मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| समास १ प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश सेवकधर्म - समास १ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ समास १ Translation - भाषांतर ऐका प्रपंचविचार । आपली करनी उतरे पार । येथें नाहीं उत्तर । श्रेष्ठाकडे ॥१॥पूर्वी दरिद्रें पीडिले । ते समर्थ अंगीकारिले । शिकवूनि शिकवूनि शहाणे केले । नाना प्रकारें ॥२॥पहिला होता नाचार । श्रेष्ठीं वाढवोनि केला थोर । या वचनीं अनादर । होतां बरवें नव्हे ॥३॥जो आपुलें हित न करी । तो आपुला आपण वैरी । येथें कांहीं कोणावरी । शब्द नाही ॥४॥श्रेष्ठांचे मनोगत राखेना । बळेंच करी बल्गना । युक्ति प्रयुक्ति नाना । प्रकारें करी ॥५॥श्रेष्ठांचे केलें मोडावें । आपुलेंचि पुढें प्रतिष्ठावें । तरी मग लागे भ्रष्टावें । वैभवापासूनि ॥६॥पुढें पुढें काम करी । मागें कांहींच न करी । कार्यातें नसतां उरी । कांहींच पुढें ॥७॥उगाच गर्वै मेला । मागील दिवस विसरला । स्वार्थचि करूं लागला । म्हणजे गेलें ॥८॥वडिलंसि बुद्धि शिकवी । युक्तिबळें जाणीव दावी । तया मूर्खासि पदवी । प्राप्त कैंची ॥९॥जो सदांचा चोरटा । जो सदांचा कळकटा । कठीण शब्दें बारा वाटा । मनुष्यें केलीं ॥१०॥आपला इतबार राखावा । मग तो सर्व धणी जाणावा । उदंड वैभवाचा हेवा । करूं नये ॥११॥कार्य करितां कांहीं न मागे । तयाची चिंता प्रभूस लागे । ऐसें जाणूनि विवेक जागे । म्हणिजे बरें ॥१२॥आपणास जपू लागला । श्रेष्ठांचे मनींचा उतरला । येणें कोण स्वार्थ जाला । विचारावा ॥१३॥स्वामींनीं जें जें बोलावें । तेंचि सेवकी प्रतिष्ठावें । वेळ चुकवूनि बोलावें । विनीत होऊनि ॥१४॥श्रेष्ठापुढें शहाणपण । हेंचि केवळ मूर्खपण । मूर्खपणें नागवण । आली घरा ॥१५॥कळेल तरी सांगूं नये । वडि-लांची बुद्धि शिकवूं नये । नेणपणेचि उपाय । विवेकीं करावा ॥१६॥पुढें पुढें निघूं नये । आज्ञेवेगळें वर्तूं नये । न मानितां अपाय । नेमस्त आहे ॥१७॥आधीं वडिलांसी पुसावें । किंवा आपणचि करावें । समय पाहू नि वर्तावें । विवेकी पुरुषें ॥१८॥आधीं निश्चय करितो । मग उगोचिं पुसतो । इतका विचार करी तो । शहाणा कैंचा ॥१९॥मी करितों ऐसें पुसणें । तें पुसणें न पुसणें । करूं न करूं हे विचारणें । हे उत्तमोत्तम ॥२०॥मी शहाणा ऐसें कळलें । तरी स्वतंत्र पाहिजे केलें । स्वतंत्र होतां मिरवले । न शहाणपण ॥२१॥हें मनींचे मनीं समजावें । प्रकट कासया करावें । घेऊं ये तरी ध्यावें । चातुर्यासी ॥२२॥न्याय मानील तो न्यायी । न्याय न मानील तो अन्यायी । दगलबाज चिडाई । सुटेल कैसी ॥२३॥ज्याचे अंतरीं स्वार्थबुद्धि । तेथें कैंची असेल शुद्धि । शुद्धि सांडितां अवधि । दु:खासी होय ॥२४॥ज्याकरितां प्राणी वाढले । त्यासीच आडवूम लागले । ते कैसे म्हणावे भले । नीतिवंत ॥२५॥सेवकीं सेवाचि करावी । स्वामी आसूदकीं द्यावी । तरीच पाविजे पदवी । कांहींएक ॥२६॥समर्थांचें मनोगत । तसैसेंचि वर्तणें उचित । तेथें चुकतां आघात । नेमस्त आहे ॥२७॥सेवक तोचि अडेना । शब्द भूईस पडेना । काम चुकलें हें घडेना । कदाकाळीं ॥३८॥उंच अश्व वेळेस अडे । तरी पादच्छेद करणें घडे । ऐसें कळोनियां वेडे । अडोचि लागे ॥२९॥मनोगत राखतां श्रेष्ठ वोळे । मनोगत चुकतां खवळे । ऐसें जयासी न कळे । तो जाणता कैसा ॥३०॥स्वामीस जें अवश्य व्हावें । तैसें सेवकें न व्हावें । होऊनि आडवावें । कोण्या विचारें ॥३१॥आपस्वार्थ उदंड करणें । आणि स्वामिकार्य बुडविणें । ऐसीं नव्हेत की लक्षणें । सेवकाचीं ॥३२॥सेवकपणाचें मुख्य वर्म । कांहीं नसावें कृत्रिम । कृत्रिम केलिया संभ्रम । कैंचा पुढें ॥३३॥धनिकाजी जितुका सावधान । सर्वकाळ परिछिन्न । त्यासी चोरितां निदान । बरें नव्हे ॥३४॥थोडी बहुत लालूच करणें । आणि महत्कृत्य बुडविणें । महत्त्व जातां लजिरवाणें । जनामध्यें ॥३५॥ऐसे बहुत ऐकिलें । कांहीं दृष्टीस देखिलें । देखत ऐकत चुकलें । तें मनुष्य कैसें ॥३६॥कार्य करिताम उदंड देतो । चुकतां तो महत्त्व घेतो । ऐसें कळोनि वर्ते तो । प्राणी कैसा ॥३७॥सेवक विश्वास दाविती । वैरियाकडे मिळोनि जाती । या चांडाळांसी गति । कोठेंचि नाहीं ॥३८॥सकळ लोक स्वामियाचे । मागें पुढें अवज्ञेचे । सेवक उगेचि मूर्ख नाचे । शब्द बोले ॥३९॥धूर्तपणें अंतरसाक्षी । नानाप्रकारें परीक्षी । दूरी गेला परी लक्षी । सर्व कांहीं ॥४०॥म्हणोनि ऐसें न करावें । करणें तें नेमस्त करावें । नानाकारणें धरावें । अंतर प्रभूचें ॥४१॥इति श्रीसेवकधर्मनिरू-पणं नाम प्रथम समास समाप्त ॥१॥ N/A References : N/A Last Updated : April 01, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP