावाचून जेवील. तसेंच जेवीत असतां जर बोलेल तर त्‍यानें एकशें आठ वेळां गायत्रीजप करावा. ‘‘तोच’’---जो आचमन केल्‍यावाचून कांहीं पिईल किंवा खाईल तर त्‍यानें गायत्रीमंत्राचा एक हजार आठ वेळां जप करावा म्‍हणजे तो शुद्ध होईल. ‘‘लघुहारीत’’---जर ब्राह्मण यज्ञोपवितावाचून भोजन करील, तर त्‍यानें स्‍नान करून उपवास करावा म्‍हणजे तो शुद्ध होईल. ‘‘ब्रह्मपुराणांत’’ जर अज्ञानानें रेत, मूत व पुरीष यांचा उत्‍सर्ग झाला तर त्‍यानें अगोदर माती व पाणी यांच्या योगानें शुद्धि करून नंतर आचमन करून पाण्यांत अघमर्षणाचा जप करावा. हें घास गिळलां नसतां त्‍याविषयीं जाणावें. ‘‘एक वेळां घास गिळला तर त्‍याविषयीं आपस्‍तंब’’---जर ब्राह्मण जेवीत असतां कदाचित्‌ त्‍याच्या गुदाचा स्राव होईल, तर त्‍याला उच्छिष्‍टत्‍व व अशुचित्‍व येईल म्‍हणून त्‍याचें प्रायश्चित्त कसें होईल? अगोदर त्‍यानें शुद्धि करून आचमन करावें. नंतर एक दिवस उपास करून पंचगव्य घ्‍यावें म्‍हणजे शुद्ध होईल. ‘‘जें तर शातातप’’ जर ब्राह्मण मूत्र व पुरीष केल्‍यानंतर त्‍यांची शुद्धि न करतां अथवा कांहीं पिईल, तर त्‍यानें तीन दिवस उपवास करावा असें शातातपानें म्‍हटलें आहे असें म्‍हणतो तें वारंवार घास घेतलें असतां त्‍याविषयी जाणावें. ‘‘आपस्‍तंब’’---जो एक वेळां मूत्रोत्‍सर्ग करून आपली शुद्धि न करून जर अज्ञानानें खाईल, तर त्‍यानें तीन दिवस यव (जव) खावे म्‍हणजे तो शुद्ध होईल. ‘‘मूत्रपद’’ हें पुरीषादिकाचें उपलक्षण आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP