मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १६ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १६ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘सुमंतुः’’ तिरस्‍कृतो यदा विप्रो हत्‍वात्‍मानं मृतो यदि।
निर्गुणः सहसा क्रोधाद्रृहक्षेत्रादिकारणात्‌। त्रैवार्षिकं व्रतं कुर्यात्‍प्रतिलोमां सरस्‍वतीं।
गच्छेद्वापि विशुद्यर्थं तत्‍पापस्‍येति निश्चित्तं ‘‘बृहस्‍पतिः’’ नाततायिवधे हंता किल्‍बिषं प्राप्नुयात्‌ क्‍वचित्‌।
विनाशार्थिनमायांत घातयन्नापराध्रुयात्‌ ‘‘वसिष्‍ठः’’ अग्‍निदो गरदश्र्चैव शस्त्रपाणिर्धनापहः।
क्षेत्रदाराहरश्र्चैव षडेते ह्याततायिनः।
‘‘अपरार्के व्यासः’’ उद्यतसिं विषाग्‍नी च शापोद्यतकरं तथा।
आथर्वणेन हंतारं पिशुनं चैव राजसु। भार्यातिक्रमिणं चैव विंद्यात्‍सप्ताततायिनः।
यशोवित्तहरानन्यानाहुर्धर्मार्धहारकान्‌।
‘‘कात्‍यायनः’’ अनाक्षारितपूर्वोयस्‍त्‍वपराधे प्रवर्तते।
प्राणद्रव्यापहारे च प्रवृत्तस्‍याततायिता।
अनाक्षारितोऽनपकृतः तेन पूर्वकृतापराधस्‍य मारणाद्युद्यतस्‍य नाततायितेति तद्वधे दोष एव आततायिवधे दोषाभावश्र्च गोविप्राततायिभिन्नविषय इति ‘‘मिताक्षरापरार्कादौ’’ नाततायिवधे दोषोऽन्यत्र गोब्राह्मणादिति सुमंतूक्तेः।
‘‘कल्‍पतरौ तु’’ आततायिन्यदोषोऽन्यत्र गोब्राम्‍हणात्‌।
यदा हन्यात्‍प्रायश्चित्तं न स्‍यादिति पाठः।
अत्र युगांतरे युद्धे विप्रवधे प्रायश्चित्ताभावः।
युद्धं विना हनने तु प्रायश्चित्तं।
कलौ तु युद्धेऽपि हंनने प्रायश्चित्तं ‘‘ आततायि द्विजाग्‍्रयाणां धर्मयुद्धे न हिंसनमिति ‘‘कलिनिषेधे’’ तु पाठात्‌।
प्रपंचितं चैतत्‌ ‘‘भ्रातृचरणैः’’ कलिववर्ज्यनिर्णयेऽस्‍माभिश्र्च ‘‘व्यवहारमयूखे’’।
‘‘आततायिवधे प्रायश्चित्तं भविष्‍ये’’ हत्‍वा तु प्रहरंतं वै ब्राह्मणं वेदपारगं।
कामतश्र्चेच्चेरेद्वीर द्वादशाब्‍दाख्यमुत्तममिति

क्रोध इत्‍यादिकारणानें मूर्ख ब्राह्मणानें आत्‍महत्‍या केली तर प्रायश्चित्त. आततायीचें लक्षण ब्राह्मण व गाय आततायी असतां त्‍या विषयीं.
‘‘सुमंतु’’ -क्रोध, घर, शेत इत्‍यादिकांच्या कारणावरून मूर्ख अशा ब्राह्मणाचा अपमान केल्‍यामुळें जर तो आत्‍महत्‍या करून मेला तर, तो ज्‍याच्या योगानें मेला असेल त्‍या ज्ञात्‍या मनुष्‍यानें त्‍या पापाची शुद्धि होण्याकरितां त्रिवार्षिक व्रत करावें. अथवा सरस्‍वती नांवाच्या नदीला उलट (समाप्तीपासून उगमापर्यंत) प्रदक्षिणा करावी. ‘‘बृहस्‍पति’’- आततायीच्या वधानें मारणारास केव्हांही पाप होत नाही. तसेंच मारण्याच्या हेतूनें येणाराचा प्राण घेणारा अपराधी होत नाही. ‘‘वशिष्‍ठ’’ आग लावणारा, विष देणारा, हातांत शस्त्र बाळगणारा, द्रव्याचा अपहार करणारा, जमीन व स्त्रीयांचा अपहार करणारा हे सहा आततायी होत. ‘‘अपरार्कांत व्यास’’- तरवार उगारणारा, विष देणारा, अग्‍नि देणारा, शाप देण्याकरितां हात उचलणारा, अर्थववेदांत सांगितलेल्‍या मारणादिकर्मानें मारणारा, राजाशीं लुच्चेगिरी करणारा, व स्त्रीचे अतिक्रमण करणारा हे सात आततायी होत. कीर्ति व द्रव्य यांचा अपहार करणार्‍या दुसर्‍यांस अर्ध्या धर्माचे अपहार करणारे असें म्‍हणतात.
‘‘कात्‍यायन’’---पूर्वी ज्‍याचा अपराध केला नसून तो अपराध करण्याविषयीं प्रवृत्त झाला, तसेच जो दुसर्‍याचे प्राण व द्रव्य यांचा अपहार करण्याविषयी प्रवृत्त झाला यांस आततायित्‍व आहे. या वक्‍तव्यावरून पूर्वी अपराध करणारास मारण्याविषयी उद्युक्त झालेल्‍यास आतातायिता नाही म्‍हणून त्‍याच्या वधाविषयीं दोष आहेच. गाय व ब्राह्मण यां शिवायच्या आततायीच्या वधाविषयी दोष नाही असे ‘‘सुमंतूचें’’ म्‍हणणें आहे, त्‍यावरून आततायीच्या वधाविषयीं दोष नाहीं असें मिताक्षरा व अपरार्कादिकांत आहे. ‘‘कल्‍पतरूंत’’ तर-गाय व ब्राह्मण या शिवाय दुसर्‍या आततायीविषयी दोष नाही. म्‍हणून जर त्‍या आततायीस मारलें तर प्रायश्चित्त नाही’’ असा पाठ आहे. दुसर्‍या युगांत युद्धांत ब्राह्मणाचा वध झाला असतां प्रायश्चित्त नाही. युद्धाशिवाय वध झाला तर प्रायश्चित्त आहे. कलियुगांत तर युद्धांत जरी वध झाला तरी प्रायश्चित्त आहे. कारण, ‘‘आततायी अशी श्रेष्‍ठ द्विजांचा धर्मयुद्धांत वध करूं  नये’’ असा कलिनिषेधांत पाठ आहे. याबद्दल आमच्या बंधूंनी ‘‘कलिवर्जनिर्णयांत’’ आणि आम्‍ही ‘‘व्यवहारमयूखांत’’ चांगला विचार केला आहे. ‘‘आततायीच्या वधाविषयीं प्रायश्चित्त भविष्‍यपुराणांत’’ हे वीरा ! संपूर्ण वेद शिकलेल्‍या प्रहार करणार्‍या अशा ब्राह्मणास बुद्धिपूर्वक मारलें असतां मारणारानें उत्तम असें द्वादशाब्‍द नांवाचें प्रायश्चित्त करावे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP