मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| प्रासंगिक कविता -बाग प्रकरण प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ परळींस मठस्थापनेचे वेळीं सांगितलेलें Translation - भाषांतर प्रसंग निघाला स्वभावें । बागेमध्यें काय लावावें । म्हणूनि घेतलीं नांवें । कांहीं एक ॥१॥कांटी रामकांटी फुलेंकांटी । नेपती सहमुळी कारमाटी । सावी चिलारी सागरगोटी । हिवर खरै खरमाटी ॥२॥पांढरफळी करवंदी तरटी । आळवी तोरणी चिंचोरटी । सिकेकाई वाकेरी घोंटी । करंज विळस समुद्रशोक ॥३॥अव्हाटी बोराटी हिंगणबेटी । विकळी टांकळी वाघांटी । शरे निवडुंग कारवेटी । कांटेशेवरी पामगेरे ॥४॥निरगुडी येरंड शेवटी । कासवेद कासळी पेसरी । तरवड उन्हाळ्या कुसरी । शिबी तिव्हा अंबोटी ॥५॥कां तुती काचकुहिरी सराटी । उतरणी गुळवेल चित्रकुटी । कडीची काटली गोमाटी । घोळ घुगरी विरबोटी ॥६॥भोंस बरू वाळा मोळा । ऊंस कास देवनळा । लव्हे पानि पारोस पिंपळा । गुंज कोळसरे देवपाळा ॥७॥वेत कळकी चिवारी । ताड माड पायरी पिंपरी । उंबरी अंबरी गंभिरी । अडुळसा मोही भोपळी ॥८॥साव विसवें सिरस कुड । कोळ कुंभा धावडा मोड । काळकुडा भुता बोकड । कुरडी हिरंडी लोखंडी ॥९॥विहाळ गिळी टेंभुरणी । अविट एणके सोरकीन्ही । घोळी दालचिनी । कबाबचिनी जे ॥१०॥निंबारे गोडे निंब । नाना महावृक्ष तळंब । गोरक्षचिंच लातंब । परोपरीचा ॥११॥गोधनी शेलवंटी भोकरी । मोहे बिब्बा रायबोरी । बेल फणस जांब भरी । चिंच अमसोल अंबोड ॥१२॥चांफे चंदन रातांजन । पतंग मलागार कांचन । पोपये खेलेले खपान । वट पिंपळ उंबर ॥१३॥आंबे निंबें साखर -निंबें । रेकण्या खरजूरी तुतें दाळिंबे । तुरडे विडे नारिंगें । शेवे कविट अंजीर सीताफळें ॥१४॥जांब अननस देवदार । सुरमे खासे मंदार । पांढरे जंगली लाल पुर्रे । उद्वे चित्रकी ॥१५॥केळीं नारळी पोफळी । आंवळी रायआंवळी जांभळी । कुणकी गगुळी सालफळी । बेलफळी महाळुंगी ॥१६॥भुईचाफे नागचाफे मोगरे । पारिजातक बटमांगरे । शंखासुर काळे मोगरे । सोनतरवड सोनफुलें ॥१७॥जाई सखजाई पीतजाई । त्रिविध शेवती मालती जुई । पातळी बकुली अबई । नेवाळी शेतकी चमेली ॥१८॥सूर्यकमळिणी चंद्र-कमळिणी । जास्वनी हनुमंतजास्वनी । केंशर कुसुंबी कमळिणी । बहुरगं नीळ थाति ॥१९॥तुळसी काळा त्रिसेंदरी । त्रिसंगी रायचंचु रायपेटारी । गुलखत निगुलचिन कनेरी । नानाविध मखमाली ॥२०॥काळा वाळा मरवा नाना । कचोरे गवले दवणा । पां च राजगिरे नाना । हळदी करडी गुलटोप ॥२१॥वांगीं चाकवत मेथी पोकळा । माठ शेपू खोळ बसळा । चवळी चुका वेला सबळा । अंबु जिरे मोहरी ॥२२॥कांदे मोळकांदे माईनमुळे । लसूण आलें रताळें । कांचन कारिजें माठमुळें । सुरण गाजरें ॥२३॥भोपळे नानाप्रकारचे । लहान थोर पत्र वेलीचे । गळ्याचे पेढया सांगडीचे । वक्त वर्तुळ लंबायमान ॥२४॥गंगाफळे काशी-फळें क्षीरसागर । सुगरवे सिंगाडे देवडांगर । दुधे गंगारुढे प्रकार । किनर्या रुद्रविण्याचे ॥२५॥वाळक्या कांकडया चिवडया । कोहाळे सेंदण्या सेदाडया । खरबुजा तरबुजा कलंगडचा । द्राक्षी मिरवेली पानवेली ॥२६॥दोडक्या पारोशा पडवळ्या । चवळ्या कारल्या तोंडल्या । घेवडया कुहिर्या खरसमळ्या । वेली अळु चमकोरे ॥२७॥अठराभार वनस्पती । नामें सांगवीं किती । अल्प बोलिलों श्रोतीं । क्षमा केली पाहिजे ॥२८॥ N/A References : N/A Last Updated : April 01, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP