भद्रेचें मुख .
शक्राष्टमुनितिथ्यब्धिर्दिगीशाग्निमिते तिथौ ।
प्रथमादिषु यामेषु पंचनाडयस्तु वै क्रमात् ।
भद्रामुखं परित्याज्यं शुभकर्मसु सर्वदा ॥१३०॥
प्रत्येक महिन्यांत आठ वेळ कल्याणी असते , हें वर सांगितलेंच आहे . ज्या तिथींत कल्याणी असेल त्या तिथींच्या आरंभापासून कांहींनियमित प्रहरांच्या पहिल्या पांच घटिकांना कल्याणीचें मुख अशी संज्ञा आहे . तें अत्यंत अशुभ होय . कोणत्या तिथीच्या कितव्या प्रहरांत मुख असतें हें खालीं दिलें आहे -
|
कृ . |
शु . |
कृ . |
शु . |
शु . |
कृ . |
शु . |
कृ . |
तिथी |
१४ |
८ |
७ |
१५ |
४ |
१० |
११ |
३ |
प्रहर |
१ |
२ |
३ |
४ |
५ |
६ |
७ |
८ |
उदाहरणार्थ , कृष्णचतुर्दशीच्या पहिल्या प्रहरांतील पहिल्या पांच घटिका , शुक्ल अष्टमीच्या दुसर्या प्रहरांतील पहिल्या पांच घटिका इत्यादि . याप्रमाणें कल्याणींचें मुख सर्वत्र वर्ज्य करावें .
भद्रेचें पुच्छ .
सर्पः सप्तस्तिथिः शक्रो दिक्रुद्राग्निश्रुतिस्तिथौ ।
प्रथमादिषु यामेषु क्रमादंत्यघटित्रयम् ॥
पुच्छं विष्टेर्विजानीयात्सर्वकार्येषु मंगलम् ॥१३१॥
ज्या तिथींत कल्याणी असेल त्या तिथीच्या आरंभापासून कांही नियमित प्रहरांच्या शेवटच्या तीन घटिकांना कल्याणीचें पुच्छ असें म्हणतात . कोणत्या तिथीच्या कोणत्या प्रहरांत पुच्छ असतें तें खालीं दिलें आहे -
|
शु . |
कृ |
शु . |
कृ |
कृ |
शु . |
कृ |
शु . |
तिथी |
८ |
७ |
१५ |
१४ |
१० |
११ |
३ |
४ |
प्रहर |
१ |
२ |
३ |
४ |
५ |
६ |
७ |
८ |
उदाहरणार्थ , शुक्ल अष्टमीच्या पहिल्या प्रहरांतील शेवटच्या तीन घटिका , कृष्ण सप्तमीच्या दुसर्या प्रहरांतील शेवटच्या तीन घटिका , इ ० याप्रमाणें भद्रेचें पुच्छ जाणावें . हें निर्दोष असून सर्व कार्यांना प्रशस्त मानिलें आहे .