मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| डफगाणें प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश प्रासंगिक कविता - डफगाणें समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ समर्थ आले त्या वेळीं समर्थांनीं डफगाणें करून त्यांस निरुत्तर केलें तो प्रकार Translation - भाषांतर किती पृथ्वीचें वजन । किती अंगोळ्या गगन । सांग सिंधूचें जीवन । किती टांक ॥१॥किती आकाशींचा वारा । किती पर्जन्याच्या धारा । तृण भूमीवरी चतुरा । संख्या सांग ॥२॥वायुसरसें उडती । सांग अणुरेणू किती । लक्षचौर्याशींची उत्पत्ती । संख्या सांग ॥३॥अठराभार वनस्पती । भूमंडळीं पाणी किती । पुष्पें फळें जाती किती । संख्या सांग ॥४॥बीज वडीं आणि पिंपळीं । किती आहे भूमंडळीं । सर्व धान्याची मोकळी । संख्या सांग ॥५॥सर्व सरितांची वाळू किती । सिंधुसागरीं वाळू किती । हरखू आहे किती । संख्या सांग ॥६॥सांग माझें डफगाणें । कीं डफ ठेवीं शहाणपणें । देहबुद्धीचें लक्षण । सोडवीन ॥७॥ऐक जें जें पुशिलें तुज । तें तें आतां सांगें मज । अनंत ब्रह्मांडें बेरीज । किती जाहली ॥८॥राम-दासाचा विनोद । सांडी अहंतेचें बीज । मग स्वरूपीं आनंद । सुखी राहे ॥९॥ N/A References : N/A Last Updated : April 01, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP