मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १३१ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १३१ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘अथ संसर्गदुष्‍टे विष्‍णुः’’ मृद्वारिकुसुमादींश्र्च फलकंदेक्षुमूलकान्‌। विण्मूत्रदूषितान्प्राश्य चरेत्‍कृच्छ्रं च पादतः।
सन्निकृषेऽर्धमेवस्‍यात्‍कृच्छ्रोऽप्यशूचिभोजने सन्निकृषत्‍वं महासंसर्गः इदं चाज्ञानतः सकृद्भ्‍क्षणे रसानुपलब्‍धौ च।
ज्ञानतस्‍तु द्विगुणं अभ्‍यासेत्‍वावृत्तिः। ‘‘रसोपलब्‍धौतु कामतो व्यासः’’ संसर्गदुष्‍टं यच्चान्यत्‍क्रियादुष्‍टं च कामतः।
भुक्‍त्‍वा स्‍वभावदुष्‍टं च तप्तकृच्छ्रं समाचरेत्‌। अज्ञानतो रसोपलंभेत्‍वर्धं। ‘‘संवर्तः’’ केशकीटावपन्नं च नीलालाक्षोपघातितं।
स्‍नाय्वस्‍थिचर्मसंसृष्‍टं भुक्‍त्‍वा तूपवसेदह इति ‘‘ शातातपोऽपि’’ केशकीटावपन्नरूधिरमांसास्‍पृश्यस्‍पृष्‍टभ्रूणघ्‍नावेक्षितपतत्र्यवलीढ सूकरगवाघ्रातशुक्तपर्युषितवृथापक्वदेवान्नहविषां भोजने उपवासः पंचगव्याशनंचेति एतदुभयमापद्यकामतः

विष्‍ठा व मूत्र ह्यांच्या योगानें दुष्‍ट झालेली मृत्तिका, उदक वगैरेंचा उपयोग केला असतां प्रायश्चित्त.

‘‘संसर्गाच्या योगानें दुष्‍ट झालेल्‍या उदकादिकां विषयीं विष्‍णु’’ ---माती, पाणी, फुले वगैरे आणि फळें, कंद, ऊंस व मुळें ही विष्‍ठा व मूत्र ह्यांच्या योगानें दूषित झालीं असून जर त्‍यांचा उपयोग केला तर पादकृच्छ्र प्रायश्चित्त करावें. पूर्वोक्त पदार्थांचा अति संसर्ग केला तर अर्धें कृच्छ्र करावें. अशुद्ध असून भोजन केलें तर कृच्छ्र प्रायश्चित्त करावें. हें  प्रायश्चित्त अज्ञानानें एक वेळां भक्षण केलें असतां व त्‍या पदार्थांचें रुचीचें ज्ञान नसतां त्‍याविषयी जाणावें. बुद्धिपूर्वक केलें तर दुप्पट अभ्‍यासा विषयीं आवृत्ति करावी. ‘‘बुद्धिपूर्वक चव घेतली तर त्‍याविषयी व्यास’’ संसर्गानें दुष्‍ट झालेलें, क्रियेनें दुष्‍ट झालेलें व स्‍वभावानें दुष्‍ट झालेलें हीं बुद्धिपूर्वक खाल्‍लीं असतां तप्तकृच्छ्र करावें. अज्ञानानें च घेतली तर त्‍या विषयी अर्धें (तप्तकृच्छ्राचें). ‘‘संवर्त’’---केश व किडे पडलेलें, निळी व लाख ह्यांनीं मिश्र केलेलें व स्‍नायु, हाडें व चामडें यांचा संबंध झालेलें असें अन्नादि खाल्‍लें असतां एक दिवस उपास करावा. ‘‘शातातपही’’---केश व किडे पडलेलें, रक्त, मांस व स्‍पर्शास अयोग्‍य यांनीं स्‍पर्श केलेलें, गर्भाची हत्त्या करणारानें पाहिलेलें, पक्ष्यानें खाल्‍लेलें, डुक्‍कर व गाय यांनीं अवघ्राण केलेलें, आंबलेले, शिळें, कारणावाचून शिजवलेलें, देवाचें अन्न व होमद्रव्य यांचें भोजन केलें असतां एक दिवस उपास करावा व पंचगव्य घ्‍यावें. हीं दोन्ही प्रायश्चित्तें अज्ञानानें संकटसमयी भोजन केलें असतां त्‍याविषयीं जाणावी.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP