रात्रौ यामद्वयादर्वाक् सप्तमी व त्रयोदशी ।
तथैव नवनाडीषु चतुर्थी यदि दृश्यते ।
प्रदोषः स तु विज्ञेयः सर्वविद्याविगर्हितः ॥१३६॥
षष्ठीच्या दिवशीं अर्धरात्रीच्या आत सप्तमी , किंवा द्वादशीच्या दिवशीं अर्धरात्रीच्या आंत त्रयोदशी असेल तर , अथवा तृतीयेच्या दिवशीं नऊ घटिका रात्रीच्या आंत चतुर्थी असेल तर , ते दिवस ‘ प्रदोष ’ असतात . ह्या प्रदोषतिथि वेदाध्ययनाला वर्ज्य कराव्या , असें सांगितलें आहे .