हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
तीन प्रकारचें गंडांत

तीन प्रकारचें गंडांत

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


नक्षत्रतिथिराशीनां गंडांतं त्रिविधं त्यजेत् ।

प्रयत्नेन सदा जन्मयात्रोद्वाहव्रतादिषु ॥१४३॥

नक्षत्रगं ० - ज्येष्ठामूलर्क्षयोः संधौ रेवत्यश्विभयोस्तथा ।

आश्लेषामघयोरंतराले नाडीचतुष्टयम् ॥१४४॥

तिथिगं ० - अंतरे पंचमीषष्ठयोः पूर्णिमाद्याह्रुयोरपि ।

दशम्येकादशीसंधौ गंडांतं घटिकाद्वयम् ॥१४५॥

लग्ननं ० - कर्कासिंहाख्ययोर्मीनमेषयोरंतरे तयोः ।

वृश्चिकाख्यधनुःसंधौ लग्नस्यैकं घटीयुतम् ॥१४६॥

गंडांत तीन प्रकारचें आहे . १ नक्षत्रगंडांत , २ तिथिगंडांत , आणि ३ लग्नगंडांत . कांहीं नक्षत्रतिथिलग्नादिकांच्या संधीच्या घटिकांना गंडांत म्हणतात . जसें , ज्येष्ठा आणि मूळ , रेवती आणि आश्विनी , आश्लेषा आणि मघा , हीं गंडांतनक्षत्रें होत . म्हणजे ज्येष्ठानक्षत्राच्या शेवटच्या २ घटिका व मूळनक्षत्राच्या आरंभींच्या २ घटिका अशी दोन नक्षत्रांची संधि हेंच गंडांत होय . त्याचप्रमाणें रेवतीच्या २ अत्यंघटिका व अश्विनीच्या २ आद्यघटिका , व आश्लेषाच्या २ अंत्यघटिका आणि मघाच्या २ आद्य घटिका , हेंही नक्षत्रगंडांतच होय . तसेंच , पौर्णिमेची शेवटची १ घटिका व प्रतिपदेची आरंभींची १ घटिका ; पंचमीची अंत्यघटी व षष्ठीची आद्यघटी ; आणि दशमीची अंत्य घटी व एकादशीची आद्यघटी यांना तिथिगंडांत म्हणतात . त्याचप्रमाणें कर्क व सिंह ; मीन व मेष ; आणि वृश्चिक व धनु या लग्नांच्या संधीची अर्ध अर्ध घटिका म्हणजे दोन लग्नें मिळून १ घटिकात्मक लग्नसंधीचा काळ , हें लग्नगंडांत होय हें तीन प्रकारचें गंडांत जन्म , प्रयाण विवाह , व्रतबंध इत्यादि शुभकार्यांना निषिद्ध आहे गंडांतामध्यें जन्म झाला असतां शांतीनें तो दोष परिहार होतो असें सांगितलें आहे .

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP