मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश प्रासंगिक कविता - प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ प्रतापगडीं नवस फेडण्याकरितां गेले, तेव्हां समर्थांनीं केलेलें Translation - भाषांतर प्रपंचीं आमचे कूळीं तुळजा कुळदेवता । नेणत्या ऐकिलें होतें जाणतां स्मरलें मनी ॥१॥श्रेष्ठांची कामना होती पुर्विली मनकमना । नवस जो नवसिला होता त्यापासूनच चूकला ॥२॥पुत्र जो घेतला त्याचा जोगी करूनि सोडिला । ख्याति ते ऐकिली मोठी न्यायनीति चुकेचना ॥३॥वैराग्य घेतलें पूर्ण सर्व संसार सोडिला । तूझिया दर्शना आलों कृपादृष्टि विलोकिजे ॥४॥तुझिया कृपें वांचलों आहे महंत म्हणती तया । तुझेंचि सर्व हें देणें सर्वही तुजपासुनी ॥५॥संसारीं मोकळें केलें आनंदीं ठाव दीधला । सांडिली सर्व ही चिंता माता तूं सत्य जाहलें ॥६॥पूर्वील काय मी सांगूं इच्छा पूर्ण परोपरी । मागील आठवेनासें केलें आश्चर्य वाटतें मनीं ॥७॥सदानंदीं उदय झाला सुखसंतोष पावलों । मत्परधीनता गेली सत्ता ऊदंड चालली ॥८॥उदंड ऐकिले होतें रामासी वर दीधला । दास मी रघु-नाथाचा मजही वरदायिनी ॥९॥श्रेष्ठांचा नवस जो होता फेडिला तोचि मी म्हणे । पुष्प देऊनी उतराई ऐसें हें कल्पिलें मनीं ॥१०॥तुळजापुर टाकोन चालली पश्चिमेकडे । पारघाटीं जगन्माता सध्यां येऊन राहिली ॥११॥ऐसें हें ऐकिलें होतें हेत एथेंचि पावला । पुष्पाची कल्पना होती पुष्प तेथेंचि वाहिलें ॥१२॥ऐशी दयाळु तूं माता त्वां हें पुष्पचि घेतलें । संतुष्ट भक्तिभावाने त्रैलोक्यजननी पहा ॥१३॥थोडयानें श्लाघ्यता मोठी थोर संतोष पावलों । तुझेंचि तुजला दिल्हें आणिलें सांग कोठुनी ॥१४॥रक्षिता देवदेवांचा त्याचा उत्साह इच्छिला । संकष्टें वारिलीं नाना रक्षिला बहुतांपरी ॥१५॥जीवींचें जाणती माता तूं माता मज रोकडी । लोकांची चुकती माता अचूक जननी मला ॥१६॥एकचि मागणें आतां द्यावें तें मजकारणें । तुझाचि वाढवी राजा शीघ्र आम्हाचि देखतां ॥१७॥दुष्ट संहारिले मागें ऐसें ऊदंड ऐकिलें । परंतु रोकडीं कांहीं मूळ सामर्थ्य दाखवी ॥१८॥देवांचीं राहिलीं सत्त्वें सत्त्व तूं पाहसी किती । भक्तांसी वाढवी वेगीं इच्छा पूर्णचि ते करी ॥१९॥रामदास म्हणे माझें सर्व आतुर बोलणें । क्षमावें तुळजे माते इच्छा पूर्ण परोपरी ॥२०॥ N/A References : N/A Last Updated : April 01, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP