हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
नक्षत्रांच्या लोचनसंज्ञा

नक्षत्रांच्या लोचनसंज्ञा

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


नक्षत्रांच्या लोचनसंज्ञा .

अंधकं मंदनेत्रं च मध्यचक्षुः सुलोचनम् ।

रोहिणी गणयेत् पूर्वे साभिजिच्च पुनः पुनः ॥९१॥

हीं नक्षत्रें समजण्याची अशी रीति आहे कीं , रोहिणीनक्षत्रापासून मोजण्यास आरंभ करावा ; जसें , प्रथम रोहिणी हें अंधलोचन , मृग हें मंदलोचन , नंतर आर्द्रा हें मध्यलोचन आणि शेवटीं पुनर्वसु हें सुलोचन ; ह्याच क्रमानें पुनः पुनः मोजीत जावें . हीं नक्षत्रें मोजतांना अभिजित् नक्षत्रसुद्धां मोजावें . खालीं ह्या नक्षत्रांचें कोष्टक दिलें आहे त्यावरुन सर्व नक्षत्रांच्या लोचनसंज्ञा स्पष्ट कळतील .

अंधनक्षत्रें

मंदनक्षत्रें

मध्यलोचनक्षत्रें

सुलोचननक्षत्रें

रोहिणी

मृग

आर्द्रा

पुनर्वसु

पुष्य

आश्लेषा

मघा

पूर्वा

उत्तरा

हस्त

चित्रा

स्वाती

विषाखा

अनुराधा

ज्येष्ठा

मूळ

पूर्वाषाढा

उत्तराषाढा

अभिजित् ‍

श्रवण

घनिष्ठा

शततारका

पूर्वाभाद्रपदा

उत्तराभाद्रपदा

रेवती

अश्विनी

भरणी

कृत्तिका

पुष्यनक्षत्रवर्णन .

सिंहो यथा सर्वचतुष्पदानां तथैव पुष्यो बलवानुडूनाम् ॥

चन्द्रे विरुद्धेऽप्यथ गोचरेऽपि सिध्यन्ति कार्याणि कृतानि पुष्ये ॥९२॥

ज्याप्रमाणें सर्व चतुष्पाद जनावरांत सिंह बलवान् अत एव श्रेष्ठ आहे , त्याचप्रमाणें सर्व नक्षत्रांत पुष्यनक्षत्र श्रेष्ठ आहे . कोणत्याही कार्यसमयीं चवथा , आठवा किंवा बारावा , असा जरी स्वराशीला अनिष्ट चंद्र असेल , आणि त्या दिवशीं पुष्यनक्षत्र असेल , तरी अनिष्ट चंद्रामुळें कार्यास कोणत्याही प्रकारचें विघ्न न येतां पुष्यनक्षत्राच्या योगानें निश्र्चयपूर्वक कार्यसिद्धि होते . पण ‘ विहाय पाणिग्रहमेव पुष्यः ’ या वचनाप्रमाणें पुष्यनक्षत्र विवाहाला मात्र अनिष्ट मानिलेलें आहे .

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP