मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ४० वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ४० वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ सोमायनम्‌

‘‘मार्कंडेयः’’ गोरक्षीरं सप्तरात्रं तु पिबेत्‍स्‍तनचतुष्‍टयात्‌। स्‍तनत्रयात्‍सप्तरात्रें सप्तरात्रं स्‍तनद्वयात्‌।
स्‍तनेनैकेन षड्रात्रं त्रिरात्रं वायुभुग्‍भवेत्‌। एतत्‍त्रिंशद्दिनसाध्यं। ‘‘चतुर्विंशतिदिनसाध्यमाह’’ चतुर्थीप्रभृति चतुःस्‍तनेन त्रिरात्रं।
त्रिस्‍तनेन त्रिरात्रं। द्विस्‍तनेन त्रिरात्रं। एकस्‍तनेन त्रिरात्रं। एकस्‍तनप्रभृति पुनश्र्चतुः स्‍तनांतं याते सोमचतुर्थीनूस्‍तस्‍यै स्‍वाहा।
एवं पंममीषष्‍ठीत्‍येवं यथार्थास्‍तिथिहोमाः। एकमास्‍या एनोभ्‍यः पूतश्र्चंद्रमसः समानतां सामान्यतां। समानलोकतां सायुज्‍यं गच्छति। समाप्ते ब्राम्‍हणतर्पणं दक्षिणादानं च। चतुर्थी कृष्‍णा। समानतां तुल्‍यत्‍वं। सामान्यता अपरचंद्रत्‍वं। सायुज्‍यं चंद्राभेदः।

सर्वेषां कृच्छ्राणां फलार्थत्‍वमाप्याह ‘‘व्यासः’’ श्रीकामः पुष्‍टिकामश्र्च स्‍वर्गकामस्‍तथैव च। देवताराधनपरस्‍तथा कृच्छ्रं समाचरेत्‌।
रसायनानि मंत्राश्र्च तथा वै चौषधानि च। तस्‍य सर्वाणि सिध्यंति यो नरः कृच्छ्रकृद्भवेत्‌।
वैदिकानि च सर्वाणि यानि काम्‍यानि कानिचित्‌। सिध्यंति सर्वदानानि कृच्छ्रकर्तुर्न संशय इति।

सोमायनव्रत.

सोमायनव्रताचा विधि.

‘‘मार्कंडेय’’---गाईच्या चार थानांतील दुध सात रात्रि पावेंतों प्यावे. नंतर सात रात्रि पावेंतों तीन थानांतील दुध प्यावे. नंतर दोन थानांतील दुध सात रात्रि पावेंतों प्यावें. नंतर सहा रात्रि पावेंतों एक थानाचें दुध प्यावे. नंतर पुढें तीन रात्रि पावेंतों वायुभक्षण करून रहावे. हे तीस दिवसांनी साध्य होणारे व्रत आहे. ‘‘चोवीस दिवसांनीं साध्य होणार्‍या (व्रत) स’’’ सांगतो---चतुर्थीपासून तीन रात्रि पावेंतों चार थानांचें दुध प्यावे. नंतर तीन थानांचें तीन रात्रि पावेंतों प्यावे. पुढें दोन थानांचें तीन रात्रि पावेंतों प्यावे. नंतर एका थानांचें तीन रात्रि पावेंतों प्यावें. याप्रमाणें पुन्हा एका थाना पासून तों चार थानांपावेंतों करावे. दुध पिणें तें ‘‘सोम चतुर्थीतनूस्‍तस्‍यै स्‍वाहा’’ असें म्‍हणून प्यावे. याप्रमाणें पंचमी, षष्‍ठी वगैरे तीथींचें समजावें. जसें ‘‘सोम पंचमी तनूस्‍तस्‍यै स्‍वाहा इ. याप्रमाणें (व्रत करणारा) एका महिन्यानें पापांपासून पवित्र होत्‍साता चंद्राशीं तुल्‍यता, अपरचंद्रत्‍व, व चंद्राशीं अभेद यांला पावतो. व्रताची समाप्ति झाल्‍यानंतर ब्राह्मणांस भोजन व दक्षिणा द्यावी.

कृच्छ्रांपासून होणारी फळें.

सर्व कृच्छ्रांस फलार्थत्‍वही आहे, असे ‘‘व्यास’’ सांगतो---लक्ष्मीची इच्छा करणारा, स्‍वर्गाची इच्छा करणारा, तसेंच देवतेच्या आराधना विषयी तत्‍पर असणारा यानें कृच्छ्र करावे. जो मनुष्‍य कृच्छ्र करील त्‍याची रसायणे, मंत्र व औषधे ही सघळी सफळ होतील. सर्व वेदांत सांगितलेली, जितकी काम्‍यें आहेत ती व सर्व प्रकारची दानें ही कृच्छ्र करणाराची सफळ होतात यांत संशय नाही.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP