मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ११५ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ११५ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ श्राद्धभोजने.

‘‘शंखः’’ चांद्रायणं नवश्राद्धे पराकोमासिके मतः। पक्षत्रयेतिकृच्छ्रं स्‍यात्‍षण्मासे कृच्छ्रमेव च।
आद्बिके कृच्छ्रपादः स्‍यादेकाहः पुनराद्बिके। अतऊर्ध्वं न दोषः स्‍याच्छंखस्‍य वचनं यथेति।
मासिके आद्ये द्वितीयादिषु तु प्रायश्चित्ततारतभ्‍यं कल्‍प्‍यं। षाण्मासिकशद्बेन ऊनषाण्मासिकमपि गृह्यते एवमाद्बिकपदेन ऊनद्बिकमपि।
दोषः पूर्ववदिति शेषः। ‘‘यत्तु भरद्वाजः’’ भुक्तं चेत्‍पार्वणश्राद्धे प्राणायामाः षडाचरेत्‌। उपवासस्त्रिमांसादिवत्‍सरांतं प्रकीर्तितः।
प्राणायामत्रयं वृद्धावहोरात्रं सपिंडने। असरूपे स्‍मृतं नक्तं व्रतपारणके तथा। द्विगुणं क्षत्रियस्‍यैतात्‍त्रिगुणं वैश्यभोजने।
साक्षाच्चतुर्गुणं ह्येतत्‍स्‍मृतं शूद्रस्‍य भोजने इति तत्र त्रिमासादीत्‍यापद्विषयं ‘‘यत्तु हारीतः’’ चांद्रायणं नवश्राद्धे प्राजापत्‍यं तु मिश्रके।
एकाहस्‍तु पुराणेषु प्रायश्चित्तं विधीयते इति तच्छंखवाक्‍यसमानविषयं। मिश्रकं संवत्‍सरांतर्गत श्राद्धमित्‍यपरार्के एकादशाहिकमित्‍यन्ये।
चांद्रायणं नवश्राद्धे इत्‍येतदाद्यनवश्राद्धविषयं प्राजापत्‍यं तु मिश्रक इत्‍याद्यमासिकविषयं द्वितीयनवश्राद्धादिषु षट्‌त्रिंशन्मतोक्तं प्राजापत्‍यं नवश्राद्धे इत्‍येतदाद्यन्वश्राद्धविषयं प्राजापत्‍यं तु मिश्रक इत्‍याद्वमासिकविषयं द्वितीयनव श्राद्धादिषु षट्‌त्रिंशन्मतोक्तं प्राजापत्‍यं नवश्राद्धे पादोतं चाद्यमासिके। त्रैपक्षिके तदर्धं स्‍याद्वद्यौ पादौ मासिके तथा। पादोनं कृच्छ्रमुद्दिष्‍टं षण्मासे च तथाद्बिके।
त्रिरात्रं चान्यमासेषु प्रत्‍यद्बे तदहः स्‍मृतमिति

नवश्राद्ध, मासिक, पक्षत्रय, ऊनषाण्मासिक, षाण्मासिक वगैरे श्राद्धांत भोजन केलें तर प्रायश्चित्त.

 ‘‘शंख’’---नवश्राद्धांत चांद्रायण, मासिकांत पराक, पक्षत्रयांत (दीड महिन्यानें होणार्‍यांत) अतिकृच्छ्र, षाण्मासिकात कृच्छ्र, आद्बिकांत (वर्षश्राद्धांत) कृच्छ्रापाद, दुसर्‍या आद्बिकांत (तिसर्‍या वर्षांतील श्राद्धांत) एक दिवस प्रायश्चित्त. यानंतर पुढें दोष नाहीं असें शंखाचें वाचन आहे. मासिक म्‍हणजे पहिलें घ्‍यावें. दुसर्‍या मासिकादिकांत तारतम्‍यानें प्रायश्चित्त योजावें. षाण्मासिक शब्‍दावरून ऊनषाण्मासिकही घ्‍यावे. याप्रमाणें आद्विकपदावरून ऊनाद्विकही घ्‍यावें. दोष पूर्वीप्रमाणें जाणावा. ‘‘ जें तर भरद्वाज’’ पार्वणश्राद्धांत भोजन केलें तर सहा प्राणायाम करावे. तीन महिन्यापासून वर्ष समाप्त होई तोपर्यंत उपवास प्रायश्चित्त सांगितलें. वृद्धिश्राद्धांत भोजन केलें तर तीन प्राणायाम, सपिंडीच्या श्राद्धीं एक दिवस उपास करावा. असरूपांत तसेंच व्रताच्या पारणेंत नक्त सांगितलें, हें (प्रायश्चित्त) क्षत्रियाच्या भोजनाविषयीं दुप्पट जाणावें. वैश्याच्या भोजनाविषयी तिप्पट व साक्षात्‌ शूद्राच्या भोजनाविषयी चौपट सांगितलें’’ असें सांगतो त्‍यांत ‘‘त्रिमासादि इ०’’ (तिसर्‍या महिन्यापासून वर्ष समाप्त होई तोपर्यंत इत्‍यादि) हें संकट विषयीं जाणावे. ‘‘ जें तर हारीत’’ ‘‘नवश्राद्धांत चांद्रायण, मिश्रांत प्राजापत्‍य व पुराणांत एक दिवस प्रायश्चित्त करण्यांत यावें.’’ असें म्‍हणतो तें शंखानें सांगितलेल्‍या वचनाच्या अर्थाप्रमाणें जाणावें, मिश्रक म्‍हणजे वर्षांत येणारें श्राद्ध असें अपरार्कांते आहे. एकादशाहिक असें दुसरें म्‍हणतात. ‘‘चांद्रायणं नवश्राद्धे’’ हें पहिल्‍या नऊ श्राद्धाविषयीं जाणावें. ‘‘प्राजापत्‍यं मिश्रके’’ हें पहिल्‍या मासिकाविषयीं जाणावें. दुसरीं नऊ श्राद्धें इत्‍यादिकाविषयीं तर षट्‌त्रिंशन्मतांत सांगितलेलें ‘‘नवश्राद्धांत प्राजापत्‍य, पहिल्‍या मासिकांत तीन चतुर्थांश (प्राजापत्‍याचा), त्रैपक्षिकांत अर्धें, तसेंच मासिकांत  (दुसर्‍या महिन्यांत) अर्धें, षाण्मासिक व आद्बिक (सांवत्‍सरिक) यांच्या ठिकाणीं तीनचतुर्थांश कृच्छ्र, दुसर्‍या महिन्यांत तीन दिवस व प्रतिसंवत्‍सरांत एक दिवस प्रायश्चित्त सांगितलें’’ हें प्रायश्चित्त जाणावें.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP