मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ४३ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ४३ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ पातित्‍यहेतवः

‘‘गौतमः’’ ब्रम्‍हहत्‍यासुरापगुरुतल्‍पगमातृपितृयोनिसंबंधगस्‍तेननास्‍तिकनिंदितकर्माभ्‍यासिपतितात्‍याग्‍यपतितत्‍यागिनः पतिताः पातकसंयोजकाश्र्च मातृपितृयोनिसंबंधगो मातृष्‍वसृपितृष्‍वस्रात्‍मभगिनीगामी। स्‍तेनः सुवर्णतत्‍समयोः।
नास्‍तिको वेदाप्रामाण्यवादी अपतितत्‍यागी गुरुभिशप्य तत्त्यक्ता। पातकसंयोजकाः स्‍वसंसर्गेण दोषहेतव इति प्रांचः।
‘अपरार्के तु’ पातकसंयोजकाः प्रयोजकादस्‍तेपि पतिता इति एवं कल्‍पतरावपि ‘‘यमः’’ मातृष्‍वसा मातृसखी दुहिता च पितृष्‍वसा।
मातुलानीस्‍वसाश्र्वश्रूर्गत्‍वा सद्यःपतेन्नर इति ‘‘मनुः’’ सद्यः पतति मांसेन लाक्षया लवणेन च ‘‘स एव’’ छत्राकं विड्वराहं च लशुनं ग्रामकुक्‍कुटं पलांडु गृंजनं चैव मत्‍या जग्‍ध्‍वा पतेन्नरः’’ ‘‘यमः’’ जलाग्‍न्‍युद्वंधनभ्रष्‍टाःप्रवज्‍यानाशकच्युताः। विषप्रपतनप्रायशस्त्रघातहताश्र्च ये। नवैत प्रत्‍यवसिताः सर्वलोकबहिष्‍कृताइति उपनयनमुख्यगौणकालात्तिक्रमे व्रात्‍यानां पातित्‍यमाह ‘‘याज्ञवल्‍क्‍यः’’ अत उर्ध्व पतंत्‍येते सर्वधर्मबहिष्‍कृताः। सावित्रीपतिता व्रात्‍यस्‍तोमादृते क्रतोः।
‘‘आश्र्वलायनोऽपि’’ अत ऊर्ध्वं पतितसावित्रिका भवंति नैतानुपयेन्नाध्यापयेन्न याजयेन्नैभिर्व्यवहरेयुरिति ‘‘अत्रिः’’ आरूढपतितं विप्रं मंडलाच्च विनिःसृतं। उद्बध्दं कृमिदष्‍टं च स्‍पृष्‍ट्वा चांद्रायणं चरेत्‌।
आरूढो गृहस्‍थव्यतिरिक्तआश्रमी ब्रह्मचर्यस्‍खलनाद्विजातिकर्मानधिकारी। मंडलात्‌ स्‍वस्‍वजातीयेभ्‍यो विनिः सृतो बहिर्भूतः।
उद्बंध उद्बंधनाच्च्युत आत्‍महंता। कृमिदष्‍टः श्र्वादिदंशक्षते उत्‍पन्नकृमिः। ‘‘मनुः’’ चांडालांत्‍यस्त्रियो गत्‍वा भुक्‍त्‍वा च प्रतिगृह्य च।
पतत्‍यज्ञानतो विप्रो ज्ञानात्‍साम्‍यं तु गच्छंति ‘गौतमः’’ न स्त्रीषु गुरुतल्‍पं पतंतीत्‍येके। भ्रूणहनने हीनवर्णसेवायां स्त्री पततीति।
मातृपितृयोनिसंबंधगः पततीत्‍यस्‍यापवादः तासुगुर्वंगनाव्यतिरिक्तासु गच्छन्नपि न पततीत्‍येके मन्यंते। किं तु प्रायश्र्चित्तीयते।
गौतमस्‍तु पततीति मन्यते। स्‍तेयं बुध्यबुध्यापेक्षोऽभ्‍यासानभ्‍यासापेक्षो वा व्यवस्‍थितो विकल्‍प इति ‘‘भृर्तृयज्ञः’’ भृणुहनने गर्भवधे। हीनसेवायां स्‍वापेक्षया हीनवर्णपुरुषगमने प्रतिलोमगमने च। ‘‘याज्ञवल्‍क्‍यः’’ नीचाभिगमनं गर्भपातनं भर्तृहिंसनं।
विशेषपतनीयानि स्त्रीणामेतान्यपि ध्रुवं। अपि शद्बाद्ब्रम्‍हहत्‍यादीन्युपपातकान्यप्यभ्‍यस्‍तानि।
नीचो हीनवर्णः शूद्रः तद्गपनं च गर्भोत्‍पत्‍यंतं अत एव व्यभिचारादृतौ शृद्धिर्गर्भे त्‍यागो विधीयते।
गर्भभर्तृवधादौ च तथा महति पातक इति याज्ञवल्‍क्‍यवाक्‍ये शूद्रकृते गर्भ इति प्रांचां व्याख्यानं।
ब्राह्मणक्षत्रियविंशां भार्याः शूद्रेण संगताः।
अप्रजाता विशुध्यंति प्रायश्र्चित्तेन नेतरा इति वासिष्‍ठात्‌ ‘‘यत्तु शौनकः’’ पुरुषस्‍य यानि पतननिमित्तानि स्त्रीणामपितान्येव।
ब्राह्मणी हीनवर्णसेवायामधिकं पततीति तत्र हीनवर्णसेवा गर्भातं शूद्रगमनं प्रतिलोमगमनमात्रं च ‘‘वसिष्‍ठः’’ त्रीणि स्त्रियाः पातकानि लोके धर्मविदो विदुः। भर्तृर्वधो भ्रूणहत्‍या स्‍वस्‍य गर्भस्‍य पातनं भ्‍ज्ञूणहत्‍येक्तिर्दृष्‍टांतार्था ‘‘स एव’’ चतस्रस्‍तु परित्‍याज्‍याः शिष्‍यगा गुरुगाच पतिघ्‍नी च विशेषणजुंगितोपगता च या। जुंगितः प्रतिलोमजः। शिष्‍यगमनपि पातित्‍यहेतु पतिवधसाहचर्यात्‍पातित्‍यहेतुत्‍वं।
त्‍यागश्र्च वस्त्रान्नगृहवासादिजीवनहेत्‍वावविच्छेदेन। नीचाभिगमनादावपीत्‍थमेव त्‍यागः।
प्रायश्र्चित्तं चिकीर्षंतीनां त्‍कत्त्यागमाह ‘‘याज्ञवल्‍क्‍यः’’ पतितानामेष एव विधिः स्त्रीणां प्रकीर्तितः।
वासोगृहांतिके देयमन्नं वासः सरक्षणं। ‘‘मनुः’’ पतत्‍यर्धशरीरस्‍य यस्‍य भार्या सुरां पिबेत्‌।
पतितार्धशरीरस्‍य निष्‍कृतिर्न विधीयत इति द्विजातिभार्यायाः शूद्रायाः सुरापान निषेधार्थमिति ‘‘विज्ञानेश्र्वरः’’।
‘‘माधवस्‍तु’’ ब्राम्‍हण्यादीनामप्ययं निषेधः। स्त्रियाभर्तुसरसंर्गेऽपि दोषार्थमुत्तरार्धं। सहाधिकात्‍स्‍त्रिया अर्धश्शरीरत्‍वं।
पतितमर्धं शरीरं यस्‍येति बहुव्रीहि रित्‍यूचे तन्न ब्राह्मण्यादीन्‌ प्रतिषेधे वचोवैयर्थ्यापत्तेः बहुव्रीहौ लक्षणापत्तेश्र्च अतो ‘‘विज्ञानेश्र्वर’’ एव सम्‍यगूचे.

पातित्‍याचीं कारणे.

ज्‍यां पासून पातित्‍य होतें अशी ब्रम्‍हहत्‍या, मद्यपान इत्‍यादि पातकें.

‘‘गौतम’’---ब्राम्‍हणाचा वध, मद्य पिणारा, गुरूच्या स्त्रीशी गमन करणारा, मावशी आत व आपली बहीण यांशी गमन करणारा, सोने व सोन्याप्रमाणें इतर पदार्थ यांची चोरी करणारा, वेद अप्रमाण मानणारा, वारंवार र्निदित कर्म करणारा, पतिताचा स्‍वीकार करणारा, गुरूवर खोटा दोषारोप करून त्‍याचा त्‍याग करणारा व पातकसंयोजक हे पतित होत. ‘पातकसंयोजक’ म्‍हणजे आपल्‍या संसर्गानें दोषास कारणभूत असणारें असें ‘‘प्रांच’’ म्‍हणतात. ‘‘अपरार्कांत’’ तर ‘६पातकसंयोजक’’ म्‍हणजे प्रयोजक वगैरे तेही पतित (होत). ‘‘कल्‍पतरूंत’’ ही असें आहे. ‘‘यम’’---मावशी, आईची मैत्रीण, मुलगी (आपली), बापाची बहीण (आते), मामाची बायको (मामी), बहीण (आपली) व सासु यांच्याशी जो मनुष्‍य गमन करील तो तत्‍काल पतित होतो. ‘‘मनु’’---मांस, लाख व मीठ यांच्या योगानें तत्‍काळ पतित होतो. ‘‘तो’’---च---छत्राक, विष्‍ठा, डुक्‍कर, लसूण, गावांतील कोंबडा, कांदा, व गृंजन हे (पदार्थ) जो मनुष्‍य बुद्धिपूर्वक भक्षण करील तो पतित होईल. ‘‘यम’’---पाणी, अग्‍नि व उद्बंधन यांपासून नाश पावलेले, संन्यास व उपास यांपासून भ्रष्‍ट झालेले आणि विष, पर्वताच्या शिखरावरून पडणें, महाप्रस्‍थान व शस्त्राचा धाव यांच्या योगानें मेलेले हे नऊ सर्व लोकांनी बहिष्‍कृत केलेले असे प्रत्‍यवसित (पतित) होत. ‘‘याज्ञवल्‍क्‍य मुंजीचा मुख्य व कनिष्‍ठ असे दोन काळ निघून गेले असतां व्रात्‍य होतात, त्‍यांस पातित्‍य सांगतो’’---या पुढें हे (ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य) सर्व धर्म करण्यास अयोग्‍य असे पतित होतात. गायत्री मंत्रानें रहित असे हे ‘‘व्रात्‍यस्‍तोम’’ नांवाच्या यज्ञावाचून व्रात्‍ये होतात. ‘‘आश्र्वलायन’’---ही यापुढें हे पतित सावित्रिक होतात. यांची मुंज करूं नये, त्‍यांच्याकडून यज्ञ करवूं नये व यांच्याशी व्यवहार करूं नये. ‘‘अत्रि’’---गृहस्‍थाश्रमावाचून दुसर्‍या आश्रमांत असलेला मनुष्‍य ब्रम्‍हचर्याचें स्‍खलन झाल्‍यानें द्विजाति कर्माचा अनधिकारी, आपल्‍या जातीतील लोकांनी बहिष्‍कृत केलेला, गळफासानें आत्‍महत्‍या करणारा आणि कुत्रे वगैरे डसून त्‍यापासून पडलेल्‍या क्षतांत उपन्न झालेल्‍या किड्यांनी दंश केलेला मनुष्‍य यांस स्‍पर्श केला असतां चांद्रायण व्रत करावे. ‘‘मनु’’---जो ब्राह्मण अज्ञानानें चांडाळ व अंत्‍यज यांच्या स्त्रियांशी गमन करील, त्‍यांचें अन्न भक्षण करील व त्‍यांच्यापासून दान घेईल तो पतित होईल. जर तो (पूर्वी सांगितलेलें) जाणून (बुद्धिपूर्वक) करील तर तो त्‍यांच्या (चांडाळादिकां) प्रमाणें होईल.

स्त्रियांची पातितयाची करणें.

‘‘गौतम’’---गुरूच्या स्त्री वाचून इतर स्त्रियांशी गमन करणारा पतित होत नाही, परंतु प्रायश्र्चित्ती होतो असें ‘‘कित्‍येक’’ मानितात. मावशी, आत व बहीण यांशीं गमन करणारा पतित होतो (पृष्‍ठ ९५ पहा) याचा अपवाद आहे. ‘‘गौतम’’ तर तो पतित होतो असें मानतो. या विकल्‍पाचा ज्ञान, अज्ञान, अभ्‍यास किंवा अनभ्‍यास याची जरूर पडेल त्‍याप्रमाणें व्यवस्‍था करावी असें ‘‘भर्तृयज्ञ’’ म्‍हणतो. गर्भ पाडणें व नीचाशी गमन करणें ही केली असतां स्त्री पतित होते. ‘‘याज्ञवल्‍क्‍य’’---नीचाशीं गमन करणें, गर्भ पाडणें, व नवर्‍यास ठार मारणें ही स्त्रियांस विशेषें करून पातित्‍य आणणारीं आहेत. या वचनांत ‘‘अपि’’ शद्ब आहे त्‍यावरून ब्रम्‍हहत्‍यादि पातकें व उपपातकांचा अभ्‍यास यांच्या योगानें स्त्रियांस पातित्‍य येते. नीच म्‍हणजे कमी जातीचा शूद्र त्‍याच्याशी गमन करणें तें गर्भ उत्‍पन्न होई पर्यंत. म्‍हणूनच ‘‘स्त्रीपासून व्यभिचार घडला असतां ती विटाळशी झाली म्‍हणजे तिची शुद्धि होते. तिला गर्भ राहिला असतां, तिनें गर्भ व पति यांचे वघादि केलें असतां आणि मोठें पातक केलें असतां तिचा त्‍याग करण्यांत यावा. ‘‘याज्ञवल्‍क्‍याच्या’’ वचनांत गर्भ म्‍हणजे शूद्रानें केलेला अशी पूर्वे कडील पंडितांनीं व्याख्या केली आहे. कारण, ‘‘ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांच्या स्त्रियांनी शूद्राशीं गमन करून जर त्‍यांस गर्भ राहिला नाही तर त्‍या प्रायश्र्चित्तानें शूद्ध होतील. जर गर्भ राहिला तर त्‍या प्रायश्र्चित्तानेंही शुद्ध होणार नाहीत’’ असें ‘‘वसिष्‍ठाचें’’ वचन आहे. जें तर ‘‘शौनक’’ पुरुषास पातित्‍य येण्यास जी कारणे होतात, तीच स्त्रियांसही होतात. ब्राह्मणाची स्त्री हीनवर्णाच्या सेवेपासून अधिक पतित होते’’ असें म्‍हणतो त्‍यांत हीनवर्णाची सेवा करणें ती गर्भ उत्‍पन्न होईपर्यंत शूद्राशी व प्रतिलोमाशी गमन करणें याप्रमाणें जाणावी.
‘‘वसिष्‍ठ’’---नवर्‍यास ठार मारणें भ्रूणहत्‍या (बालहत्‍या) व गर्भ पाडणें ही तीन या लोकांत स्त्रियांस पातकें आहेत असें धर्मशास्त्र जाणणारें म्‍हणतात. भ्रूणहत्‍येची उक्ति दृष्‍टांतासाठी आहे. ‘‘तोच’’---शिष्‍याशी गमन करणारी, गुरूशी गमन करणारी, नवर्‍यास ठार मारणारी प्रतिलोमाशी गमन करणारी, या चौघींचा त्‍याग करावा. त्‍याग करणें तो वस्त्र, अन्न, घरांत रहाणें, वगैरे जीविकेचें जें साधन त्‍यासह करावा. नीचाशी गमन करणें इत्‍यादिकांच्या ठिकाणी असाच त्‍याग समजावा. ‘‘याज्ञवल्‍क्‍य प्रायश्र्चित्त करणारींचा तर त्‍याग करूं न ये असे सांगतो’’---घराचे जवळ रहावयास जागा देऊन अन्न व वस्त्र यांच्या योगानें रक्षण करणें हाच प्रकार पतित स्त्रियांस सांगितला. ‘‘मनु’’---ज्‍याची स्त्री मद्यपान करील त्‍याचें अर्धे शरीर पतित होते. याप्रमाणें अर्धें शरीर ज्‍याचें पतित झालें त्‍याचें प्रायश्र्चित्त करण्यांत येत नाही. हें द्विजाच्या शूद्रवर्णाच्या स्त्रीस मद्यपानाच्या निषेधासाठी सांगितलें असें ‘‘विज्ञानेश्र्वर’’ म्‍हणतो. ‘‘माधव तर’’ ब्राम्‍हणी इत्‍यादि स्त्रियांसही हा निषेध आहे. श्र्लोकाचें उत्तरार्ध स्त्रीशीं नवर्‍याचा संसर्ग नसूनही त्‍याला दोष घडतो त्‍या विषयी आहे. (कारण) नवर्‍या बराबर स्त्रियेला अधिकार आहे म्‍हणून ‘‘अर्धशरीरत्‍व’’. पतित (आहे) अर्धें शरीर ज्‍याचें असा ‘‘बहुव्रीहि’’ करावा’’ असें म्‍हणतो तें बराबर नाहीं, कारण ब्राम्‍हणी इत्‍यादिकांस निषेधा विषयीं वाक्‍याला वैयर्‍थ्‍याची आपत्ति येते, आणि बहुव्रीहीचें लक्षण करण्या विषयीं आपति येते, म्‍हणून ‘‘विज्ञानेश्र्वरानेंच’’ बराबर सांगितलें.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP