मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ६३ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ६३ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ गोवधे

‘‘मनुः उपपातकसंयुक्तो गोघ्‍नोमासं यवान्पिबेत्‌। कृतवापोवसेद्गोष्‍ठे चर्मणा तेन संवृतः। चतुर्थकालमश्र्नीयादक्षारलवणं मितं।
गोमूत्रेणाचरेत्‍स्‍नानं द्वौमासौ नियतेंद्रियः। दिवानुगच्छेत्ता गास्‍तु तिष्‍ठन्नूर्ध्वं रजः पिबेत्‌। शुश्रूषित्‍वा नमस्‍कृत्‍वा रात्रौ वीरासनं वसेत्‌।
तिष्‍ठंतीष्‍वनुतिष्‍ठेत्तु व्रजंतीष्‍वप्यनुव्रजेत्‌। आसीनासु तथासीनो नियतोवीतमत्‍सरः। आतुरामभिषक्तां वा चौरव्याघ्रादिभिर्भयैः।
पतितां पंकलग्‍नां वा सर्वप्राणैर्विः मोक्षयेत्‌। उष्‍णे वर्षेऽतिशीते वा मारुते वाति वा भृशं। न कुर्वीतात्‍मनस्त्राणं गोरकृत्‍वातु शक्तितः।
आत्‍मनो यदिवान्येषां गृहे क्षेत्रेऽथवा खले। भक्षयंतीं न कथेयेत्‍पिबंतं चैव वत्‍सकं। अनेन विधिना यस्‍तु गोघ्‍नोगा अनुगच्छति।
स गोहत्त्याकृतं पापं त्रिभिर्मासैर्व्यपोहति। वृषभैकादशा गास्‍तु दद्यात्‍सुचरितव्रती।
अविद्यमाने सर्वस्‍वं वेदविभ्‍द्योनिवेदयेत्‌ इति यवान्गोमूत्रपक्वान्‌ ‘‘गोमूत्रेण यवागूं कृतामिति व्यासोक्तेः’’।
कृतवापः सशिखं कृतवपनः ‘‘सशिखं वपनं कृत्‍वेति पराशरोक्तेः’’ अत्राद्येन श्र्लोकेनैकं व्रतमुक्तं द्वितीयेनापरं अवशिष्‍टश्र्लोकैस्‍तृतीयमिति व्रतत्रयं क्रमात्‌ शूद्रक्षत्रियविप्रस्‍वामिक गोवधेषु व्यवस्‍थाप्यं। ‘‘विप्रस्‍वामिकगोवध एवानुमंत्रनुग्राहकसाक्षात्‍कर्तृषु वेति विज्ञानेश्र्वरादयः’’ ‘‘उक्तावयवत्रयमेव षाण्मासिकं व्रतमिति केचित्‌ युक्तं चेदं ‘‘एतदेव व्रतं कुर्युरुपपातकिनो द्विजा इति मनुनैकत्‍वेन परामर्शात्‌’’।
तच्च कामतोगुणवद्विप्रस्‍वामिकगोवधविषयं। ‘‘याज्ञवल्‍क्‍यः’’ पंचगव्यं पिबन्गोघ्‍नो मासमासीत संयतः।
गोष्‍ठेशयो गोनुयायी गोप्रदानेन शुध्यति। कृच्छ्रं चैवातिकृच्छ्रं च चरेद्वापि समाहितः।
दद्यात्‍त्रिरात्रं वोपोष्‍य वृषभैकादशास्‍तु गा इति एतच्च मनूक्तविषय एवाकामतो ज्ञयेम्‌

गाईच्या वधाविषयीं.

अज्ञानाने गाईचा वध केला असतां प्रायश्चित्त

‘‘मनु’’---गाईस मारणारा उपपातकानें युक्त होतो, म्‍हणून त्‍यानें प्रथम शेंडीसकट क्षौर करवावें. ‘‘कारण शेंडीसकट क्षौर करून’’ असें पराशराचें म्‍हणणें आहे. नंतर एक महिनापर्यंत यव (जव) खावे. यव खाणें ते गोमूत्रांत शिजवलेले खावे. कारण ‘‘गोमूत्रानें केलेली यवागू (कण्हेरी) (खावी)’’ असें व्यासाचें म्‍हणणें आहे. तसेंच ज्‍या गाईचा वध केला असेल तिचें चामडें पांघरून गोठ्यांत रहावे? आपली इंद्रिये वश ठेऊन नित्‍य गोमूत्रानें स्‍नान करावें, आणि क्षार व मीठ ज्‍यांत नाहीं असें परिमित अन्न दिवसाच्या चौथ्‍या भागांत खावें याप्रमाणें दोन महिनेपर्यंत करावे. २ दिवसा गाईंच्या मागें चालावें आणि उभें राहून गाईंच्या खुरांची जी धूळ उडेल ती खावी. तसेंच त्‍यांची शुश्रूषा करावी, त्‍यांस नमस्‍कार करावा आणि रात्री वीरासन घालून बसावें. गाई उभ्‍या असतां उभें रहावें, चालूं लागल्‍या असतां त्‍यांच्या मागें चालूं लागावें, बसल्‍या असतां आपण बसावें याप्रमाणें मत्‍सर सोडून नियमानें वागावें. पीडित झालेली, चोर वाघ वगैरे यांच्या भीतीने युक्त झालेली, पडलेली, किंवा चिखलांत रुतलेली अशा गाईचें आपल्‍या प्राणांच्या योगानेंही रक्षण करावे. उन्हांत, पावसांत, थंडीत, किंवा फार वारा वहात असतां त्‍यांत आपल्‍या शक्तीप्रमाणें गाईचें रक्षण न करितां आपलें रक्षण करूं नये. तसेंच आपल्‍या किंवा दुसर्‍यांच्या घरांत, शेतांत किंवा खळ्यांत गाय चरत असतां (दुसर्‍यास) सांगूं नये (यथेच्छ चरूं द्यावी तिला प्रतिबंध करूं नये). तसेचं वासरूं पीत असतां सांगूं नये. या विधीप्रमाणें जो गाय मारणारा तीन महिनेपर्यंत गाईंची सेवा करील, त्‍याचें गोहत्त्येचें पाप पाहीसें होईल. चांगल्‍या व्रताचें आचरण करणारा त्‍यानें ज्‍यांत बैल अकरावा आहे अशा दहा गाईंचें दान करावे. आपल्‍या हयातीनंतर आपली सर्व मिळकत वेद जाणणार्‍या ब्राह्मणांस द्यावी. ३ येथे एका श्र्लोकानें एक व्रत सांगितलें, दुसर्‍या श्र्लोकानं दुसरें आणि बाकी राहिलेल्‍या श्र्लोकांनीं तिसरें अशी तीन व्रतें क्रमानें शूद्र, क्षत्रिय व ब्राह्मण यांचें ज्‍यांच्यावर स्‍वामित्‍व आहे अशा गाईंच्या वधाविषयी योजावी. ‘‘ब्राह्मणाची जिच्यावर सत्ता आहे अशा गाईच्या वधाविषयींच किंवा अनुमंता, अनुग्राहक व प्रत्‍यक्ष (वध) करणारा यांच्याविषयी योजावी’’ असें विज्ञानेश्र्वरादिक म्‍हणतात. ‘‘तीन ज्‍याचे अवयव सांगितले आहेत असें हें षाण्मासिकव्रत होय’’ असें कित्‍येक म्‍हणतात ते योग्‍य आहे. कारण, ‘‘मनूनें उपपातकानें युक्त अशा द्विजांनी हेंच व्रत करावें’’ असें सांगितलें आहे. तें बुद्धिपूर्वक केलेल्‍या गुणवान्‌ ब्राह्मणाची जिच्यावर सत्ता आहे अशा गाईच्या वधाविषयी जाणावे. ‘‘याज्ञवल्‍क्‍य गाईचा ज्‍यानें वध केला आहे अशा ब्राह्मणानें प्रथम पंचगव्य पिऊन एक महिनापर्यंत आपली इंद्रियें वश ठेवून वागावें. गोठ्यांत निजावें, गाईची सेवा करावी व गाईचें दान द्यावें म्‍हणजे तो शुद्ध होईल. किंवा त्‍यानें कृच्छ्र व अतिकृच्छ्र प्रायश्चित्त करावें, अथवा तीन दिवस उपास करून ज्‍यांत अकरावा बैल आहे अशा दहा गाईंचें दान करावें’’ असें म्‍हणतो तें मनूनें सांगितलेल्‍या अज्ञानानें केलेल्‍या वधाविषयींच जाणावे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP