गतकलीचें प्रमाण
ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.
खगशैलेंदुरामाद्ये ३१७९ शाकेब्दास्ते कलेर्गतः ।
तैर्विहीनं कलेर्मानं शेषे शेषकलेर्मितः ॥१८॥
शालिवाहन शक सुरु झाला, त्या वेळीं कलियुगाचीं ३१७९ वर्षै गत झालीं होतीं. म्हणून शालिवाहन शकामध्यें ३१७९ मिळवून जी बेरीज येईल ती संख्या गेलेल्या कलियुगाच्या वर्षाचें प्रमाण होय आणि तीच बेरीज कलियुगाच्या एकंदर वर्षसंख्येंतून वजा केली असतां राहील ती संख्या शेष कलीचें प्रमाण होय. उदाहरणार्थ, शालिवाहन शके १८३२ ह्या सालीं कलीचीं किती वर्षै गेलीं आहेत, हें काढावयाचें आहे म्हणून, वर लिहिल्याप्रमाणें १८३२ त ३१७९ मिळविले म्हणजे ५०११ ही बेरीज झाली. हें गतकलीचें प्रमाण झालें, आणि हीच संख्या म्हणजे ५०११ कलीच्या एकंदर वर्षसंख्येंतून म्हणजे ४,३२,००० ह्या संख्येंतून वजा केली म्हणजे बाकी ४,२६,९८९ वर्षै राहातात. हीं वर्षै शके १८३२ सालीं कलियुगाची बाकी भोगावयाची राहिली असें समजावें.
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2012
TOP