हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
नक्षत्रांच्या विशेष संज्ञा

नक्षत्रांच्या विशेष संज्ञा

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


स्थिरनक्ष ० ध्रुवस्थिरमिति ख्यातं रोहिणी चोत्तरात्रयम् ।

तत्रामरगृहग्रामाभिषेकाद्याः स्थिरक्रियाः ॥८१॥

चरनक्ष ० श्रवणादित्रिभं स्वाती पुनर्वसु चरं चलम् ।

तस्मिन्वाजिगजारोहो वाटिका गमनादिकम् ॥८२॥

मृदुनक्ष ० मृगश्चित्रानुराधा च रेवती मृदु मैत्रकम् ।

तत्र गीतांबरक्रीडा मित्रकार्यविभूषणम् ॥८३॥

लघुनक्ष ० पूषाश्विन्यभिजिद्धस्तं लघुक्षिप्रमुदाह्रुतम् ।

तस्मिन्पण्यरतिज्ञानं भूतौषधकलादिकम् ॥८४॥

क्रुरनक्ष ० क्रुरमुग्रमिति ख्यातं त्रिपूर्वा भरणी मघा ।

विषशस्त्राग्निघातादि तत्रच्छेदविनाशनम् ॥८५॥

दारुणनक्ष ० ज्येष्ठार्द्रामूलमाश्र्लेषा तीक्ष्णं दारुणभुच्यते ।

तत्र भेदो वधो बंधो मंत्रभूतादिसाधनम् ॥८६॥

मिश्रनक्ष ० विशाखा कृत्तिका द्वाभ्यां मिश्रं साधारणं स्मृतम् ।

वृषोत्सर्गोग्निकार्ये च मिश्रं तत्र च सिध्द्यति ॥८७॥

ध्रुव किंवा स्थिर नक्षत्रें : --- रोहिणी आणि तिन्ही उत्तरा म्हणजे उत्तरा , उत्तराषाढा आणि उत्तराभाद्रपदा ; अशा चार नक्षत्रांना ध्रुव किंवा स्थिर नक्षत्रें म्हणतात . ह्या नक्षत्रांवर देवालय किंवा घर बांधणें , नवा गांव वसविणें , राज्याभिषेक , बागबगीचा करणें इत्यादि कृत्यें करावीं . तात्पर्य , फार दिवस टिकलीं पाहिजेत अशीं सर्व कार्यें स्थिरनक्षत्रांवर करावीं .

चर किंवा चल नक्षत्रें : --- श्रवण , धनिष्ठा , शततारका , स्वाती आणि पुनर्वसु ; ह्या नक्षत्रांवर घोडा , हत्ती , इत्यादि वाहनांवर बसणें , उपवनांत विहारार्थ जाणें , इत्यादि कृत्यें करावीं .

मृदु किंवा मैत्र नक्षत्रें : --- मृग , चित्रा , अनुराधा आणि रेवती ; ह्यांवर गायन , क्रीडा , वस्त्रालंकार , मित्रकार्य , इत्यादि कृत्यें करावीं .

लघु किंवा क्षिप्र नक्षत्रें : --- पुष्य , अश्र्विनी , अभिजित् आणि हस्त ; ह्यांवर वस्तूंची देवघेव करणें , मंत्रतंत्र शिकणें , चित्रें काढणें , इत्यादि कृत्यें करावीं .

क्रुर किंवा उग्र नक्षत्रें : --- तिन्ही पूर्वा , भरणी आणि मघा ; ह्यांवर शाठय किंवा क्रूर कृत्यें करावीं .

तीक्ष्ण किंवा दारुण नक्षत्रें : --- ज्येष्ठा , आर्द्रा , आश्र्लेषा आणि मूळ ; ह्यांवर जारणमारणकलहादि कृत्यें करावीं .

मिश्र किंवा साधारण नक्षत्रें : --- विशाखा आणि कृत्तिका ; ह्यांवर वृषोत्सर्ग , अग्निहोत्रादि कृत्यें करावीं .

यांशिवाय नक्षत्रांना ऊर्ध्वमुख , अधोमुख , अंधलोचन , मध्यलोचन इत्यादि दुसर्‍या संज्ञा आहेत , त्यांविषयीं माहिती सांगतों .

ऊर्ध्वमुखाधोमुखादि नक्षत्रें .

त्र्युत्तरा रोहिणी चैव पुष्यार्द्रा श्रवणत्रयम् ।

एतान्यूर्ध्वमुखान्यत्र प्रासादगृहतोरणम् ॥८८

मूलाश्र्लेषामघापूर्वा विशाखा भरणीद्वयम् ।

अधोमुखानि भान्यत्र वापीकूपादि सिध्यति ॥८९॥

पुनर्वस्वनुराधाख्यं ज्येष्ठा हस्तत्रयं मृगः ।

रेवतीद्वितयं तिर्यग्वक्त्रमत्र रथादिकान् ॥९०॥

ऊर्ध्वमुख नक्षत्रें : --- तिन्ही उत्तरा , रोहिणी , पुष्य , आर्द्रा , श्रवण , धनिष्ठा , शतता ०

अधोमुख नक्षत्रें : --- मूळ , आश्र्लेषा , मघा , तिन्ही पूर्वा , विशाखा , भर ० कृत्तिका .

तिर्यडमुख नक्षत्रें : --- पुनर्वसु , अनुराधा , ज्येष्ठा , हस्त , चित्रा , स्वाती , मृग , रेवती अश्विनी .

ऊर्ध्वमुख नक्षत्रांवर घर , वाडा , देवालय वगैरे बांधणें ; अधोमुख नक्षत्रांवर विहिरी , तळीं वगैरे खणणें आणि तिर्यडमुख नक्षत्रांवर गाडी , घोडा घेणें , नांगर करणें , वगैरे कृत्यें करावीं .

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP