हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
राशींचे आय-व्यय.

राशींचे आय-व्यय.

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


राशींचे आय आणि व्यय हे पंचांगांतून दिलेले असतात . आय म्हणजे लाभ आणि व्यय म्हणजे खर्च . कोणत्या राशीला किती लाभ आणि किती खर्च त्या संवत्सरांत होईल , हें सांगितलेलें असतें . त्यावरून आपल्याला जन्मराशीनुसार वर्ष कसें जाईल ह्याचें अनुमान ज्याचें त्याला काढतां येतें . आय - व्यय काढण्याकरितां प्रथम सूर्या - दि ग्रहांच्या दशांची वर्षसंख्या समजली पाहिजे म्हणून त्याविषयीं संक्षपतः लिहितों . दोन प्रकाराच्या दशांवरून म्हणजे अष्टोत्तरी म्हणजे १०८ व विंशोत्तरी म्हणजे १२० वर्षसंख्या जाणावी . ही वर्षसंख्या सर्व ग्रहांमध्यें विभागली गेली आहे , ती अशी :---

अष्टोत्तरी दशेचीं वर्षें .

रवौ रसा विधौ तिथ्यो भौमेऽष्टात्यप्टयो बुधे ।

गुरौ एकोनविंशत्या शुक्रे वषैंकविंशति : ।

शनौ च दशवर्षाणि राहौ च द्वादशाब्दकम् ॥१७७॥

विंशोत्तरी दशेचीं वर्षें

पट् सूर्यो दशकश्चंद्र : सप्तसंख्यो धरासुतः ।

राहुरप्टादशश्वैव जीवे पोडश वत्सरा : ।

एकोनविंशतिः सौरिर्वुघे सप्तदश स्मृता : ।

केतोश्च सप्तवर्पाणि शुक्र विंशतिवत्सरा : ॥१७८॥

 

र .

चं .

मं .

बु .

गु .

शु .

श .

रा .

के .

वर्षे

अष्टो०

१५

१७

१९

२१

१०

१२

= १०८

विंशो०

१०

१७

१६

२०

१९

१८

= १२०

राशींचे आय - व्यय काढण्याकरितां रा शींचे स्वामी समजणें देखील आवश्यक आहे .

राशींचे स्वामी .

भौमः शुक्रो बुधश्चंद्रः सूर्य : सोम्यो भृगुः कुज : ।

गुरु : शनिः शनिर्जीव : क्रमान्मेषादिराशिपा : ॥१७९॥

मेषराशीचा स्वामी मंगळ , वृषभ राशीचा शुक्र , मिथुन राशीचा बुध , कर्केचा चंद्र , सिंहेचा सूर्य , कन्येचा बुध , तूळेचा शुक्र , वृश्चिकेचा मंगळ , धनुराशीचा गुरु , मकर व कुंभ या २ राशींचा शनि व मीन राशीचा गुरु याप्रमाणें राशींचे स्वामी जाणावे .

आय --- व्यय काढण्याची रीति .

स्वस्वामिवर्षाधिपवत्सरैक्यं त्रिघ्नं शराढयं तिथिभक्तशेषम् ।

आयोऽथ लब्धं त्रिगुणेषुयुक्तं तिथ्याप्तशेषं व्ययसंज्ञकं स्यात् ॥१८०॥

वर्षस्वामी ( चैत्रशुक्लप्रतिपदेचा वार ) आणि आपल्या राशीचा स्वामी यांच्या दशांच्या वर्षांची बेरीज करून त्या बेरजेस तिहींनीं गुणून जे अंक येतील त्यांत ५ मिळवावे व त्या बेरजेस १५ नीं भागावें . भागाकार करून जी बाकी राहील तो अंक त्या राशीचा आय जाणावा . तसेंच , भागाकाराचा जो अंक असेल त्याला पूर्वींप्रमाणेंच ३ नीं गुणून त्यांत ५ मिळवावे व १५ नीं भागावें . जी बाकी शेष राहील तो अंक त्या राशीचा व्यय जाणावा .

उदाहरण --- एका मनुष्याची तूळ राशि आहे . त्याचे शके १८५७ संवत्स - रातील आय - व्यय काढावयाचे आहेत . वर्षस्वामी गुरु आहे व राशिस्वामी शुक्र आहे म्हणून रीतीप्रमाणें वर्षस्वामीच्या द्शेचीं वर्षें १९ + राशिस्वामीचीं वर्षें २१ = ४० x ३ = १२० + ५ = १२५ / १५ = ८ हा भागाकार , व बाकी ५ अंक राहिले . म्हणून ५ हा आय समजावा . आताम व्ययाचे अंक काढूं . भागाकार ८ * ३ = २४ + ५ = २९ / १५ = १ हा भागाकार व बाकी १४ राहिली . म्हणून १४ हा व्यय समजावा . चैत्रापासून भाद्रपदार्यंत ६ महिन्यांचे अष्टोत्तरीमानानें व आश्विनापासून ( आश्विन शुक्ल प्रतिपदेचा वार हाच वर्षाधिप समजून ) फाल्गुनापर्यंत ६ महिन्यांचे विंशोत्तरी मानानें आय - व्यय काढितात . येथें दिलेलें उदाहरण अष्टोत्तरी मानाचें आहे .

यस्मिन्वर्षे दीर्घ आय : प्रदिष्टस्तस्मिन्वर्षे लाभदश्चातिसौख्यम् ।

क्लेशो हानिश्चार्थनाशो व्ययश्चेत्येतत्सर्व चिंतयेदब्दमूले ॥१८१॥

आय आणि व्यय ह्या दोहोंचे अंक सारखे असल्यास त्या वर्षांत प्राप्ति व खर्च ह्या दोहोंचें प्रमाण सारखें असेल , असें समजावें . आयस्थानाचा अंक जास्त असून ब्ययस्थानाचा जितका कमी असेल , तितक्या प्रमाणानें खर्च कमी होऊन त्या संवत्सरांत सुख होऊन कांहीं तरी संग्रह होईल असें समजावें . लाभस्थानापेक्षां व्ययस्थानांतील अंक जास्त असेल तर त्या संवत्सरांत लाभापेक्षां खर्च जास्त होईल आणि क्लेश होतील असें समजावें . याशिवाय बारीकसारीक गोष्टी पंचांगांत पुष्कळ असतात .

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP