मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ४७ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ४७ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘कामतो विप्रवधेमनुः’’ प्राणांतिकं तु यत्‍प्रोक्तं प्रायश्चित्तं मनीषिभिः। तच्च कामकृतं प्राप्यं विज्ञेयं नात्रसंशयः।
‘‘कालिकापुराणे’’ इयं विशुद्धिरुदिता प्रामाण्याकामतोद्विजं। कामतोब्राह्मणवधे जीवतोनास्‍ति निष्‍कृतिः।
‘‘कामानुवृत्तावंगिराः’’ शरीर न दहेद्यावद्ब्रम्‍हहा पापकृत्तमः। तावत्तस्‍य न शुद्धिः स्‍याद्भगवान्‌ मनुरब्रवीत्‌।
‘‘मरणेऽशक्तस्‍यापवाद उक्तस्‍तेनैव’’ स्‍यात्‍वकामकृते यत्तद्विगुणं बुद्धिपूर्वक इति ‘‘मध्यमांगिराः’’ विहितं यदकामानां कामात्तद्विगुणं भवेदिति। ‘‘क्‍वचित्तदपवादो भविष्‍ये’’ ब्राह्मणं जातिमात्रं तु कामतो विनिपात्‍य वै।
चरेद्वादश वर्षाणि गुणी निर्गुणमेव हीति ‘‘तत्रैव’’ हत्‍वा तु प्रहरंतं वै ब्राह्मणं वेदपारगं।
कामतोऽपि चरेद्वीर द्वादशाद्बाख्यमुत्तमम्‌। अकामतस्‍त्‍वर्धं

बुद्धिपूर्वक ब्राह्मणाचा वध केला तर प्रायश्चित्त. प्रहार करणार्‍या ब्राह्मणाच्या वधाचे प्रायश्चित्त.

‘‘बुद्धिपूर्वक ब्राह्मणाचा वध झाला असतां त्‍याविषयीं मनु’’---पंडितांनी जीव जाईपर्यंत जे प्रायश्चित्त सांगितले तें बुद्धिपूर्वक केलेल्‍या (वधा) विषयी जाणावें यांत संशय नाही. ‘‘कालिकापुराणांत’’ ही जी द्विजास शुद्धि सांगितली ती बुद्धीनें न केलेल्‍या विषयीं जाणावी. बुद्धिपूर्वक ब्राह्मणाचा वध केला असतां जिवंतपणी त्‍याची निष्‍कृति (प्रायश्चित्त) नाही. ‘‘बुद्धिपूर्वक (वध) केला असतां त्‍याविषयीं ‘‘मध्यमांगिरस्‌’’---ब्रह्महत्‍या करणारा जों पावेंतो आपलें शरीर जाळणार नाही, तों पावेंतो त्‍याचा पापापासून उत्‍पन्न झालेला दोष जळत नाही, म्‍हणून तोपर्यंत त्‍याची शुद्धि होणार नाही असे भगवान्‌ मनूनें सांगितले. ‘‘मरण्याविषयी समर्थ नसल्‍यास त्‍यानेंच अपवाद सांगितला आहे तो असा’’---बुद्धिपूर्वक न केलेल्‍या विषयी जें प्रायश्चित्त सांगितलें त्‍याच्या दुप्पट बुद्धीनें केलेल्‍याविषयी समजावे. ‘‘भविष्‍यांत क्‍वचित्‌ स्‍थळी त्‍याचा अपवाद आहे तो असा’’---गुणी अशा ब्राह्मणानें निर्गुण असा केवळ जातीनें ब्राह्मण असलेला त्‍याचा बुद्धिपूर्वक वध केला असतां त्‍यानें द्वादशाद्ब प्रायश्चित्त करावे. ‘‘त्‍यांतच’’ हे वीरा! वेदपारंगत असलेला ब्राह्मण जर एखाद्या ब्राह्मणास मारण्यास उद्युक्त झाला असतां त्‍यास (मारणार्‍यास) तो बुद्धिपूर्वक ठार मारील तर, त्‍यानें उत्तम असे द्वादशाद्ब प्रायश्चित्त करावे. जर बुद्धिपूर्वक न मागील तर, अर्धे (षडद्ब) प्रायश्चित्त करावे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP