मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त २८ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २८ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

प्रायश्चित्ताचरणपर्यंत धर्मानाह ‘‘शंखः’’ प्रायश्चित्तमुपांसीनो वाग्‍यतस्त्रिरुपस्‍पृशेत्‌। एकवासोर्धवासोन लघ्‍वाशी स्‍थंडिलेशयः।
स्‍थानवीरासनी मौनी मौंजीदंडकमंडलुः। भैक्षचर्याग्‍निकार्य च कूष्‍मांडैर्जुहुयादघृतं। उपस्‍पर्शः स्‍नानमित्‍यपरार्के।
दिवास्‍थिती रात्रौ चोपवेशनं वीरासनमिति ‘विज्ञानेश्र्वरः’ कुड्याद्यनाश्रयेणाहारोत्रमुपवेशनमेवेति ‘‘शूलपाणिः’’ ‘कूष्‍मांडैर्यद्देवादेवहेडनमित्‍याद्यैः’ ‘‘मनुः’’ स्‍थानासनाभ्‍यां विहरेदशक्तोऽधःशयीत वा।
‘‘वसिष्‍ठः’’ महाव्याहृतिभिर्होमः सावित्र्या वान्वहं स्‍वयं। कर्तव्यः पावनः सम्‍यक्‌ सर्पिषा च तिलैस्‍तथा।
द्रव्याणां व्याहृतिगायत्र्योश्र्च विकल्‍प इत्‍यपरार्के। ‘‘तत्रैवपुराणे’’ आपोहिष्‍ठेति सूक्तं तु शुद्धवत्‍यो घमर्षणं।
शंवत्‍यः स्‍वस्‍तिमत्‍यश्र्च पावमानोऽघमर्षणं। सर्वत्रैव प्रयुंजीत कृच्छ्रादिव्रतमाचरन्‌। ‘‘वैशंपायनः’’ ॠषभं विरजं चैव शुद्धवत्‍योघमर्षणं।
गायत्रीं वा जपेद्देवी पवित्रांवेदमातरं। शतमष्‍टशतं वापि सहस्रमथवा परं।
‘‘स एव’’ स्‍नात्‍वोपतिष्‍ठेदादित्‍यं सौरिभिस्‍तु कृतांजलिः ‘‘गौतमः’’ रौरवयोधां जपे नित्‍यं प्रयुंजीत। रौरवयोधा साम।
‘‘षट्‌त्रिंशन्मते’’ जपहोमादि यत्‍किंचित्‌ कृच्छ्रोक्तं संभवेन्नचेत्‌।
सर्वं व्याहृतिभिः कुर्याद्गायत्र्या प्रणवेन वा ‘‘हारीतः’’ सूर्याय देवताभ्‍यो वै निवेद्य व्रतमाचरेत्‌ इति।
निवेदनमग्‍ने व्रतपतं व्रत मित्‍यादि मंत्रेणत्‍यपरार्के’’ ‘‘पराशरः’’ प्रायश्चि तेषु सर्वेषु कुर्याद्बाम्‍हणभोजनं।
भक्त्‍या वित्तानुसारेण प्रायश्चित्तानुरूपतः। आसहस्रादाशताद्वा दशांत मथवा जपेत्‌। ॐकाराद्यं तथान्यद्वा गायत्रीमथवायुतं।
अशक्तौ प्रायश्चित्त मन्यद्वारापि कार्यमिति ‘‘प्रायश्चित्तविवेके ब्राह्मे’’ रोगी वृद्धस्‍तु पौगंडः कुर्यादन्यैर्व्रतं सदेति कुर्यात्‍कारयेत्‌।
‘‘पराशरः’’ व्याधिव्यसनिनिश्रांते दुर्भिक्षे डामरे तथा। उपवासोव्रतं होमो द्विजसंपादितानि वै। शुद्धिकराणीति शेषः डामरं परचक्रादि।
व्रतांते कर्तव्यतामाह ‘‘पराशरः’’ पराशरः’’ पंचगव्यं पिबेच्छूद्रो ब्रह्मकूर्चं पिबेद्दिजः। एकद्वित्रिचतुर्गावोदद्याद्विप्राद्यनुक्रमात।
ब्रह्मकूर्चप्रकारोवक्ष्यते। शिष्‍टास्‍तु पूर्वमेव ब्रह्मकूर्चं कुर्वंति ‘‘यमः’’ प्रायश्चित्ते व्यवसिते कर्ता यदि विपद्यते।
शुद्धस्‍तदहरेवासाविहलोके परत्रवेति ‘‘अंगिरा अपि’’-योयदर्थं चरेद्धर्ममप्राप्य म्रियते व्रतं। स तत्‍पुण्यफलं प्रेत्‍य प्राप्नुयान्मनुरब्रवीत्‌।
‘‘छागलेवः’’ पूर्व व्रतं गृहीत्‍वा तु नाचरेत्‍काममोहितः। जीवन्‌ भवति चंडालोमृतः श्र्वा चाभिजायते।
‘‘वायवीये’’ लोभान्मोहात्‍प्रमादाद्वा व्रतभंगोभवेद्यदि। उपवासत्रयं कुर्यात्‍कुर्याद्वा केशमुंडनं।
प्रायश्चित्तमिदं कृत्‍वा पुनरेव व्रती भवेत्‌ वा शब्‍दः समुच्चये

प्रायश्चित्त चालूं असतां करावयाचें नियम.
‘‘शंख’----प्रायश्चित्त करणारानें मौन धारण करून तीनदां आचमन करावे. ‘‘तीनदां स्‍नान करावे’’ असें ‘‘अपरार्कांत’’ आहे. एक वस्त्र किंवा अर्धें वस्त्र नेसावे. एका जागेवर वीरासन घालून असावे. दिवसां उभे रहाणें व रात्रीं बसणें हें वीरासन होय असें ‘‘विज्ञानेश्र्वर’’ म्‍हणतो. भिंत वगैरेचा आश्रय न करितां अहोरात्र बसून रहाणें हेच विरासन असे ‘‘शूलपाणि’’ म्‍हणतो. मौन धारण करावे, मौंजी, दंड व कमंडलु धारण करावे, भिक्षा मागून अग्‍निकार्य करावें. व ‘‘य द्देवा देव हेडनं’’ इत्‍यादि कूष्‍मांड मंत्रांनीं तुपाचा होम करावा.
‘‘मनु’’ -स्‍थान (जागा) व आसन यांवर उभे रहावे, किंवा अशक्त असेल त्‍यानें जमिनीवर निजावे. ‘‘वसिष्‍ठ’’  -प्रायश्चित्त करणारानें नित्‍य व्याहृति व गायत्रीमंत्र यांच्या योगानें तूप व तीळ या द्रव्यांचा पवित्र असा होम करावा. द्रव्यांचा, व्याहृति व गायत्रीमंत्र यांचा विकल्‍प आहे असें ‘‘अपरार्कांत’’ आहे. ‘‘त्‍यांतच पुराणांतील’’ कृच्छ्रादि व्रतें करणारानें ‘‘आपोहिष्‍ठा’८ हें सूक्त, ‘‘शुद्धवत्‍यः’’ हे अधमर्षण, ‘‘शंवति’’ ‘‘स्‍वस्‍तिमती’’ पावमानी’’ या ॠचा व अघमर्षण यांचा सर्व ठिकाणी उपयोग करावा. ‘‘वैशंपायन’’- ‘‘ॠषभ’’ ‘‘विरज’’ ‘‘शुद्धवती’८ व ‘‘अघमर्षण’’ यांचा जप करावा, किंवा वेदाची माता पवित्र अशा गायत्रीचा शंभर एकशे आठ किंवा हजार जप करावा. ‘‘तोच’’ -स्‍नान केल्‍यानंतर हात जोडून सौर मंत्रांनी सूर्याची प्रार्थना करावी. ‘‘गौतम’’ -रौरवयोधा या सामाचा (साम मंत्राचा) जपांत नित्‍य उपयोग करावा. ‘‘षट्‌त्रिंशन्मतांत’’ जप होम वगैरे जें कांहीं कृच्छ्रांत सांगितलें असेल तें जर होत नसेल तर तें सर्व व्याहृतीनीं किंवा गायत्रीनें किंबा प्रणवानें करावे. ‘‘हारीत’’-सूर्य व देवता यांस निवेदन करून मग व्रत करावे. निवेदन करणें ते ‘‘अग्‍ने व्रतपते व्रतं’’ इत्‍यादि मंत्रानें करावें असें ‘‘अपरार्कांत’’ आहे. ‘‘पराशर’’- सर्व प्रायश्चित्तांत शक्ति, द्रव्य व प्रायश्चि त यांच्या प्रमाणा प्रमाणें ब्राह्मणभोजन करावे. तसेंच ओंकार वगैरे, किंवा दुसरें किंवा गायत्रीमंत्र याचा, हजार, शंभर, दहा किंवा दहा हजार पावेंतो जप करावा. ‘‘प्रायश्चित्तविवेकांत ब्रह्मपुराणांत’’ ‘‘प्रायश्चित्त करण्यास शक्ति नसल्‍यास दुसर्‍याकडून देखील प्रायश्चित्त करवावे. असें सांगितलें आहे तें असे’’ रोगी, म्‍हातारा व पौगंड यांनी नेहमी दुसर्‍याकडून व्रत करवावे. ‘‘पराशर’’ -व्याधिष्‍ठ, व्यसनी (संकटांत पडलेला), व थकलेला यांची उपास, व्रत व होम हीं कर्में ब्राह्मणांनी केली असतां शुद्ध होतात. तसेच दुष्‍काळ व परचक्र यांतही ब्राह्मणांकडून केलेलीं कर्मे शुद्ध होतात.

व्रताच्या शेवठीं करावयाचें कृत्‍य.
कृच्छ्रादि व्रतांच्या शेवटी करावयाचे कृत्‍य.
‘‘पराशर’’---शूद्रानें (कृच्छ्रादि) व्रतांच्या शेवटी पंचगव्य घ्‍यावे. द्विजानें ब्रह्मकूर्च प्यावें, नंतर ब्राह्मणादिकांनी क्रमानें एक, दोन तीन व चार गाई द्याव्या. ब्रह्मकूर्चाचा प्रकार सांगण्यांत येईल. शिष्‍टतर पूर्वीच ब्रह्मकूर्च करतात. ‘‘यम’’ - जर कर्ता प्रायश्चित्त करीत असतां मरेल तर तो त्‍याच दिवशी या लोकी व परलोकीं शुद्ध होतो. ‘‘अंगिरस्‌’’ - जो ज्‍या व्रताच्या उद्देशानें त्‍या व्रतांत सांगितलेल्‍या धर्मचें आचरण करीत असतां ते व्रत पूर्ण न होतां मरेल, तर त्‍याला परलोकी त्‍या व्रताच्या पुण्याचें फळ मिळेल असे ‘‘मनूनें’’ म्‍हटलें आहे. ‘‘छागलेय’’-जो पूर्वीं व्रताचें ग्रहण करून काम मोहित होत्‍साता पुढें व्रताचें आचरण करणार नाहीं, तो वाचेल तोपर्यंत चांडाल होतो, व मेल्‍यानंतर कुत्र्याच्या योनीला जातो. ‘‘वायुपुराणांत’’ जर लोभानें, अज्ञानानें किंवा विस्‍मरणानें व्रताचा भंग होईल तर तीन उपास करावे व क्षौर करावे. याप्रमाणें प्रायश्चित्त करून पुन्हा व्रत धारण करावे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP