|
पु. कोवळा दुंबा ; लठ्ठ शेंपटीचा मेंढा . वि. पु. कोवळा दुंबा ; एक लठ्ठ शेंपटाचा मेंढा . - सिंश . चांगला ; गुणांचा ; मध्यम वर्गाचा ; चालण्याजोगा ; योग्य . ठीक प्रकृतीचा ; आरोग्य असणारा ; रोगनिर्मुक्त . सुमाराचा ; बराच ; पुष्कळ नसला तरी पुरेपूर . ( ल . ) शहाणा . केवळ बाळचि इच्छी विधुसि धरायासि कां बरा इच्छी । - मोउद्योग १० . ३ . - क्रिवि . वेळेवर ; वक्तशीर . तूं बरा आलास . चांगल्या , नीट रीतीनें . देव म्हणे बैस बरा । - मोभीष्म ४ . १९ . [ सं . वरम ] बरा घेणें - चांगल्या तर्हेनें , खूप देणें ( मार , ठपका इ० ). खरडपट्टी काढणें . बर्यावर असणें - एखाद्याचें चांगलें इच्छिणें . बर्या बोलानें , वाजीनें - क्रिवि . गोडीगुलाबीनें राजीखुषीनें ; स्वत : ची चूक कबूल करुन . या चळवळीवरील अत्याचाराचे आरोप बर्याबोलानें परत घ्यावेत . - के २७ . ५ . ३० . बर्याशा झाडाची साल काढून र्हावप - ( गो . ) चांगल्या माणसाच्या आधारानें राहणें . बरावाईट - वि . साधारण चांगला ; मध्यम ; बरासा ; चालचलाऊ . ( कु . ल . ) आत्महत्या ; मरण . जिवाचा बरांवायट करुंक बगता . बरीगत , गती - स्त्री . धडगत ; आशाजनक स्थिति ( बहुधां नकारार्थी प्रयोग ). त्या रोग्याची बरी गत दिसत नाहीं . बरें - न . कल्याण ; क्षेम ; भरभराट . हित ; नफा ; फायदा ; चांगलें . - क्रिवि . ठीक ; चांगलें ; योग्य ; मान्य . पादपूरणार्थक शब्द . काय बरें यास उदाहरण ? ठीक ; फार चांगलें ; होय ( रुकार , कबुली , मान्यता इ० विवक्षित असतां ) [ बरा ] म्ह० ज्याचें करावें बरें तो म्हणतो कर माझें खरें . एखाद्यास बरें मागणें , एखाद्याला बरें मागणें - चांगलें व्हावें अशी इच्छा , प्रार्थना करणें . ०पाहणें क्रि . चांगलें म्हणून समजणें ; कल्याण चिंतणें . पंढरीचे ब्राह्मण देखतील कोणी । बरें मजलागोनी न पाहती । - तुगा . बरेंपण जावप क्रि . ( गो . ) मैत्री जमणें . बरेंवाईट न . दैवानें येणारें दुखणें ; मरण ; नाश इ० ; आरोग्यादिक बरें न रोगादि वाईट .
|