मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| समास २ प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश सेवकधर्म - समास २ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ समास २ Translation - भाषांतर सुचित करूनि अंत:करण । आतां करावें राज्यकारण । प्रमाण आणि अप्रमाण । समजलें पाहिजे ॥१॥अकल म्हणजे कल नाहीं । अन्यायाचा साभिमान नाहीं । न्याय नीति समर्थ पाही । आप्त आणि परावे ॥२॥किती चुकती चाचू घेती । पदरीं घालितां न घेती । अभ्यास करूनि म्हणती । अभ्यास नाहीं ॥३॥उदड हासती दुसर्यासी । तेचि गुण आपल्यापाशी । अखंड वर्णिती आपल्यासी । समर्थादेखतां ॥४॥मागील दिवस विसरती । उगेच तालदारी आणिती । अखंड चुकती लालुती लालुवी करिती । परम अन्यायी ॥५॥आपणा-वेगळें कार्य न व्हावें । अवघें आपणचि असावें । आपल केलें न मोडावें । ऐशी वासना ॥६॥व्याप आटोप करावा । समर्थ वेळेस आडवावा । आपुला हेका वाढवावा । अत्यादरें ॥७॥स्वयें आपणासी कळेना । समर्थे सांगितलें ऐकोना । सत्य असलें तरी सातेना । अभिमानें ॥८॥वैरीयाकडे सख्य लावी । समर्थांचे काम बुडवी । व्यर्थ लालूच उठाठेवी । उदंड करी ॥९॥इष्ट मित्र शरीरसंबंधी । व्यापकपणें सूत्रें साधी । वैरी वरी हिताळू कुबुद्धि । अंतरी वसे ॥१०॥आज्ञेप्रमाणें असतां । बहुत दु:ख वाटे चिंत्ता । आपले इच्छेनें वर्ततां । बरें वाटे ॥११॥आपले अवगुण लपवी । श्रेष्ठांपुढें जाणीव दावी । धीटपणेंचि दटावी । कोणी एकासी ॥१२॥जें समर्थासी पाहिजे । तें आपणासि न पाहिजे । आपणासी मानले तें कीजे । कांहीं एक ॥१३॥काम सांगतांचि अडे । मीस करूनि वेळेची दडे । कुकमीं आदरें पवाडे । नाना यत्नें ॥१४॥समर्था अडानी ताल केला । गर्वे लेखीना कोणाला । काम नासूनि उडाला । एकीकडे ॥१५॥जें पाहिजे समर्थासी । त्यासी करण वरकनी । त्याची गोष्टी हरी कमी । हळु पाडी ॥१६॥आपुले ठायीं वोठाणी आणिती । श्रेष्ठांसि मागें तुच्छ करिती । कठीण वेळेसि मिळोनि जाती । सूत्रकडे ॥१७॥समर्थासी बळेंचि करणें । मर्यादा सांडूनि चालणें । मनाऐसें न होतां करणें । अप्रमाद ॥१८॥मज वेगळें काम न चाले । ऐसें मागें पुढें बोले । कित्येक लोकचि फोडिले । ते आपणाकडे ॥१९॥समर्थासि कांहीं कळेना । मी सामगतों ऐकेना । शहाणपण दाखवी जना । नाना प्रकार ॥२०॥श्रेष्ठ समजोनि न पाहे । मजवेगळें कोण आहे । निकामी मिळवूनी काय हे । गळंगळा अवघा ॥२१॥अवघें ढाळ भाग्यें चालतें । येरवीं मुख्यास काय कळतें । आम्हां लोकांकरितां बळ तें । सकळ कांही ॥२२॥आम्हांप्रमाणें काय जाणे । प्रभु होय परी काहीं नेणे । आम्हांवेगळें कोण शहाणे । आहे एथें ॥२३॥पोटासाठीं सेवा करणें । उगेचि फुगती रिकामें । थोरपण दिधलें कोणें । सेवकांसी ॥२४॥ऐसे प्रकारींचे लोक । त्यांस कैसा असेल विवेक । मूर्खपणें अविवेक । रक्षिती बळें ॥२५॥समर्थासि सांडून सेवकजन । सेवकाकडे लविती मन । ते जाणावे परमहीन । नीच काटीचे ॥२६॥ऐसें नेणतां चुक पडती । जाणते अवघेचि जाणती । निकामी आणि गर्व करिती । मूर्खपणें ॥२७॥सेवकजनावरी विश्वासिला । तो सेवकीं जेर केला । समर्थ पराधीन झाला । हेंही अपूर्व ॥२८॥कामाकारणें ठेविले । काम पाहूनी वाढविले । तेही उगेव गर्वें फुगले । कोण्या हिशोबें ॥२९॥याकारणें बदलीत जाणें । सेवक आज्ञेच्या गुणें । तरीच समर्थपण जाणे । समर्थांसी ॥३०॥काम नासलें तरी नासावें । परी सेवकाधीन न व्हावें । दास म्हणे स्वभावें । बोलिलों न्याय ॥३१॥न्याय अन्यायासी मानेना । विवेक अविवेक्या कळेना । पुण्यमार्ग आवडेना । पापी जनासी ॥३२॥सेवक बहुतांसी असती । परी पाहों नये हे प्रचीति । तया पि हे क्षमा श्रोतीं । केली पाहिजे ॥३३॥इति श्रीसेवकधर्मनिरूपण नाम द्बितीय समास समाप्त ॥२॥ N/A References : N/A Last Updated : April 01, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP