प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ९५ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘यत्तु पंचमहापापिन उक्त्वा आपस्तंबः’’ चतुर्थकालमित भोजनोयोऽभ्युपेयात्सवनानुकल्प स्थानासनाभ्यां विहरन् त्रिभिर्वर्षैः पापमपनुदतीति। ‘‘यच्चयमः’’ बृहस्पतिसवेनेष्ट्वा सुरापो ब्राह्मणः पुनः। समत्वं ब्राह्मणैर्गच्छेदित्येषा वैदिकी श्रुतिः।
भूमिप्रदानं यः कुर्यात्सुरां पीत्वा द्विजोत्तमः। पुनर्न च पिबेत्तां तु संस्कृतः सविशुध्यतीति। तानि याज्ञवल्कीयत्रैवार्षिकसमानविषयाणीति विज्ञानेश्र्वरः
आपस्तंब व यम यांच्या वचनांची व्यवस्था विज्ञानेश्र्वर करतो.
‘‘ जें तर पाच महापातकी सांगून आपस्तंब’’ ‘‘(दिवसाच्या) चवथ्या काळीं परिमित ज्याचें भोजन आहे असा जो (मनुष्य) स्थान व आसन यांच्या योगानें काळाला अनुसरून वागेल व पायानें चालेल तो तीन वर्षांनीं पाप नाहींसें करील’’ असें म्हणतो, आणि ‘‘जे यम’’ ‘‘सुरापान करणारा ब्राम्हण बृहस्पतीच्या यज्ञानें पुन्हा ब्राम्हणाशीं समत्व पावतो अशी वेदांतील श्रुति आहे. जो द्विजश्रेष्ठ सुरा पिऊन भूमिदान करील, आणि पुन्हा सुरा पिणार नाहीं त्यांचें संस्कार केलें तर तो शुद्ध होईल’’ असें म्हणतो. तीं (वचनें) याज्ञवल्क्यानें सांगितलेल्या त्रैवार्षिका सारखीं (जाणावी) असें विज्ञानेश्र्वर म्हणतो.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP