हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
यामार्धलक्षण

यामार्धलक्षण

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


अर्धयामाः परित्याज्या वेदसप्तद्विषंचमाः ।

अष्टत्रिषष्ठसंख्याकाः क्रमतो रविवारसरात् ॥१४२॥

यामार्ध म्हणजे प्रहराचा अर्धभाग होय . रविवारीं चवथ्या प्रहराचा अर्ध सोमवारीं सातव्या , मंगळवारीं दुसर्‍या , बुधवारीं पांचव्या , गुरुवारीं आठव्या , शुक्रवारीं तिसर्‍या आणि शनिवारीं सहाव्या प्रहराचा अर्ध , यांना यामार्ध म्हणतात . ह्या पूर्वोक्त निरनिराळया सर्व अर्धप्रहरांमध्यें कोणतेंही शुभकार्य करुं नये . प्रहराचा अर्धभाग म्हणजे पूर्वार्ध समजावा . हा यामार्धदोष रात्रीं नसतो असें कित्येक ग्रंथकार म्हणतात . ( येथें दिनमानाचे समान चार भाग करुन त्या प्रत्येक भागाला दिवसाचा प्रहर म्हणावें ; व रात्रिमानाचे समान चारभाग करुन त्या प्रत्येक भागाला रात्रीचा प्रहर म्हणावें . )

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP